२४ ऑगस्ट दिनविशेष - 24 August in History
२४ ऑगस्ट दिनविशेष - 24 August in History

हे पृष्ठ 24 ऑगस्ट रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

या पृष्ठावर, आम्ही २४ ऑगस्ट रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.

On this page, we will list all historical events that occurred on 24 August. The students can refer them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

महत्त्वाच्या घटना:

७९: ७९ई.पुर्व : इटलीतील माउंट व्हेसुव्हियस ज्वालामुखीचा उद्रेक. पॉम्पेई, हर्क्युलेनियम स्टेबी ही शहरे राखेखाली दडपली जाऊन नष्ट.

१४५६: जर्मनीतील मेन्झ येथे जोहान्स गुटेनबर्ग(Johannes Gutenber) यांनी बायबल ग्रंथाच्या छपाई काम पूर्ण केलं.

थॉमस अल्वा एडिसन
थॉमस अल्वा एडिसन

१६०८: ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीचा पहिला प्रतिनिधी सुरत येथे दाखल झाला.

१६९०: कोलकाता शहराची स्थापना.

१६९९: ईस्ट इंडिया कंपनीने विकत घेतलेल्या कोलकाता शहराला प्रेसिडेंसी शहर म्हणून विकसित करण्यास सुरुवात केली तेव्हा त्यांनी त्या शहराचे नाव बदलून कलकत्ता असे ठेवले.

१८७५: कॅप्टन मॅथ्यू व्हेब इंग्लिश खाडी पोहणारे पहिला व्यक्ती ठरले.

१८९१: थॉमस अल्वा एडिसनने चलचित्र कॅमेर्‍याचे पेटंट घेतले.

एडिथ सॅम्पसन
एडिथ सॅम्पसन

१९५०: एडिथ सॅम्पसन हा संयुक्त राष्ट्रात जाणारा पहिला कृष्णवर्णीय अमेरिकन प्रतिनिधी ठरला.

१९३६: ऑस्ट्रेलियन अंटार्क्टिक प्रदेश तयार करण्यात आला.

१९६६: रशियन बनावटीचे लूना-११ हे मानवविरहित यान चांद्रमोहिमेवर निघाले

१९६९: भारतीय राजकारणी नेते वी. वी. गिरी यांची भारताच्या राष्ट्रपती पदी निवड करण्यात आली. ते भारताचे चौथे राष्ट्रपती होते.

१९७४: साली श्रीमती इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळात कॉंग्रेस नेता फखरुद्दीन अली अहमद यांची भारताच्या पाचव्या राष्ट्रपती पदी नियुक्ती करण्यात आली.

१९९१: युक्रेनने स्वत:ला (सोविएत युनियनपासुन) स्वतंत्र घोषित केले.

१९९५: मायक्रोसॉफ्टने विंडोज ९५ ही संगणकप्रणाली प्रकाशित केली.

१९९८: एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका या जगप्रसिद्ध विश्वकोशाच्या आयातीवर भारत सरकारने बंदी घातली.

२००१: सरोद वादक अमजद अली खान यांना मध्य प्रदेश सरकारचातानसेन पुरस्कार जाहीर.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१८३३: गुजराथी लेखक समाजसुधारक नर्मदाशंकर दवे ऊर्फ नर्मद यांचा जन्म. (मृत्यू: २६ फेब्रुवारी १८८६)

१८७२: केसरी वृत्तपत्राचे संपादक तसेच कायदेमंडळाचे सभासद न. चिं. केळकर यांचा जन्म. (मृत्यू: १४ ऑक्टोबर १९४७)

शिवराम हरी 'राजगुरू' – क्रांतिकारक
शिवराम हरी ‘राजगुरू’ – क्रांतिकारक

१८८०: निरक्षर पण प्रतिभावान कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचा जन्म. (मृत्यू: ३ डिसेंबर १९५१)

१८८८: स्वतंत्र भारतातील मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री बाळ गंगाधर खेर यांचा जन्म. (मृत्यू: ८ मार्च १९५७)

१८८८: मार्टिन बेकर एरिक कंपनी चे सहसंस्थापक वेलेंटाइन बेकर यांचा जन्म. (मृत्यू: १२ सप्टेंबर १९४२)

१९०८: क्रांतिकारक शिवराम हरी राजगुरू यांचा जन्म. (मृत्यू: २३ मार्च १९३१)

संयुक्ता पाणिग्रही – ओडीसी नर्तिका
संयुक्ता पाणिग्रही – ओडीसी नर्तिका

१९१७: किराणा घराण्याचे गायक पं. बसवराज राजगुरू यांचा जन्म.

१९१८: केन्द्रीय परराष्ट्रमंत्री सिकंदर बख्त यांचा जन्म. (मृत्यू: २३ फेब्रुवारी २००४)

१९२०: पद्मश्री व पद्मभूषण पुरस्कार सन्मानित हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील किराणा घराण्याचे प्रसिद्ध शास्त्रीय गायक पं. बसवराज राजगुरू यांचा जन्मदिन.

१९२७: नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ हॅरी मार्कोवित्झ यांचा जन्म.

१९२७: भारतीय अभिनेत्री आणि निर्मात्या अंजली देवी यांचा जन्म.

१९२९: यासर अराफत – नोबेल पारितोषिक विजेते पॅलेस्टाईनचे नेते (मृत्यू: ११ नोव्हेंबर २००४)

पॉलो कोहेलो
पॉलो कोहेलो

१९३२: रावसाहेब गणपराव जाधव – मराठीतील व्यासंगी साहित्यसमीक्षक. ‘महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळा’चे तिसरे अध्यक्ष व ‘मराठी विश्वकोशा’चे प्रमुख संपादक (२००१ – २००३).

१९४४: संयुक्ता पाणिग्रही – ओडीसी नर्तिका (मृत्यू: २४ जून १९९७)

१९४५: डब्ल्यू.डब्ल्यू.ई. (WWE) चे सहसंस्थापक विन्स मॅकमेहन यांचा जन्म.

१९४७: पॉलो कोहेलो – ब्राझिलियन लेखक

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

कल्याणजी वीरजी शाह
कल्याणजी वीरजी शाह

१९२५: सर रामकृष्ण गोपाळ भांडारकर – संस्कृत पण्डित, प्राच्यविद्या संशोधक, भाषाशास्त्रज्ञ, इतिहास संशोधक व समाजसुधारक (जन्म: ६ जुलै १८३७)

१९६७: कैसर शिपयार्ड आणि कैसर एल्युमिनियम चे संस्थापक हेन्री जे. कैसर यांचे निधन. (जन्म: ९ मे १८८२)

१९६८: आधुनिक भारताचे अग्रगण्य विचारवंत आणि सामाजिक वैज्ञानिक, अर्थशास्त्र आणि समाजशास्त्रचे प्राध्यापक तसचं, लखनौ विद्यापीठाचे माजी कुलगुरू राधाकमल मुखर्जी यांचे निधन.

१९९३: शतायुषी क्रिकेटमहर्षी प्रा. दिनकर बळवंत तथा दि. ब. देवधर – प्रथमश्रेणीचे ६२ सामने, १०० डाव, ११ वेळा नाबाद, ९ शतके, ३९५१ एकूण धावा, ४४.३९ सरासरी. भारत सरकारतर्फे त्यांना पद्मश्री (१९६५) व पद्मविभूषण (१९९१) या पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते. (जन्म: १४ जानेवारी १८९२)

२०००: कल्याणजी वीरजी शाह – सुमारे तीन दशके रसिकांवर आपल्या सुरावटीची मोहिनी घालणार्‍या ’कल्याणजी-आनंदजी’ या संगीतकार द्वयीतील ज्येष्ठ बंधू (जन्म: ३० जून १९२८)

२००८: चिनी भाषेमधील कवी, लेखक, पत्रकार वै वै यांचे निधन.

२०१८: जॉन मैककेन, जॉन सिडनी मॅककेन तिसरा हा एक अमेरिकन राजकारणी व ॲरिझोना राज्यातून वरिष्ठ सेनेटर.(जन्मतारीख: २९ ऑगस्ट, १९३६)

२०१९: भारताचे केंद्रीय अर्थमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांचे निधन. (जन्म: २८ डिसेंबर १९५२)

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *