२२ नोव्हेंबर दिनविशेष - 22 November in History
२२ नोव्हेंबर दिनविशेष - 22 November in History

हे पृष्ठ 22 नोव्हेंबर रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

या पृष्ठावर, आम्ही २२ नोव्हेंबर  रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.

On this page, we will list all historical events that occurred on 22 November. The students can refer to them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

महत्त्वाच्या घटना:

१८५७: कोलोराडो मधील डेनव्हर शहराची स्थापना.

१८५८: कोलोराडो मधील डेनव्हर शहराची स्थापना

१९४३: लेबनॉन (फ्रान्सपासुन) स्वतंत्र झाला.

१९४८: मुंबई शहराला चक्रीवादळाचा जबरदस्त तडाखा

१९५०: आजच्या दिवशी अमेरिकेतील रिचमंड हिल्स येथे भीषण रेल्वे दुर्घटनेत ७९ लोक मृत्यमुखी पडले होते.

१९५६: ऑस्ट्रेलियातील मेलबोर्न येथे १६ व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.

१९६३: थुंबा या भारतीय अग्निबाण प्रक्षेपण केंद्राचे उद्‍घाटन

१९६५: संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम (UNDP) स्थापना झाली.

१९६८: आजच्याच दिवशी मद्रास राज्याचे नामकरण तामिळनाडू करण्याचा प्रस्ताव लोकसभेत पारित करण्यात आला होता.

१९६८: द बीटल्स यांनी द बीटल्स (द व्हाईट अल्बम) प्रकाशित केला.

१९७५: जुआन कार्लोस आजच्याच दिवशी स्पेन ह्या देशाचे राजा म्हणून नियुक्त झाले होते.

अँजेला मार्केल
अँजेला मार्केल

१९८६: भारतीय क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी श्रीलंकेविरुद्ध कसोटीत ३४वे शतक केले.

१९८९: आजच्याच दिवशी मंगळ, शुक्र, शनि, युरेनस, नेपच्यून व चंद्र हे सर्व एका सम रेषेत आले होते.

१९९१: डहाणूजवळ ज्वालाग्राही रसायने वाहून नेणारा टँकर पेटून रॉकेल मिळण्याच्या आशेने आलेल्या ६१ आदिवासींचा होरपळून मृत्यू

मॅग्नस कार्लसन
मॅग्नस कार्लसन

१९९७: नायजेरियात ’मिस वर्ल्ड’ स्पर्धेवरील हल्ल्यात १०० ठार

२००५: अँजेला मार्केल या जर्मनीच्या पहिल्या महिला चॅन्सेलर बनल्या.

२००६: भारतासह विश्वातील अन्य सहा देशांनी सूर्यासारखी उर्जा निर्मिती करणाऱ्या पहिल्या फ्युजन रिएक्टरची स्थापना करण्यासाठी पेरीस येथील बैठकीत ऐतेहासिक करार केला होता.

२०१३: भारताच्या विश्वनाथन आनंदला पराभूत करुन नॉर्वेचा २२ वर्षीय मॅग्नस कार्लसन हा सर्वात लहान वयाचा बुद्दीबळ विश्वविजेता बनला.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१८०८: थॉमस कूक – पर्यटन व्यवस्थापक (मृत्यू: १८ जुलै १८९२)

१८६४: भारताची प्रथम महिला चिकित्सक रुक्माबाई यांचा जन्म झाला होता.

१८७७: एफ.सी. बार्सिलोनाचे संस्थापक जोन गॅम्पर यांचा जन्म. (मृत्यू: ३० जुलै १९३०)

१८८०: केशव लक्ष्मण दफ्तरी – ज्योतिर्गणितज्ञ, संशोधक आणि बुद्धीप्रामाण्यवादी विचारवंत, वैदिक वाङ्‍मय, वेदान्त तत्त्वज्ञान आणि होमिओपाथी हे त्यांच्या संशोधनाचे विषय होते. अकरा उपनिषदांचे त्यांनी मराठीत भाषांतर केले. (मृत्यू: १९ फेब्रुवारी १९५६)

१८८२: प्रसिध्द भारतीय उद्योजक वालचंद हिराचंद जन्म झाला होता.

१८८५: हिराबाई पेडणेकर – पहिल्या स्त्री नाटककार, गायिका, संगीतकार (मृत्यू: १८ आक्टोबर १९५१)

१८९०: चार्ल्स द गॉल – फ्रेन्च राष्ट्राध्यक्ष आणि सेनापती (मृत्यू: ९ नोव्हेंबर १९७०)

बोरिस बेकर
बोरिस बेकर

१८९९: भारतीय स्वतंत्रता सेनानी शहीद लक्ष्मण नायक यांचा जन्म झाला होता.

१९०९: द. शं. तथा ’दादासाहेब’ पोतनीस – स्वातंत्र्यसैनिक, विचारवंत, समाजसेवक आणि पत्रकार (मृत्यू: २७ ऑगस्ट १९९८)

१९१३: डॉ. लक्ष्मीकांत झा – आंतरराष्ट्रीय कीर्तीचे अर्थतज्ञ, मुत्सद्दी, कुशल प्रशासक, रिझर्व बँकेचे गव्हर्नर, जम्मू काश्मीरचे राज्यपाल व भारताचे अमेरिकेतील राजदूत (मृत्यू: १६ जानेवारी १९८८ – पुणे)

१९१५: किशोर साहू – चित्रपट अभिनेते, निर्माते व दिग्दर्शक (मृत्यू: २२ ऑगस्ट १९८०)

मुलायमसिंग यादव
मुलायमसिंग यादव

१९१६: भारतीय स्वतंत्रता सेनानी शांती घोष यांचा आजच्याच दिवशी जन्म झाला होता.

१९२२: साहित्यिक त्र्यं. वि. सरदेशमुख यांचा जन्म.

१९२६: मेडएक्स कॉर्पोरेशनचे संस्थापक आर्थर जोन्स यांचा जन्म. (मृत्यू: २८ ऑगस्ट २००७)

१९३९: मुलायमसिंग यादव – उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री, केंद्रीय संरक्षण मंत्री

मार्वन अट्टापट्टू
मार्वन अट्टापट्टू

१९४३: बिली जीन किंग – अमेरिकन लॉनटेनिस पटू

१९६७: बोरिस बेकर – ६ वेळा ग्रँड स्लॅम जिंकलेला जर्मन लॉनटेनिस पटू

१९६८: पीएचपी (PHP) प्रोग्रामिंग लँग्वेजचे निर्माते रासमुस लेर्दोर्फ यांचा जन्म.

१९७०: मार्वन अट्टापट्टू – श्रीलंकेचा क्रिकेट कर्णधार

१९८०: नेपस्टरचे संस्थापक शॉन फॅनिंग यांचा जन्म.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

१८८१: स्वतंत्रता सेनानी अहमदुल्लाह यांचा मृत्यू झाला होता.

१९०२: फ्रेडरिक क्रूप्प – जर्मन उद्योगपती (जन्म: १७ फेब्रुवारी १८५४)

१९२०: एकनाथ पांडुरंग रेंदाळकर – कवी व संपादक (जन्म: ? ? १८८७)

रविंद्र सदाशिव भट – गीतकार
रविंद्र सदाशिव भट – गीतकार

१९४४: खगोलशास्त्रज्ञ सर आर्थर एडिग्टन यांचे निधन.

१९५७: पार्श्वनाथ आळतेकर – नट, दिग्दर्शक व नाट्यशिक्षक (जन्म: १४ सप्टेंबर १८९७)

१९६३: अल्डस हक्सले – इंग्लिश लेखक (जन्म: २६ जुलै १८९४)

१९६३: अमेरिकेचे ३५ वे राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांची हत्या (जन्म: २९ मे १९१७)

१९८०: मे वेस्ट – हॉलिवूडमधील अभिनेत्री, गायिका, संवादलेखिका व सौंदर्यवती (जन्म: १७ ऑगस्ट १८९३)

२०००: डॉ. हरी जीवन तथा एच. जे. अर्णीकर – अणूरसायनशास्त्रज्ञ, प्राध्यापक (जन्म: ६ आक्टोबर १९१२?)

पी. गोविंद पिल्लई – मार्क्सवादी कम्युनिस्ट नेते
पी. गोविंद पिल्लई – मार्क्सवादी कम्युनिस्ट नेते

२००२: हैदराबाद मुक्तिसंग्रामचे अध्वर्यू गोविंदभाई श्रॉफ यांचे निधन.

२००८: रविंद्र सदाशिव भट – गीतकार (जन्म: १७ सप्टेंबर १९३९)

२०१२: पी. गोविंद पिल्लई – मार्क्सवादी कम्युनिस्ट नेते (जन्म: २३ मे १९२६)

२०१६: प्रसिध्द भोजपुरी व हिंदी भाषेचे साहित्यकार विवेकी राय यांचे निधन झाले होते.

२०१६: भारतीय गायक एम. बालमुलकृष्ण यांचे निधन. (जन्म: ६ जुलै १९३०)

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *