३ जुलै दिनविशेष - 3 July in History
३ जुलै दिनविशेष - 3 July in History

हे पृष्ठ 3 जुलै रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

या पृष्ठावर, आम्ही ३ जुलै रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.

On this page, we will list all historical events that occurred on 3 July. The students can refer to them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

महत्त्वाच्या घटना:

सुधीर फडके
सुधीर फडके

१६०८: सॅम्यूअल बी. चॅम्पलेन यांनी कॅनडातील क्‍वेबेक शहराची स्थापना केली.

१६६१: पोर्तुगीजांनी इंग्लंडचे राजा चार्ल्स(Charles) द्वितीय यांना मुंबई व तंजौर बेट भेट दिले.

१७६०: मराठा सेनेने दिल्लीवर ताबा मिळविला.

१८५०: इस्ट इंडिया कंपनीच्या अध्यक्षांनी भारतातुन आणलेला ’कोहिनूर’ हिरा इंग्लंडच्या राणीच्या स्वाधीन केला.

१८५२: महात्मा फुले यांनी दलित मुलांसाठी पहिली शाळा काढली.

१८५५: भारतात कायदे शिक्षणाचा प्रारंभ झाला.

महात्मा फुले
महात्मा फुले

१८८४: डाऊ जोन्स (DJIA) हा निर्देशांक सुरू झाला.

१८८६: जर्मनीच्या कार्ल बेन्झ याने जगातील पहिली मोटारगाडी बनवली.

१८९०: आयडाहो हे अमेरिकेचे ४३ वे राज्य बनले.

१९०८: इंग्रज सरकारने लोकमान्य टिळकांना देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक केली.

१९२८: लंडनमध्ये प्रथमतः रंगीत दूरचित्रवाणी कार्यक्रमांचे प्रक्षेपण झाले.

१९३८: ‘मॅलार्ड’ हे वाफेचे इंजिन ताशी १२६ मैल (२०२ कि. मी.) वेगाने न्यू कॅसलहून लंडनला पोहोचले. वाफेच्या इंजिनाचा हा वेगाचा विक्रम अजूनही अबाधित आहे.

१९७२: भारत आणि पाकिस्तान देशांत काश्मीर संबंधी नि:शस्त्र करार झाला.

१९९८: ’ए मेरे वतन के लोगो …’ या प्रसिद्ध गाण्याचे कवी प्रदीप यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

२०००: विक्रांत या विमानवाहू युद्धनौकेचे मुंबईच्या समुद्रात ऑयस्टर रॉकजवळ सागरी संग्रहालयात रुपांतर करण्यास नौदल, राज्यसरकार, मुंबई पोर्ट ट्रस्ट आणि मच्छिमार प्रतिनिधींनी मान्यता दिली.

२००१: सुधीर फडके यांना राज्य सरकारचा ’गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार’ जाहीर

२००६: एक्स. पी. १४ हा लघुग्रह पृथ्वीच्या अगदी जवळुन (साधारण चंद्राइतक्या अंतरावरुन) गेला.

२०१७: अचल कुमार ज्योती यांची भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्त पदी निवड करण्यात आली.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१६८३: इंग्लिश कवी एडवर्ड यंग यांचे जन्म.

सुनीता देशपांडे

१८३८: मामा परमानंद – पत्रकार व विचारवंत, प्रार्थना समाजाचे एक संस्थापक (मृत्यू: १३ सप्टेंबर १८९३)

१८८६: रामचंद्र दत्तात्रय तथा ’गुरूदेव’ रानडे – आधुनिक विद्याविभूषित तत्त्वज्ञ व संत, फर्ग्युसन व विलींग्डन महाविद्यालयातील तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक (मृत्यू: ६ जून १९५७)

१९०९: बॅरिस्टर व्ही. एम. तथा ’भाऊसाहेब’ तारकुंडे – कायदेपंडित, स्वातंत्र्यसैनिक, मुंबई उच्‍च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश व सर्वोच्‍च न्यायालयात सामाजिक समस्यांसाठी लढा देणारे झुंजार कायदेतज्ञ (मृत्यू: २२ मार्च २००४)

१९१२: श्रीपाद गोविंद नेवरेकर – मराठी रंगभूमीवरील लोकप्रिय गायक व नट (मृत्यू: १६ जून १९७७)

१९१४: दत्तात्रय गणेश गोडसे – इतिहासकार, नाटककार, कलादिग्दर्शक, वेशभूषाकार आणि नेपथ्यकार (मृत्यू: ५ जानेवारी १९९२)

१९१८: भारतीय अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते व्ही. रंगारा राव यांचा जन्म. (मृत्यू: १८ जुलै १९७४)

१९२४: सेलप्पन रामनाथन – सिंगापूरचे ६ वे राष्ट्राध्यक्ष

१९२४: तामीळवंशीय राजकारणी, सिंगापूरच्या प्रजासत्ताकाचे ६वे राष्ट्राध्यक्ष सेल्लप्पन रामनाथन यांचा जन्म.

१९२६: सुनीता देशपांडे – लेखिका व स्वातंत्र्यसैनिक (मृत्यू: ७ नोव्हेंबर २००९)

१९५१: सर रिचर्ड हॅडली – न्यूझीलंडचे क्रिकेटपटू

१९५२: भारतीय गायक अमित कुमार यांचा जन्म.

हरभजनसिंग
हरभजनसिंग

१९५२: भारतीय कॅनेडियन लेखक रोहिनटन मिस्त्री यांचा जन्म.

१९७१: विकीलीक्स चे संस्थापक ज्युलियन असांज यांचा जन्म.

१९७६: हेन्‍री ओलोंगा – झिम्बाब्वेचे क्रिकेटपटू

१९७७: प्रसिद्ध महाराष्ट्रीयन माराठी गायक, संगीत नाटक-अभिनेते श्रीपाद गोविंद नेवरेकर यांचा जन्मदिन.

१९८०: हरभजनसिंग – भारतीय क्रिकेटपटू

१९८७: युवसेना जिल्हाअधिकारी जळगाव माननीय प्रितेश ठाकूर यांचा जन्म.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

राजकुमार’ ऊर्फ ’जानी
राजकुमार’ ऊर्फ ’जानी

१३५०: संत नामदेव यांनी समाधी घेतली. (जन्म: २९ आक्टोबर १२७०)

१९३३: अर्जेंटिनाचे राष्ट्राध्यक्ष हिपोलितो य्रिगोयेन यांचे निधन. (जम: १२ जुलै १८५२)

१९३५: सिट्रोएन कंपनीचे संस्थापक आंद्रे सीट्रोएन यांचे निधन. (जन्म: ५ फेब्रुवारी १८७८)

१९६९: ब्रायन जोन्स – ‘द रोलिंग स्टोन्स‘चे संस्थापक, गिटार, हार्मोनिका आणि पियानो वादक (जन्म: २८ फेब्रुवारी १९४२)

१९९६: कुलभूषण पंडित तथा ’राजकुमार’ ऊर्फ ’जानी’ – जबरदस्त आवाजाने संवादफेक करून प्रेक्षकांना खूष करणारा हिन्दी चित्रपट अभिनेता (जन्म: ८ आक्टोबर १९२६)

१९९९: परमवीर चक्र पुरस्कार सन्मानित गोरखा रायफल्सचे भारतीय सैन्य अधिकारी कॅप्टन मनोज कुमार पांडे यांचे निधन.

२०१५: भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे माजी (३६वे) सरन्यायाधीश योगेश कुमार सभरवाल यांचे निधन.

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *