२३ मे दिनविशेष - 23 May in History
२३ मे दिनविशेष - 23 May in History

हे पृष्ठ 23 मे रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

On this page, we will list all historical events that occurred on 23rd May. The students can refer to them while preparing for all competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

महत्त्वाच्या घटना:

१५६८: नेदरलँड्सला स्पेनपासून स्वातंत्र्य.

१७३७: पोर्तुगीजांकडुन जिंकल्यानंतर पेशव्यांनी अर्नाळा किल्ला परत बांधून घेतला.

१८०५: नेपोलियन बोनापार्टला इटलीचा राज्यपदी राज्याभिषेक.

१८२९: सिरील डेमियनला अ‍ॅकॉर्डियन या वाद्याचे पेटंट मिळाले.

बचेंद्री पाल
बचेंद्री पाल

१९११: न्यू यॉर्क सार्वजनिक ग्रंथालय सामान्य जनतेस खुले.

१९४९: पश्चिम जर्मनी हे राष्ट्र अस्तित्त्वात आले.

१९५१: तिबेट देशाने चीनबरोबर तिबेटच्या शांततेत मुक्तीसाठी सतरा बिंदू करार केला.

१९५६: आयुर्विमा व्यवसायाचे राष्ट्रीयीकरण करण्यासंबंधीचे विधेयक मंजूर झाले.

१९५८: अमेरिकेचा पहिला उपग्रह एक्सप्लोरर १ बंद पडला.

१९८४: बचेंद्री पाल या महिलेने एव्हरेस्ट शिखर चढून जाणारी पहिली भारतीय महिला होण्याचा मान मिळविला.

१९९५: जावा संगणक भाषेची अधिकृत घोषणा.

१९९७: माऊंट एव्हरेस्ट हे सर्वोच्‍च शिखर सर्वप्रथम सर करणार्‍या तेनसिंग नोर्गे यांचे नातू ताशी तेनसिंग यांनी माऊंट एव्हरेस्ट सर केले.

२००८: भारतीय लष्कर दलाच्या सैन्यांनी जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या पुर्थ्वी-२ या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली.

२०१६: भारतीय अंतरीक्ष संशोधन संस्था इस्रो ने आंध्रप्रदेश मधील श्रीहरिकोटा अंतराळ केंद्रातून संपूर्ण भारतीय बनावटीचे अंतराळ शटल आरएलव्ही-टीडी ची स्थापना केली.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१०५२: फ्रान्सचा राजा फिलिप (पहिला) यांचा जन्म. (मृत्यू: २९ जुलै ११०८)

१७०७: स्वीडीश वनस्पतीतज्ञ कार्ल लिनिअस यांचा जन्म. (मृत्यू: १० जानेवारी १७७८)

१८७५: अमेरिकन उद्योगपती आल्फ्रेड पी. स्लोन यांचा जन्म. (मृत्यू: १७ फेब्रुवारी १९६६)

वूर्केरी रामन, भारतीय क्रिकेट खेळाडू.
वूर्केरी रामन, भारतीय क्रिकेट खेळाडू.

१८९६: जुन्या जमान्यातील रंगभूमीवरील श्रेष्ठ संगीत समीक्षक केशवराव भोळे यांचा जन्म.

१९१८: इंग्लिश क्रिकेटपटू डेनिस कॉम्पटन यांचा जन्म. (मृत्यू: २३ एप्रिल १९९७)

१९१९: जयपूरच्या राजमाता महाराणी गायत्रीदेवी यांचा जन्म. (मृत्यू: २९ जुलै २००९)

१९२२: प्रख्यात भारतीय उपखंडातील इतिहासकार रणजीत गुहा यांचा जन्मदिन.

१९२६: मार्क्सवादी कम्युनिस्ट नेते पी. गोविंद पिल्लई यांचा जन्म. (मृत्यू: २२ नोव्हेंबर २०१२)

१९२६: भारतीय बिशप बॅसिल साळदादोर डिसोझा यांचा जन्म. (मृत्यू: ५ सप्टेंबर १९९६)

१९३३: मुद्रितशोधन तज्ञ मोहन वेल्हाळ यांचा जन्म.

१९४३: पटकथालेखक आणि दिग्दर्शक कोवेलमूडी राघवेंद्र राव यांचा जन्म.

१९४५: भारतीय दिग्दर्शक, पटकथालेखक आणि लेखक पद्मराजन यांचा जन्म.(मृत्यू: २४ जानेवारी १९९१)

१९४८: पद्मभूषण पुरस्कार सन्मानित माजी सेवानिवृत्त भारतीय प्रशासकीय सेवेचे अधिकारी आणि भारताचे माजी नियंत्रक आणि महालेखा परीक्षक विनोद राय यांचा जन्मदिन.

१९५१: रशियन बुद्धीबळपटू अनातोली कार्पोव्ह यांचा जन्म.

१९६५: वूर्केरी रामन, भारतीय क्रिकेट खेळाडू.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

१८५७: ऑगस्टिन लुई कॉशि, फ्रेंच गणितज्ञ. (जन्म: २१ ऑगस्ट १७८९)

१९०६: नॉर्वेजियन नाटककार, दिग्दर्शक आणि कवी हेन्‍रिक इब्सेन यांचे निधन. (जन्म: २० मार्च १८२८)

१९३०: प्रख्यात भारतीय पुरातत्व व संग्रहालय तज्ञ तसचं, बनारस हिंदू विद्यापीठातील प्राचीन भारतीय इतिहास आणि संस्कृतीचे प्राध्यापक राखालदास बंडोपाध्याय उर्फ जे. आर. डी. बनर्जी यांचे निधन.

१९३७: रॉकफेलर घराण्यातील पहिले उद्योगपती, स्टँडर्ड ऑईल उद्योगसमूह व अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील पहिल्या तेल उद्योगाचे संस्थापक जॉन डेव्हिसन रॉकफेलर यांचे निधन. (जन्म: ८ जुलै १८३९)

१९६०: निऑन लाईट चे निर्माते जॉर्ज क्लोडे यांचे निधन. (जन्म: २४ सप्टेंबर १८७०)

ले. जनरल पी. एस. बापट
ले. जनरल पी. एस. बापट

१९७५: भारतीय सैन्यातील ले. जनरल व व्हिक्टोरिया क्रॉस मिळविणाअरे पहिले ले. जनरल पी. एस. बापट यांचे निधन.

१९३४: क्लाईड बॅरो, अमेरिकन दरोडेखोर.

२०१०: भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या संस्थापक सदस्यांपैकी एक व भारतीय नक्षलवादी आंदोलनाचे जनक कानू सन्याल यांचे निधन.

२०१०: राष्ट्रीय पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय तेलगु भाषिक चित्रपट गायिका वेतुरी सुंदरम्मा मूर्ती यांचे निधन.

२०१४: भारतीय क्रिकेटर माधव मंत्री यांचे निधन. (जन्म: १ सप्टेंबर १९२१)

२०१४: भारतीय संगीतकार आणि दिग्दर्शक आनंद मोडक यांचे निधन. (जन्म: १३ मे १९५१)

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *