हे पृष्ठ 24 नोव्हेंबर रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.
या पृष्ठावर, आम्ही २४ नोव्हेंबर रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.
On this page, we will list all historical events that occurred on 24 November. The students can refer to them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.
जागतिक दिवस:
–
महत्त्वाच्या घटना:
१४३४: थेम्स नदी पूर्णपणे गोठली.
१७५०: महाराणी ताराबाईंकडून छत्रपती राजारामास कैद
१८५९: चार्ल्स डार्विनने आपला उत्क्रांतीचा सिद्धांत मांडणारा जगप्रसिद्ध ग्रंथ ’ओरिजिन ऑफ द स्पिशिज’ प्रकाशित केला.
१८६४: जळगाव नगरपालिकेची स्थापना.
१९२६: आजच्याच दिवशी प्रख्यात तत्वज्ञानी महर्षी अरविंद यांना पूर्ण सिद्धी ची प्राप्ती झाली होती.
१९४४: दुसरे महायुद्ध – ८८ अमेरिकन विमानांनी टोकियोवर तुफानी बॉम्बवर्षाव केला.
१९६९: अपोलो-१२ चंद्रावर उतरले.
१९७१: डी. बी. कुपर याने चोरलेल्या २ लाख अमेरिकन डॉलर सह नॉर्थवेस्ट ओरीएंट एरलाईन्सच्या विमानातून पॅराशूटच्या सहाय्याने उडी मारली. परंतु कुपारचा अद्याप शोध लागलेला नाही.
१९७६: तुर्कस्तान च्या पूर्व भागात भीषण भूकंप. यात ४ ते ५ हजार लोकांचे निधन.
१९८६: आजच्याच दिवशी तामिळनाडू राज्यातील विधानसभेत एकाच वेळी सर्वच सदस्यांना सदनातून बरखास्त करण्यात आले होते.
१९८८: पक्षांतर बंदी कायद्यान्वये पहिल्यांदा लोकसभा सदस्य लालदुहोमा यांना अयोग्य घोषित करण्यात आले होते.
१९९२: कवी विंदा करंदीकर यांची साहित्यक्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल कोणार्क पुरस्कारासाठी निवड जाहीर
१९९२: वैज्ञानिक संशोधनासाठीचा ’जी. डी. बिर्ला पुरस्कार’ हैदराबाद विद्यापीठातील प्राध्यापक गोवर्धन मेहता यांना जाहीर
१९९२: देवगड तालुक्यातील कवी माधव यांना पहिला ‘कवी माधव पुरस्कार‘ जाहीर
१९९६: इंडियन सायन्स काँग्रेस असोसिएशनचा ’आशुतोष मुकर्जी स्मृती पुरस्कार’ ख्यातनाम अणूशास्त्रज्ञ राजा रामण्णा यांना जाहीर
१९९८: समाजसेविकांना दिला जाणारा ‘अहल्यादेवी होळकर पुरस्कार‘ आंबेडकरी चळवळीतील नेत्या आणि कार्यकर्त्या शांताबाई दाणी यांना
२०००: भारत आणि चीन दरम्यान असलेल्या प्रत्यक्ष ताबारेषेपैकी ५४५ किमी भागाच्या तपशीलवार नकाशांची प्रथमच देवाणघेवाण करण्यात आल्याचे परराष्ट्रमंत्री जसवंतसिंह यांनी जाहीर केले.
२००१: नेपाळ या देशात आजच्याच दिवशी स्थानिक पोलीस ,सैन्य व माओवादी यांच्यात चकमक होऊन ३८ पोलीस व सैनिक मारले गेले होते.
२००८: आजच्याच दिवशी मालेगाव बॉम्बस्फो टातील संशयित आरोपी साध्वी प्रज्ञा सिंह यांनी ए टी एस या दहशतवाद विरोधी शोध पथकावर अश्लील चलचित्र दाखविल्याचा आरोप लावला होता.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
१८०६: रग्बी फुटबॉलचे निर्माते विल्यम वेबल एलिस यांचा जन्म. (मृत्यू: २४ जानेवारी १८७२)
१८८१: स्वाधीनता सेनानी छोटूराम यांचा आजच्या दिवशी जन्म झाला होता.
१८८१: डेप्युटी कमिशनर बनणारे पहिले भारतीय कावसजी पेटिगारा यांचा जन्म झाला होता.
१८९४: हर्बर्ट सटक्लिफ – इंग्लिश क्रिकेटपटू (मृत्यू: २२ जानेवारी १९७८)
१८९९: राजस्थान राज्याचे प्रथम मुख्यमंत्री व राजनेते हिरा लाल शास्त्री यांचा जन्म झाला होता.
१९१४: लिन चॅडविक – ब्रिटिश शिल्पकार, लोखंड, पोलाद, पितळ, प्लॅस्टर, काच आदी माध्यमांचा उपयोग करुन त्यांनी शिल्पे घडविली. (मृत्यू: २५ एप्रिल २००३)
१९३७: मराठी भाषेतील लेखक, कवी, नाटककार आणि समीक्षक केशव मेश्राम यांचा जन्म.
१९४१: भारतीय-इंग्लिश ड्रमर आणि गीतकार पेट बेस्ट यांचा जन्म.
१९५५: इयान बोथॅम – इंग्लंडचा क्रिकेटपटू
१९६१: अरुंधती रॉय – लेखिका व मानवाधिकार कार्यकर्त्या
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
१६७५: गुरू तेग बहादूर – शिखांचे नववे गुरू, विविध विषयांवर त्यांनी सुमारे ११६ पदे रचली आहेत. (१ एप्रिल १६२१)
१९१६: मॅक्सिम तोफेचे शोधक हिराम मॅक्सिम यांचे निधन. (जन्म: ५ फेब्रुवारी १८४०)
१९४८: मदर्स डे च्या संस्थापिका अॅन्ना जर्व्हिस यांचे निधन. (जन्म: १ मे १८६४)
१९६३: ली हार्वे ओस्वाल्ड – राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडीचा मारेकरी (जन्म: १८ आक्टोबर १९३९)
१९६३: महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री (२० नोव्हेंबर १९६२ ते २४ नोव्हेंबर १९६३), मारोतराव सांबशिव कन्नमवार यांचे कार्यालयात असतानाच निधन झाले. (जन्म: १० जानेवारी १९००)
२००३: उमा देवी खत्री उर्फ ’टुन टुन’ – अभिनेत्री व गायिका (जन्म: १ जानेवारी १९२३)
२००४: आर्थर हॅले – इंग्लिश कादंबरीकार (जन्म: ५ एप्रिल १९२०)
२०१४: भारतीय राजकारणी मुरली देवरा यांचे निधन. (जन्म: १० जानेवारी १९३७)