३ मे दिनविशेष - 3 May in History
३ मे दिनविशेष - 3 May in History

हे पृष्ठ 3 मे रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

On this page, we will list all historical events that occurred on 3rd May. The students can refer to them while preparing for all competitive exams and banking exams.

जागतिक दिवस

पत्रकारिता अभिस्वातंत्र्य दिन

जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिन- 1993 मध्ये, UN जनरल असेंब्लीने 3 मे हा दिवस जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिन म्हणून घोषित केला 1991 मध्ये UNESCO च्या जनरल कॉन्फरन्सच्या सव्वीसाव्या सत्रात स्वीकारल्या गेलेल्या शिफारशीनुसार. हे पत्रकारांच्या उल्लंघनाची नागरिकांना माहिती देण्यासाठी एक प्रसंगी काम करते. स्वातंत्र्य.

  • संविधान दिन : पोलंड, जपान.
  • आंतरराष्ट्रीय सूर्य दिन
  • जागतिक श्वसनदाह निवारण दिन

महत्त्वाच्या घटना:

१७१५: संपूर्ण सूर्यग्रहण उत्तर युरोप आणि उत्तर आशिया मध्ये दिसले.

१८०२: वॉशिंग्टन (डि. सी) या शहराची स्थापना झाली.

१९१३: दादासाहेब फाळके यांनी दिग्दर्शित केलेला ’राजा हरिश्चंद्र’ हा पहिला भारतीय मूक चित्रपट प्रदर्शित होऊन भारतीय चित्रपट उद्योगाची सुरूवात झाली.

१९३९: नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाची स्थापना केली.

१९४७: इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस (INTUC) ची स्थापना.

१९४७: दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्तीनंतर मित्रराष्ट्र जपान ने आपले नवीन संविधान लागू केले.

१९६१: अमेरिकन अंतराळवीर, नौदल उड्डयनकर्ता, चाचणी पायलट आणि व्यावसायिक एलन बार्टलेट शेपर्ड हे अंतराळात जाणारे पहिले अमेरिकन यात्री ठरले.

१९७३: शिकागो येथील १४५१ फूट उंच असलेली ’सिअर्स टॉवर’ ही (त्याकाळची) जगातील सर्वात उंच इमारत बनली.

१९९४: सर्व वंशाच्या नागरिकांना मताधिकार असलेल्या दक्षिण अफ्रिकेच्या पहिल्याच निवडणूकीत विद्यमान अध्यक्ष एफ. डब्ल्यू. डी. कर्क यांच्या पक्षाचा पराभव झाला. नेल्सन मंडेला यांच्या नेतृत्त्वाखालील ‘अफ्रिकन नॅशनल काँग्रेस’ या पक्षाला बहुमत मिळाले. तोपर्यंत दक्षिण अफ्रिकेत वांशिक तत्त्वावर निवडणूका होत असत.

१९९९: होनोलूलू येथील एडविन जस्कुलस्की या ९६ वर्षीय वृद्ध गृहस्तांनी १०० मी. धावण्याची शर्यत २४.०४ सेकंदात पूर्ण करुन नवा जागतिक विक्रम प्रस्थापित केला.

२००८: भारतीय टाटा स्टील लिमिटेड कंपनीला ब्रिटन देशांतील कोळसा खाण घेण्याचा पहिला परवाना मिळाला.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१८१८: चित्रपट महर्षी भालजी पेंढारकर यांचा जन्म.

१८९६: व्ही. के. कृष्ण मेनन – भारताचे संरक्षणमंत्री व मुत्सद्दी (मृत्यू: ६ आक्टोबर १९७४)

१८९८: चित्रपट महर्षी भालजी पेंढारकर, मराठी चित्रपट दिग्दर्शक.

१८९८: गोल्डा मायर – शिक्षिका व इस्त्रायलच्या ४ थ्या पंतप्रधान (मृत्यू: ८ डिसेंबर १९७८)

१९३०: भारतीय राज्य राजस्थान येथील विधानसभेच्या प्रथम महिला अध्यक्ष व भारतीय जनता पक्षाच्या नेत्या सुमित्रा सिंह यांचा जन्मदिन.

१९५१: भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाचे नेता व राजस्थान राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचा जन्मदिन.

१९५९: उमा भारती, भारतीय राजकारणी.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

१९१२: नझीर अहमद देहलवी ऊर्फ ’डिप्टी’ – ऊर्दू कादंबरीचे जनक मानले जाणारे ऊर्दू लेखक, समाजसुधारक (जन्म: ? ? १८३० – बिजनोर, उत्तर प्रदेश)

१९६९: थोर शिक्षणतज्ज्ञ व भारताचे तिसरे राष्ट्रपती झाकिर हुसेन.

१९६९: डॉ. झाकिर हुसेन – भारताचे ३ रे राष्ट्रपती, शिक्षणतज्ञ. पद्मविभूषण व भारतरत्‍न हे सन्मान त्यांना देण्यात आलो होते. ’जमिया मिलिया इस्लामिया’ या शिक्षण संस्थेचे संपादक पुढे ही संस्था विद्यापीठात रुपांतरित झाली. (जन्म: ८ फेब्रुवारी १८९७)

१९७१: डॉ. धनंजय रामचंद्र गाडगीळ, अर्थतज्ञ आणि विचारवंत.

१९७७: मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे संस्थापक हमीद दलवाई

१९७८: महाराष्ट्रातील सुप्रसिध्द कवी व शिक्षणतज्ज्ञ वि.द. घाटे.

१९८१: फातिमा रशिद ऊर्फ ’नर्गिस’ – हिन्दी चित्रपट अभिनेत्री (जन्म: १ जून १९२९)

१९९६: वसंत गवाणकर, व्यंगचित्रकार

२०००: जेष्ठ समाजसेविका शकुंतलाबाई परांजपे यांचे निधन. (जन्म: १७ जानेवारी १९०६)

२००२: एम. एस. ओबेरॉय, भारतीय उद्योगपती

२००३: व्यंकटेश्वरन, तामिळ चित्रपट निर्माता.

२००६: प्रमोद महाजन – केन्द्रीय मंत्री व राज्यसभा खासदार (जन्म: ३० आक्टोबर १९४९)

२००५: भारतीय सेना कमांडर जगजितसिंह अरोडा यांचे निधन.

२००९: राम शेवाळकर – मराठी साहित्यिक (जन्म: २ मार्च १९३१)

२०११: जगदीश खेबूडकर – गीतकार व कवी (जन्म: १० मे १९३२)

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *