हे पृष्ठ 28 एप्रिल रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.
On this page, we will list all historical events that occurred on 28th April. The students can refer to them while preparing for all competitive exams and banking exams.
जागतिक दिवस:
महत्त्वाच्या घटना:
१९१६: आयरिश भारतीय क्रांतिकारक डॉ. एनी बेसेन्ट यांनी ब्रिटीशकालीन भारतात होमरूल चळवळीची स्थापना केली.
१९२०: होमरुल लीगच्या अध्यक्षपदी महात्मा गांधी यांची निवड.
१९२०: अझरबैजानचा सो होम रुविएत युनियनमधे समावेश झाला.
१९३५: रुसची राजधानी मास्को येथे भूमिगत रेल्वे ‘मेट्रो’ सुरू करण्यात आली.
१९६९: चार्ल्स द गॉलने फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षपदाचा राजीनामा दिला.
२००१: डेनिस टिटो हा पैसे देउन अंतराळात प्रवास करणारा पहिला अंतराळ प्रवासी झाला.
२००२: राष्ट्रकुल(कॉमनवेल्थ) किंवा आयरिश नागरिकांद्वारे लिखित इंग्रजी भाषिक लिखित कादंबरी आणि युनाइटेड किंगडममध्ये प्रकाशित होणाऱ्या सर्वोत्कृष्ट मूळ कादंबरीसाठी दरवर्षी देण्यात येणारा ‘मैन बुकर पुरस्कार’ (साहित्यिक पुरस्कार) चे नाव बदलून “मैन प्राइज फॉर फिक्शन” असे करण्यात आले.
२००३: ऍपल कम्प्यूटर इन्क. ने आयट्यून्स स्टोअर प्रकाशित केले.
२००८: भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) ने ‘पीएसएलव्ही-सी ९’ या उपग्रहाचे प्रक्षेपण करून नवीन इतिहास रचला.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
१७५८: जेम्स मोन्रो – अमेरिकेचे ५ वे राष्ट्राध्यक्ष (मृत्यू: ४ जुलै १८३१)
१७९१: शीख साम्राज्य शासक महाराजा रणजितसिंग यांच्या खालसा सेनेचे सेनापती हरीसिंह नलवा यांचा जन्मदिन.
१८५४: वासुदेव गणेश तथा वासुकाका जोशी – लोकमान्य टिळकांचे निकटचे सहकारी, चित्रशाळेचे विश्वस्त (मृत्यू: १२ जानेवारी १९४४)
१८५६: वासुकाका जोशी या नावाने प्रसिद्ध असलेले भारतीय स्वातंत्र्य सेनानी, तसचं, लोकमान्य टिळक यांचे निकटवर्तीय व चित्रशाळेचे विश्वस्त वासुदेव गणेश जोशी यांचे निधन.
१९०८: ऑस्ट्रियाचे व्यापारी व नाझीविरोधी ऑस्कार शिंडलर यांचा जन्म.
१९१६: प्रसिद्ध लक्झरी स्पोर्ट्स कार लॅम्बोर्गिनी चे निर्माते फारूशियो लॅम्बोर्गिनी यांचा इटली येथे जन्म. (मृत्यू: २० फेब्रुवारी १९९३)
१९२९: भारतीय चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध वेशभूषाकार भानू अथैया यांचा जन्मदिन.
१९३१: मधु मंगेश कर्णिक, मराठी कथाकार, कादंबरीकार, कवी, संवादलेखक.
१९३७: सद्दाम हुसेन – इराकी हुकूमशहा व इराकचे ५ वे अध्यक्ष (मृत्यू: ३० डिसेंबर २००६)
१९४२: माईक ब्रेअर्ली – इंग्लिश क्रिकेटर
१९६८: अँडी फ्लॉवर – झिम्बाब्वेचा क्रिकेटपटू
१९७१: एम्मे एंटरटेनमेंट या मोशन पिक्चर प्रॉडक्शन कंपनीचे सह-संस्थापक व सेव्ह द टाईगर या संस्थेचे सल्लागार निकील अडवाणी यांचा जन्मदिन.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
१७२६: थॉमस पिट, चेन्नईचा ब्रिटीश गव्हर्नर.
१७४०: थोरले बाजीराव पेशवे ऊर्फ श्रीमंत बाजीराव बल्लाळ बाळाजी भट यांचे नर्मदातीरी रावेरखेडी या ठिकाणी निधन झाले. (जन्म: १८ ऑगस्ट १७००)
१७४०: महाराजा छत्रसाल यांची कन्या आणि मराठा शासक पेशवा बाजीराव प्रथम यांची दुसऱ्या पत्नी मस्तानी यांचे निधन.
१९०३: भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित या विषयांमध्ये आपले महत्वपूर्ण योगदान देणारे अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ जोशिया विलार्ड गिब्स यांचे निधन.
१९४५: इटलीचा हुकूमशहा बेनिटो मुसोलिनी याचा वध (जन्म: २९ जुलै १८८३)
१९७८: अफगाणिस्तानचे पहिले अध्यक्ष मोहम्मद दाऊद खान यांचे निधन. (जन्म: १८ जुलै १९०९)
१९९२: डॉ. विनायक कृष्ण गोकाक – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कन्नड साहित्यिक, शिक्षणतज्ञ व इंग्रजी वाङ्मयाचे गाढे अभ्यासक (जन्म: ९ ऑगस्ट १९०९)
१९९८: रमाकांत देसाई – जलदगती गोलंदाज व राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्ष (जन्म: २० जून १९३९)