पेशीशास्त्र (Cytology)
पेशीशास्त्र (Cytology)

पेशींच्या अभ्यासाच्या शास्त्राला पेशीशास्त्र (Cytology) असे म्हणतात.

रॉबर्ट हुक यांनी पेशी हे नाव दिले.

पेशीतील विविध घटकांच्या संशोधनानंतर काही जर्मन शास्त्रज्ञानीं विविध सजीवांचे निरीक्षण करून पेशी विषयी आपले विचार मांडले त्यांनाच पेशीसिद्धांत असे म्हणतात.

१) एम. जे. शिल्डेन (1938) २) थिओडोर श्वान यांनी पेशी सिद्धांत मांडला.

पेशींचा आकार अतिशय लहान आहे व उघड्या डोळ्यांनी पेशींचे निरीक्षण करता येत नाही.

पेशींचा आकार मोजण्याचे एकक (μmआहे.

पेशींचा आकार 0.1 μm ते 18 cm असू शकते.

Animal Cell And Plant Cell
Animal Cell And Plant Cell
अ. क्र. सजीव पेशी पेशींचा आकार
१)अमीबाअनियमित (Irregular)
२)स्पायरोगायराआयताकृती (Rectangular)
३)जिवाणूदंडाकृती (Cylindrical)
४)अंडपेशीगोलाकार (Rounded)
५)शुक्रपेशीसर्पिलाकृती (Sprial)
६)तांबड्या पेशीद्विअंतर्वक्री (Bi-Concave)
७)चेतापेशीशाखीय (Branched)
८) मेदपेशीअंडाकृती (Oval)
९)त्वचेतील पेशीस्तंभाकृती (Columnar)
१०)स्नायूपेशीविटाकृती (Bricks Shapes)

पेशींचे प्रकार

 • आदिकेंद्रकी पेशी (Prokaryotic Cell)
 • दृश्यकेंद्रकी पेशी (Eukaryotic Cell)

आदिकेंद्रकी पेशी(Prokaryotic Cell) : 

 • ज्या पेशींमध्ये स्पष्ट दिसणारे केंद्रक आणि पेशी अंगके नसतात त्या पेशींना आदिकेंद्रकी पेशी म्हणतात.
 • आदिकेंद्रकी पेशी लहान आकाराच्या असून त्यांचा आकार 1-10 μm असतो.
 • पेशी द्रव्य अंडी केंद्रक द्रव्य एकच असतात.
 • आदिकेंद्रकी पेशीतील केंद्रकाला आवरण नसते.
 • या पेशींमध्ये गुणसूत्रांची एकच जोडी असते.
 • DNA चा रेणू केंद्रकाच्या अस्पष्ट भागात असतो.
 • DNA असलेल्या अस्पष्ट भागाला केंद्रकसदृश (Nucleoid) असे म्हणतात.
 • आदिकेंद्रकी पेशींमध्ये तंतूकणिका नसतात.
 • रायबोसोम्सचे कण असतात.

उदा: जिवाणू (Bacteria), नील- हरित शैवाल 

दृश्यकेंद्रकी पेशी (Eukaryotic Cell)

 • ज्या पेशींमध्ये स्पष्ट दिसणारे केंद्रक आणि पेशी अंगके असतात अश्या पेशींना दृश्यकेंद्रकी पेशी असे म्हणतात.
 • दृश्यकेंद्रकी पेशींचा आकार 5-100 μm असतो, व ह्या आकाराने मोठ्या असतात.
 • या पेशींमध्ये गुणसूत्रांच्या अनेक जोड्या असून DNA, RNA च्या शृंखला असतात.
 • वनस्पती आणि प्राणी दोघांमध्ये या पेशी आढळतात.

उदा: अमीबा, शैवाल, वनस्पती, प्राणी, कवक, प्लाझमोडियम.

टीप: मानवी शरीरात 60 ते 90 ट्रिलियन (1 ट्रिलियन =1012 ) पेशी असतात. या सर्व पेशी मिळून पृथ्वीला 4.5 फेऱ्या होतील.
मानवी मेंदू हा सर्वाधिक पेशींपासून बनलेला अवयव आहे.

सर्वात लहान पेशी मायक्रोप्लाझ्मा ग्यलिसेप्टम (0.1 μm)
सर्वात मोठी पेशी शहामृगाचे अंडे (18 cm)
सर्वात लांब पेशी मानवी चेतापेशी (1 meter) असू शकते.
सर्वात मोठा प्राणी ब्लु व्हेल (देवमासा)
सर्वात मोठा वनस्पती सिक्वेया
सर्वात मोठे फुल रॅफ्लेशिया
सर्वात मोठा भूचर प्राणी आफ्रिकन बुश हत्ती
सर्वात मोठे माकड गोरिला
सर्वात हुशार माकड चिंपांझी
सर्वात मोठा सरपटणारा प्राणी समुद्रातील मगर
सर्वात मोठा पक्षी नर शहामृग
सर्वात लहान पक्षी हमिंगबर्ड

पेशींपासून सजीवांचे संघटन झालेले दिसते. पेशींची विशिष्ट रचना असते. या पेशींमार्फत सजीवांच्या जीवनक्रिया घडून येत असतात. त्यासाठी पेशीमध्ये वेगवेगळे घटक असतात. त्यांना पेशींची अंगके म्हणतात.

पेशीरचना: यात खालील गोष्टींचा समावेश होतो.
१) पेशीपटल किंवा प्रद्रव्य पटल (Plasma membrane)
२) पेशी भित्तिका (Cell Wall)
३) पेशीद्रव्य (Cytoplasm)
४) अंगके (Organelles)

1)  पेशीपटल किंवा प्रद्रव्य पटल (Plasma Membrane):  

 • पेशीपटल हे पेशींचे बाह्य आवरण आहे. हे अत्यंत पातळ, लवचिक, पापुद्र्यासारखे असते.
 • पेशीपटल पेशींच्या आतील भागांचे संरंक्षण करते. तसेच पेशींच्या आत येणाऱ्या व बाहेर जाणाऱ्या पदार्थांवर नियंत्रण ठेवते.
 • पेशीपटलामुळे पेशींचा आकार निश्चित राहतो.
 • पेशीपटल तीन थरांचे बनलेले असते. बाहेरील दोन ठार प्रथिनांचे व आतील एक थर मेदाचे असते.

2) पेशी भित्तिका (Cell Wall):

 • पेशी भित्तिका ही फक्त वनस्पती पेशीत आढळते.
 • वनस्पती पेशीत पेशीपटलाच्या बाहेर असलेल्या आवरणाला पेशीभित्तिका म्हणतात.
 • पेशी भित्तिका ही सेल्युलोज पदार्थाची बनलेली असते. यातून पदार्थ आरपार जाऊ शकतात.
 • पेशी भित्तिका मुळे पेशीला भक्कमपणा प्राप्त होतो. त्यामुळे पेशींचा आकार निश्चित होतो, तसेच पेशींच्या आतील घटकांना संरंक्षण मिळते.

3)पेशीरस / पेशीद्रव्य (Cytoplasm):

 • पेशीतील केंद्रकाव्यतिरिक्त द्रवरूप भागास पेशीरस किंवा पेशीद्रव्य असे म्हणतात.
 • पेशी रस म्हणजे पाण्यात विरघळणारे कार्बनी, अकार्बनी पदार्थ, आणि विविध अंगके असणारा अर्धप्रवाही पदार्थ आहे.
 • पेशी विविध अंगकाद्वारे पेशीतील सर्व क्रिया घडवून आणल्या जातात.

4) अंगके (Organelles):

पेशीद्रव्यात विविध अंगके विखुरलेली असतात.

केंद्रक (Nucleus)
आंतर्द्रव्य जालिका (Endoplasmic Reticulum)
रायबोझोम्स (Ribosomes)
हरित लवके (Chloroplasts)
तंतूकणिका (Mitochondria)
गोल्गीकाय/ गॉल्जीपिंड (Golgi Body)
तारक-काय (Centrosomes)
लायकारिका (Lysosomes)
रिक्तिका (Vacuole)
Animal Cell And Plant Cell

Animal Cell And Plant Cell

प्राणी पेशी (Animal Cell)वनस्पती पेशी (Plant Cell)
1. पेशीपटलाभोवती आवरण नसते.1. पेशीपटलाभोवती पेशीभित्तिकेचे आवरण असते.
2. रिक्तिका लहान असतात.2. रिक्तिका मोठ्या असतात.
3. हरितद्रव्य नसते3. हरितद्रव्य असते.

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Join the Conversation

2 Comments

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *