हे पृष्ठ 24 जून रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

या पृष्ठावर, आम्ही २४ जून रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.

On this page, we will list all historical events that have occurred on 24 June. The students can refer them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

महत्त्वाच्या घटना:

चंद्रकांत मांडरे

२००१ : ’आय. एन. एस. विराट’ ही भारतीय नौदलाची एकमेव विमानवाहू नौका आधुनिकीकरणानंतर पुन्हा नौदलात दाखल झाली.

१९९८ : अभिनेते चंद्रकांत मांडरे यांना अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचा ‘चित्रभूषण पुरस्कार’ जाहीर

१९८२ : कर्नाटकातील सर्व शाळांत कन्नड भाषा शिकविण्याची सक्ती करण्यात आली.

१९४० : दुसरे महायुद्ध – फ्रान्स व इटलीमधे शस्त्रसंधी झाली.

१९३९ : सयामचे थायलँड असे नामकरण करण्यात आले.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

मृणाल गोरे

१९२८ : मृणाल गोरे – समाजवादी नेत्या आणि ६ व्या लोकसभेच्या सदस्य (मृत्यू: १७ जुलै २०१२)

१९०८ : गुरू गोपीनाथ – कथकली नर्तक (मृत्यू: ९ आक्टोबर १९८७)

१८९९ : मर्दानी रुप, तिन्ही सप्तकांतुन सहजपणे फिरणारा आवाज या देणग्या लाभलेले व गंधर्वयुगाची स्मृती जागवणारे नटवर्य गोपाळ गोविंद ऊर्फ नानासाहेब फाटक यांचा जन्म (मृत्यू: ८ एप्रिल १९७४)

दामोदर हरी चाफेकर

१८९७ : पण्डित ओंकारनाथ ठाकूर ऊर्फ ’प्रणव रंग’ – गायक व संगीत अभ्यासक, १९५५ मधे पद्मश्री पुरस्काराने सन्मानित (मृत्यू: २९ डिसेंबर १९६७)

१८६९ : दामोदर हरी चाफेकर – चार्ल्स रँड याची हत्या करणारे (मृत्यू: १८ एप्रिल १८९८)

१८६२ : श्रीधर बाळकृष्ण रानडे – रविकिरण मंडळाचे संस्थापक (मृत्यू: २१ मार्च १९७४)

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

संयुक्ता पाणिग्रही

१९९७ : संयुक्ता पाणिग्रही – ओडीसी नर्तिका (जन्म: २४ ऑगस्ट १९४४)

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *