३० जानेवारी दिनविशेष - 30 January in History
३० जानेवारी दिनविशेष - 30 January in History

हे पृष्ठ 30 जानेवारी रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

या पृष्ठावर, आम्ही ३० जानेवारी रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.

On this page, we will list all historical events that have occurred on 30 January. The students can refer them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

  • कुष्ठरोग निवारण दिन
  • नशा मुक्ती संकल्प आणि शपथ दिवस.
  • आंतरराष्ट्रीय सर्वोदय दिवस.
  • शहीद दिवस.

महत्त्वाच्या घटना:

पण्डित रविशंकर
पण्डित रविशंकर

१६४९: इंग्लंडचा राजा पहिला चार्ल्स याचा शिरच्छेद करण्यात आला.

१९३३: अ‍ॅडॉल्फ हिटलरचा जर्मनीचा राष्ट्राध्यक्ष (चॅन्सेलर) म्हणून शपथविधी झाला.

१९४८: नथुराम गोडसे याने मोहनदास करमचंद ऊर्फ ’महात्मा’ गांधी यांचा सायंकाळी ५ वाजून १७ मिनिटांनी प्रार्थना करीत असताना गोळ्या घालून खून केला.

१९७१: आजच्या दिवशी फोकर फ्रेंडशिप विमान चे अपहरण झाले होते.

तुषार अरूण गांधी
तुषार अरूण गांधी

१९७२: आजच्या दिवशी कॉमनवेल्थ मधून पाकिस्तान बाहेर निघाले.

१९९४: पीटर लेंको बुद्धिबळातील सर्वात लहान वयाचा ग्रँडमास्टर झाला.

१९९७: महात्मा गांधीच्या अस्थींचे त्यांचे पणतू तुषार अरूण गांधी यांनी अलाहाबाद येथील संगमात विसर्जन केले. ४७ वर्षे या अस्थी कटकमधील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या लॉकरमध्ये होत्या.

महात्मा गांधी
महात्मा गांधी

१९९९: पण्डित रविशंकर यांना ’भारतरत्‍न’

२००४: मंगळावर पाठविलेल्या अपॉर्चुनिटी अंतरीक्ष यानाने मंगळावर आयरन ऑक्साइड (गंज) असल्याचे शोधल्या गेले.

२००८: चेन्नई च्या विशेष न्यायालयाने स्टॅम्प घोटाळ्यातील मुख्य आरोपी अब्दुल करीम तेलगी ला न्यायालयाने १० वर्षाची शिक्षा सुनावली.

२००९: ऑस्ट्रेलिया च्या मिक्स ओपन मध्ये सानिया मिर्झा आणि महेश भूपती यांची जोडी अंतिम फेरीत पोहचले.

२००९: कोका कोला क्लासिक चे नाव बदलवून कोका कोला करण्यात आले.

२०१६: दक्षिण कोरिया ने त्याचे पहिले रॉकेट रॉकेट नारो-1 चे यशस्वी प्रक्षेपण केले.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

डॉ. सतीश आळेकर
डॉ. सतीश आळेकर

१८८२: फ्रँकलिन डी. रुझव्हेल्ट – अमेरिकेचे ३२ वे राष्ट्राध्यक्ष (मृत्यू: १२ एप्रिल १९४५)

१८८९: हिन्दी भाषेतील प्रसिद्ध कवी जयशंकर प्रसाद यांचा जन्म.

१९१०: सी. सुब्रम्हण्यम – गांधीवादी नेते, केन्द्रीय मंत्री व महाराष्ट्राचे राज्यपाल (मृत्यू: ७ नोव्हेंबर २०००)

१९११: पं. गजाननबुवा जोशी – शास्त्रीय गायक (मृत्यू: २८ जून १९८७)

सी. सुब्रम्हण्यम
सी. सुब्रम्हण्यम

१९१३: प्रसिद्ध चित्रकार अमृता शेरगिल यांचा जन्म.

१९१७: वामन दत्तात्रय पटवर्धन – स्फोटके व शस्त्रास्त्र तज्ञ (मृत्यू: २७ जुलै २००७)

१९२७: ओलोफ पाल्मे – स्वीडनचे २६ वे पंतप्रधान (मृत्यू: २८ फेब्रुवारी १९८६)

१९२९: रमेश देव – हिंदी, मराठी चित्रपटांतील व रंगभूमीवरील अभिनेते, निर्माते व दिग्दर्शक

१९३७: भारतीय न्यायाधीश के.टे. थॉमस यांचा जन्म.

१९४९: डॉ. सतीश आळेकर – नाटककार, दिग्दर्शक आणि निर्माते, ’थिएटर अ‍ॅकॅडमी’चे एक संस् थापक,’ नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’चे संचालक, साहित्य अकादमी पारितोषिक विजेते

१९५१: भारताचे केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांचा जन्म.

१९७५: भारतीय कलाकार अनुप सोनी यांचा जन्म.

१९८०: छोट्या पडद्यांवरील कलाकार गुरदीप कोहली यांचा जन्म.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

१५२८: राजपूत राजवंशाचे राजा राणा संग्राम सिंह यांचा जन्म.

गोविंदराव पटवर्धन – हार्मोनियम व ऑर्गन वादक
गोविंदराव पटवर्धन – हार्मोनियम व ऑर्गन वादक

१९४८: ऑर्व्हिल राईट – आपला भाऊ विल्बर राईट याच्यासह इंजिनाच्या विमानाचा शोध लावणारे अमेरिकन अभियंते (जन्म: १९ ऑगस्ट १८७१)

१९४८: महात्मा गांधी (जन्म: २ आक्टोबर १८६९)

१९५१: फर्डिनांड पोर्श – ऑस्ट्रियन वाहन अभियंता (जन्म: ३ सप्टेंबर १८७५)

१९६०: प्रसिद्ध लेखक, समाजसेवक, नाथूराम प्रेमी यांचे निधन.

१९६०: गांधीवादी व्यक्तिमत्व जे.सी. कुमारप्पा यांचे निधन.

१९६८: प्रसिद्ध लेखक, कवी, माखन लाल चतुर्वेदी यांचे निधन.

१९९६: गोविंदराव पटवर्धन – हार्मोनियम व ऑर्गन वादक (जन्म: ? ? ????)

२०००: आचार्य जनार्दन हरी चिंचाळकर – मानववंशशास्त्रज्ञ व सामाजिक कार्यकर्ते (जन्म: ? ? ????)

२००४: रमेश अणावकर – गीतकार (जन्म: ? ? ????)

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *