1) केंद्रक (Nucleus):

  • केंद्रक हा पेशीतील मोठयात मोठा मध्यवर्ती घटक आहे.  केंद्रक गोल आकाराचे असते.
  • केंद्रकाभोवती असणारे केंद्रपटल सच्छिद्र असते.
  • केंद्रकात डीएनए पासून बनलेली गुणसूत्रे असतात.
  • डीएनए च्या ठराविक लांबीच्या धाग्यास जनुक म्हणतात.
  • केंद्रक पेशींच्या सर्व कार्यावर नियंत्रण ठेवते.
  • पेशी विभाजनात भाग घेते.
  • केंद्रकातील गुणसूत्रांवरील जनुकांनुसार आनुवंशिक गुण पुढील पिढ्यांमध्ये संक्रमित होतात.

2) आंतर्द्रव्य जालिका (Endoplasmic Reticulum):

  • ही पेशीतील परिवहन संस्था आहे.
  • पेशीद्रव्याच्या आंतर्भागात सूक्ष्म नाभिकांची एक जालिका पसरलेली असते, त्या नलिकापटलाने सीमित असतात. या जालीकेला आंतर्द्रव्य जालिका असे म्हणतात.
  • आंतरजालीकेच्या बाह्यांगावर बारीक सूक्ष्म रायबोझोम्स असतात.

3) रायबोझोम्स (Ribosomes):

  • आंतर्द्रव्य जालीकेवर असतात.
  • ह्या रायबोनल आरएनए आणि प्रथिनांपासून बनलेल्या असतात.
  • प्रथिने संश्लेषणाचे कार्य असते.

4)  हरित लवके (Chloroplasts):

  • हरित लवके फक्त वनस्पती पेशींमध्ये असतात.
  • हरित लवके प्रकाश संश्लेषणाचे कार्य करतात.

5) तंतूकणिका (Mitochondria):

  • तंतूकणिका वेगवेगळ्या आकारांचे असतात.
  • प्रामुख्याने ते लांबट गोल आकाराचे आढळतात.
  • प्रत्येक तंतूकणिकेस (Mitochondria) दुहेरी भित्तिका असून आतील भित्तिकेला घड्या पडलेल्या असतात.
  • पेशीतील अन्नापासून ऊर्जा निर्माण करण्याचे काम मायटोकाँड्रिया करते.
  • पेशीला जरूर असेल तेव्हा ऊर्जा पुरवते, म्हणून याला पेशींचे ऊर्जाकेंद्र म्हणतात.

6) गोल्गीकाय/ गॉल्जीपिंड (Golgi Body) :

  • पेशिरसातील चपटे पटल  असणाऱ्या पिशव्यांना गोल्जीपिंड म्हणतात.
  • यामध्ये विकर साठवले जातात.
  • गोल्गीसंकुलाला पेशीतील स्त्रावी अंगक असे म्हणतात.

7) तारक-काय (Centrosomes):

  • फक्त प्राणी पेशींमध्ये असतात.
  • पेशीविभाजनामध्ये महत्वपूर्ण कार्य करतात.

8) लयकारिका (Lysosomes):

  • लयकारिका साध्या एका आवरणाने बनलेली पिशवी असते त्यांना कोश असेही म्हटले जाते.
  • लयकारिका या गॉल्जीपिंड मार्फत तयार केल्या जातात. यांच्यामध्ये विविध पाचक विकरे (Digestive Enzymes) असतात.
  • वनस्पती पेशीत लयकारिका कमी प्रमाणात असतात.
  • पेशींमध्ये घडत असलेल्या विविध चयापचय क्रियानंतर जटील टाकाऊ कार्बनी पदार्थ तयार होतात. त्या पदार्थांचे पचन लयकारिका करत असतात म्हणून त्यांना पेशीतील टाकाऊ पदार्थाची विल्हेवाट लावणारी संस्था असे म्हणतात.
  • पेशींवर हल्ला करणाऱ्या जिवाणू आणि विषाणूंसारख्या रोगजंतूंना लयकारिका नष्ट करतात म्हणून तिला पचन पिशव्या (Digestive Bags) असेही म्हणतात.
  • पेशींमध्ये बिघाड झाल्यास तेव्हा त्या पेशीतील लयकारिका फुटतात व त्यातील विकरे पेशींचे पचन करतात; म्हणून लायकारिकांना आत्मघाती पिशव्या (Suicidal -Bags) म्हणतात.
  • सजीवांना अन्न न मिळाल्यास लयकारिका पेशीत साठविलेल्या प्रथिने आणि मेद यांचा उपयोग करून शरीरात आवश्यक ऊर्जा पुरविण्याचे कार्य करतात.

9) रिक्तिका (Vacuole):

  • पेशीत नुकतेच आलेले व पेशीतून बाहेर पडण्याच्या मार्गावर असणारे पदार्थ रिक्तिकेत असतात.
  • त्याचप्रमाणे पेशीतील टाकाऊ पदार्थ ही रिक्तिकेत असतात. म्हणून त्यांना Waste Deposite Bags असेही म्हणतात.
  • रिक्तिकांना ठराविक आकार नसतो. रिक्तिका एकेरी आवरणाने बनलेल्या असतात.
  • प्राणी पेशींमध्ये आकाराने लहान आणि एकपेक्षा अधिक तर वनस्पती पेशींमध्ये मोठ्या आकाराच्या एक किंवा अधिक रिक्तिका असतात. रिक्तिकांना स्थायू तसेच द्रव पदार्थाची साठवणूक करणाऱ्या पिशव्या असे म्हणतात.

 

 

 

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Join the Conversation

1 Comment

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *