२१ नोव्हेंबर दिनविशेष - 21 November in History
२१ नोव्हेंबर दिनविशेष - 21 November in History

हे पृष्ठ 21 नोव्हेंबर रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

या पृष्ठावर, आम्ही २१ नोव्हेंबर  रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.

On this page, we will list all historical events that have occurred on 21 November. The students can refer them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

  • महाराष्ट्र राज्य हुतात्मा दिन
  • सेना दिवस (बांगला देश)
  • सेना दिवस (ग्रीस)
World Television Day

World Television Day

महत्त्वाच्या घटना:

१८७७: थॉमस एडिसन यांनी फोनोग्राफ शोधाची घोषणा केली.

१९०६: चीन ने आजच्याच दिवशी १९०६ साली अफिम च्या व्यापारावर बंदी घातली होती.

१९११: संसदेच्या निवडणुकीत उभे राहता यावे आणि मतदानाचा अधिकार मिळावा म्हुणुन लंडनमध्ये स्त्रियांनी केलेल्या मोर्च्यावर व्हाईट हॉल येथे घोडेस्वार पोलिसांनी लाठी हल्ला केला.

१९४२: राजा नेने दिग्दर्शित ’दहा वाजता’ हा ’प्रभात’चा चित्रपट मुंबईत प्रदर्शित झाला.

१९५५: संयुक्त महाराष्ट्रसाठी लढा पुकारला.

१९५६: एकमताने आजच्याच दिवशी प्रस्ताव पारित करून शिक्षक दिनाला मान्यता देण्यात आली होती.

१९६२: भारताचे संरक्षण मंत्री म्हणून यशवंतराव चव्हाण यांची नियुक्ती झाली.

१९६२: भारत चीन युद्ध – भारतीय प्रदेशावर आक्रमण करणार्‍या चीनने १९ नोव्हेंबर रोजी जाहीर केलेली एकतर्फी युद्धबंदी अमलात आली.

१९६३: केरळ येथील थुंबा या प्रक्षेपण केंद्रावरून आजच्याच दिवशी अग्निबाण सोडून भारतीय अंतराळ कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली होती.

१९७१: बांगलादेश मुक्ती संग्राम – भारतीय सैन्य व बांगलादेश मुक्ती वाहिनी यांनी गरीबपूरच्या लढाईत पाकिस्तानी सैन्याचा दारुण पराभव केला.

१९७२: दक्षिण कोरियाने नवीन संविधान अंगीकारले.

१९८६: मध्य आफ्रिकी गणराज्याने आजच्याच दिवशी संविधानाचा स्वीकार केला होता.

२००२: आजच्याच दिवशी जफर उल्ला खान जमाली हे पाकिस्तान चे नवे पंतप्रधान म्हणून नियुक्त झाले होते.

२००५: आजच्याच दिवशी श्रीलंका या देशाचे नवे पंतप्रधान म्हणून रत्नसिरी विक्रमनायके यांना नियुक्त करण्यात आले होते.

२००७: तत्कालीन पेप्सिको कार्यकारी अधिकारी इंदिरा नुई यांना अमेरिका भारत व्यापार परिषद मध्ये समाविष्ट करण्यात आले होते.

२००८: आजच्याच दिवशी भारताचे पूर्व पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी जागतिक महामंदीच्या परिस्थितीत भारत ८ टक्के इतका विकास दर गाठेल असा विश्वास व्यक्त केला होता.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१६९४: व्होल्टेअर – फ्रेन्च तत्त्वज्ञ व लेखक (मृत्यू: ३० मे १७७८)

प्रेम नाथ
प्रेम नाथ

१८७२: प्रसिध्द राजस्थानी कवी व स्वंतत्रता सेनानी यांचा आजच्याच दिवशी जन्म झाला होता.

१८९९: ओडिशाचे पहिले मुख्यमंत्री हरेकृष्णा महाबत यांचा जन्म. (मृत्यू: २ जानेवारी १९८७)

१९१०: चीनी भाषेतील लेखक छ्यान चोंग्शू यांचा जन्म.

१९१६: परमवीर चक्र प्राप्त भारतीय सैनिक यदुनाथ सिंह यांचा जन्म आजच्याच दिवशी झाला होता.

ईशा करवडे – भारतीय बुद्धीबळपटू
ईशा करवडे – भारतीय बुद्धीबळपटू

१९२६: प्रेम नाथ – हिन्दी चित्रपटात नायक व खलनायकाच्या भूमिका गाजवणारे अभिनेते (मृत्यू: ३ नोव्हेंबर १९९२)

१९२७: शं. ना. नवरे – लेखक (मृत्यू: २५ सप्टेंबर २०१३)

१९३३: हिंदी भाषेचे प्रमुख कथाकार ज्ञान रंजन यांचा जन्म आजच्या दिवशी झाला होता.

१९४१: गुजरात राज्याची पहिली महिला मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांचा जन्म आजच्या दिवशी झाला होता.

१९८७: ईशा करवडे – भारतीय बुद्धीबळपटू

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

डॉ. मोहम्मद अब्दूस सलाम – भौतिकशास्त्रज्ञ
डॉ. मोहम्मद अब्दूस सलाम – भौतिकशास्त्रज्ञ

१५१७: सिकंदर शाह लोधी याचे आजच्या दिवशी निधन झाले.

१९०८: देशभक्त सत्येंद्रनाथ बोस यांना अलीपूर कारागृहात फाशी.

१९२१: राजनीती चे ज्ञाते व स्वतंत्रता सेनानी अविनाशलिंगम चेट्टीयार यांचे आजच्या दिवशी निधन झाले.

१९६३: चिं. वि. जोशी – विनोदी लेखक व पाली साहित्याचे संशोधक (जन्म: १९ जानेवारी १८९२)

१९७०: सर चंद्रशेखर वेंकट रमण – नोबेल पारितोषिक (१९३०) विजेते भारतीय भौतिकशास्त्रज्ञ (जन्म: ७ नोव्हेंबर १८८८)

सर चंद्रशेखर वेंकट रमण
सर चंद्रशेखर वेंकट रमण

१९९६: डॉ. मोहम्मद अब्दूस सलाम – भौतिकशास्त्रज्ञ, नोबेल पारितोषिक विजेते (१९७९) एकमेव पाकिस्तानी, विज्ञानातील नोबेल पारितोषिक विजेते एकमेव मुस्लिम (जन्म: २९ जानेवारी १९२६ – संतोकदास, साहिवाल, पंजाब, पाकिस्तान)

१९९७: आचार्य बाळाराव सावरकर यांचे निधन.

२०१५: भारतीय-पाकिस्तानी कवी आणि राजकारणी अमीन फहीम यांचे निधन. (जन्म: ४ ऑगस्ट १९३९)

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *