हे पृष्ठ 15 ऑगस्ट रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.
या पृष्ठावर, आम्ही १५ ऑगस्ट रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.
On this page, we will list all historical events that occurred on 15 August. The students can refer them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.
जागतिक दिवस:
भारतीय स्वातंत्र्य दिन
महत्त्वाच्या घटना:
१५१९: पनामा सिटी शहराची स्थापना झाली.
१६६४: कुडाळ प्रांतात शिवाजी महाराजांनी खवासखानाला (दुसर्यांदा) पराभूत केले.
१८२४: अमेरिकेतील गुलामगिरी पासून सुटका झालेल्या व्यक्तींनी लायबेरिया हे राष्ट्र निर्माण केले.
१८६२: मद्रास उच्च न्यायालयाची स्थापना
१९१४: पनामा कालव्यातुन एस. एस. अॅनकॉन हे पहिले व्यापारी जहाज पार झाले.
१९२९: ग्राफ झेपेलिन हा संशोधक ’झेपेलिन’ बलूनमधून जगप्रवासासाठी रवाना
१९४५: दुसरे महायुद्ध – जपानने शरणागती पत्करली.
१९४७: ब्रिटिश राजवट संपून भारत स्वतंत्र झाला. देशाची फाळणी झाली. पश्चिम पंजाब, सिंध,बलुचिस्तान, वायव्य सरहद्द प्रांत व पूर्व बंगाल हे पाकिस्तानात समाविष्ट झालेले प्रदेश सोडून संस्थाने वगळता राहिलेला प्रदेश स्वतंत्र भारत म्हणून अस्त्त्त्वात आला.
१९४७: भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून पं. जवाहरलाल नेहरू यांनी सूत्रे हाती घेतली.
१९४७: पाकिस्तानचे निर्माते मुहम्मद अली जिना यांचा पाकिस्तानचे पहिले गव्हर्नर जनरल म्हणून कराची येथे शपथविधी झाला.
१९४८: दक्षिण कोरिया या देशाची निर्मिती झाली.
१९६०: कॉँगो देश फ्रांसपासून स्वतंत्र झाला.
१९७१: अमेरिकन डॉलरचे सोन्याशी असलेले संधान खंडित झाले.
१९७१: बहरैन देशाला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य मिळाले.
१९७५: बांगला देशात लष्करी उठाव होऊन बांगला देशाचे संस्थापक शेख मुजीबूर रहमान व त्यांच्या कुटुंबीयांची हत्या करण्यात आली.
१९८२: भारतात रंगीत दूरचित्रवाणीच्या प्रसारणास सुरूवात झाली.
१९८८: पंतप्रधान राजीव गांधी यांनी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणानंतर ‘मिले सुर मेरा तुम्हारा‘ हे गाणे दूरदर्शनवरुन पहिल्यांदाच प्रसारित करण्यात आले.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
१७६९: नेपोलिअन बोनापार्ट – फ्रान्सचा सम्राट, असामान्य सेनापती आणि कर्तबगार प्रशासक (मृत्यू: ५ मे १८२१ – सेंट हेलेना)
१७९८: भारतीय योद्धा संगोली रायन्ना यांचा जन्म. (मृत्यू: २६ जानेवारी १८३१)
१८६५: रेकी चे निर्माते मिकाओ उस्ईई यांचा जन्म. (मृत्यू: ९ मार्च १९२६)
१८६७: गणपतराव जोशी – रंगभूमीवरील असामान्य अभिनेते, शेक्सपियरच्या नाटकांतील त्यांच्या भूमिका अतिशय गाजल्या होत्या (मृत्यू: ७ मार्च १९२२)
१८७२: योगी अरविंद घोष – क्रांतिकारक, तत्त्वचिंतक, योगी व कवी (मृत्यू: ५ डिसेंबर १९५० – पाँडिचेरी)
१८७३: भारतीय पुरातात्त्विक व इतिहासकार रामप्रसाद चंदा यांचा जन्म. (मृत्यू: २८ मार्च १९४२)
१९०४: मोटार व्हीलचेअर चे शोधक जॉर्ज क्लाईन यांचा जन्म. (मृत्यू: ४ नोव्हेंबर १९२२)
१९१२: ’सूर रंग’ उस्ताद अमीर खॉं – इंदौर घराण्याचे संस्थापक व गायक (मृत्यू: १३ फेब्रुवारी १९७४)
१९१३: भगवान रघुनाथ कुळकर्णी ऊर्फ ‘फुलारी’ ऊर्फ ‘बी. रघुनाथ’ – लेखक व कवी (मृत्यू: ७ सप्टेंबर १९५३)
१९१५: इस्मत चुगताई – ऊर्दू कथा व पटकथा लेखिका (मृत्यू: २४ आक्टोबर १९९१)
१९१७: अंबूताई गोरे तथा सरोजिनी मधुसूदन शारंगपाणी – ललित, वैचारिक, नाट्य, काव्य आदी विविध प्रकारांत मोठ्या प्रमाणावर लेखन करणार्या लेखिका. ’दुर्दैवाशी दोन हात’ या त्यांच्या आत्मचरित्रपर पुस्तकाला १९७५ मधे राज्य सरकारचा पुरस्कार मिळाला होता. (मृत्यू: १३ नोव्हेंबर २००१)
१९२२: वामनदादा कर्डक – लोककवी
१९२९: उमाकांत निमराज ठोमरे – साहित्यिक, अनेकांना लिहिते करणारे, वाचकप्रिय ‘वीणा‘ या दर्जेदार मासिकाचे संपादक, बालसाहित्यकार (मृत्यू: ७ आक्टोबर १९९९)
१९४५: बेगम खालेदा झिया – बांगला देशच्या पंतप्रधान
१९४७: राखी – चित्रपट अभिनेत्री
१९५८: सिंपल कपाडिया – अभिनेत्री आणि वेशभूषाकार (मृत्यू: १० नोव्हेंबर २००९)
१९६१: भारतीय अभिनेत्री आणि पटकथालेखक सुहासिनी मणिरत्नम यांचा जन्म.
१९६४: बिल आणि मेलिंडा गेट्स फाऊंडेशन च्या सह-संस्थापिका आणि बिल गेट्स यांच्या पत्नी मेलिंडा गेट्स यांचा जन्म.
१९७१: भारतीय गायक आणि संगीतकार अदनान सामी यांचा जन्म.
१९९२: भारतीय बुद्धिबळपटू भास्करन आडहान यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
१०५७: स्कॉटलंडचा राजा मॅक बेथ यांचे निधन.
१११८: कॉम्नेनस, बायझेन्टाईन सम्राट ऍलेक्सियस (पहिला) यांचे निधन.
१९३५: अमेरिकन अभिनेते विल रॉजर्स यांचे निधन.
१९४२: महादेव देसाई – स्वातंत्र्य लढ्यातील नेते आणि महात्मा गांधींचे स्वीय सहाय्यक (जन्म: १ जानेवारी १८९२)
१९७४: स्वामी स्वरुपानंद यांनी समाधी घेतली (जन्म: १५ डिसेंबर १९०३)
१९७५: शेख मुजीबुर रहमान – बांगलादेशचे संस्थापक व पहिले राष्ट्राध्यक्ष यांची लष्करातील सैनिकांनी त्यांच्या प्रासादावर हत्या केली. (जन्म: १७ मार्च १९२०)
२००४: अमरसिंग चौधरी – गुजरातचे मुख्यमंत्री (जन्म: ३१ जुलै १९४१)
२००५: भारतीय त्वचाशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक बॅंडापुडी वेंकट सत्यनारायण यांचे निधन. (जन्म: ३० जानेवारी १९२७)