हे पृष्ठ 7 फेब्रुवारी रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

या पृष्ठावर, आम्ही ७ फेब्रुवारी रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.

On this page, we will list all historical events that have occurred on 7 February. The students can refer them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

  • ’ग्रेनाडा’चा स्वातंत्र्यदिन

महत्त्वाच्या घटना:

रमाकांत आचरेकर
रमाकांत आचरेकर

२००३: क्रिकेट प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांना श्री शिवछत्रपती जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला.

१९९९: युवराज अब्दुल्ला जॉर्डनच्या राजेपदी

१९७४: ग्रेनाडा हा देश (युनायटेड किंग्डमपासुन) स्वतंत्र झाला.

१९७१: स्वित्झर्लंडमधे महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला.

१९६५: मराठी नाटकात प्रथमच फिरत्या रंगमंचाचा वापर सुरू झाला.

१९४८: कसोटी क्रिकेटमधे शतक झळकवणारा नील हार्वे हा सर्वात लहान ऑस्ट्रेलियन खेळाडू ठरला.

१९२०: बाबूराव पेंटर यांच्या ’महाराष्ट्र फिल्म कंपनी’ने तयार केलेला ’सैरंध्री’ हा चित्रपट पुण्याच्या आर्यन सिनेमात प्रथम प्रकाशित झाला.

१९१५: गंगाधर नरहर ऊर्फ बापुसाहेब पाठक यांनी पुण्यातील ‘आर्यन’ हे पहिले चित्रपटगृह सुरु केले. तेथे प्रदर्शित झालेला पहिला मूकपट होता हिर्‍याची अंगठी.

१८५६: ब्रिटिशांनी अवध साम्राज्य ताब्यात घेतले. सम्राट वाजिद अली शहा याला तुरुंगात टाकण्यात आले.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

एस. रामचंद्रन पिल्ले
एस. रामचंद्रन पिल्ले

१९३८: एस. रामचंद्रन पिल्ले – कम्युनिस्ट नेते

१९३४: सुजित कुमार – चित्रपट अभिनेता व निर्माता (मृत्यू: ५ फेब्रुवारी २०१०)

१८१२: चार्ल्स डिकन्स – इंग्लिश कादंबरीकार व लेखक (मृत्यू: ९ जून १८७०)

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

१९९९: हुसेन – नवविचारांचा पुरस्कार करुन पश्चिम आशियातील शांततेसाठी अथक प्रयत्‍न करणारे जॉर्डनचे राजे (जन्म: १४ नोव्हेंबर १९३५)

१९३८: हार्वे फायरस्टोन – अमेरिकन उद्योजक (जन्म: २० डिसेंबर १८६८)

१२७४: श्री चक्रधर स्वामी – महानुभाव पंथाचे संस्थापक (जन्म: ४ सप्टेंबर १२२१)

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published.