Tissue
Tissue

उती

व्याख्या: समान रचना असलेल्या व समान कार्य करणाऱ्या पेशींच्या समूहाला उती असे म्हणतात.

उती तयार होण्यासाठी लागणाऱ्या अनेक पेशी पेशीविभाजनातून मिळतात.

उतींचे वर्गीकरण मूलतः वनस्पती उतीप्राणी उती या दोन प्रकारात करता येते.

उतींचे वर्गीकरण दोन प्रकारांमध्ये केले जाते.

१) विभाजी उती (Meristematic tissues):

विभाजी उतींमध्ये सतत विभाजन होत असते त्यामुळे अनेक नवीन पेशींची निर्मिती होत असते. या सर्व नवीन पेशी वनस्पतींमध्ये विविध रचना तयार करतात.

उदा: मुळे, खोड, पाने, फांद्या इत्यादी. वनस्पतींमध्ये विभाजी उती कोणत्या ठिकाणी आढळतात त्यानुसार त्यांचे तीन प्रकार पडतात.

  • प्ररोह विभाजी उती (Apical Meristematic Tissue)
  • आंतरीय विभाजी उती (Internal Meristematic Tissue)
  • पार्श्व विभाजी उती (Lateral Meristematic Tissue)

2) स्थायी उती (Permanent Tissue):

विभाजी उतींमध्ये सतत विभाजन होऊन नवीन तयार झालेल्या पेशींच्या समूहाला स्थायी उती म्हणतात,  कारण त्यांची पेशी विभाजनाची क्रिया थांबलेली असते म्हणून त्यांचे रूपांतर स्थायी उतीमध्ये होते. स्थायी उतींतील पेशींचे कार्य आणि रचना यांच्या आधारे सरल स्थायी उती आणि जटील स्थायी उती हे दोन गट पडतात.

सरल स्थायी उती (Simple Permanent Tissue) या खालील तीन प्रकारच्या असतात.

१) मूल उती (Parenchyma) :

  • मूल उती या जास्तीत जास्त प्रमाणात आढळणाऱ्या उती असून वनस्पतींचे कार्य उती व अवयव मूलतः यांपासून बनलेले असते.
  • मूल उतींमधील पेशी जिवंत असून त्यांच्यात केंद्रक असते.
  • उतींच्या पेशी-पेशींमध्ये मोकळी जागा असते. त्यांना आंतरपेशीय पोकळी (Inter Cellular Spaces) म्हणतात.
  • मूल उतींमधील पेशीमध्ये हरित लवके तयार होऊन प्रकाश संश्लेषण घडून येते. त्यावेळी मूल उतींना Chlorenchyma म्हणतात.
  • कार्य: मूल उती वनस्पतींच्या अनेक जीवन प्रक्रियांमध्ये भाग येतात.
  • उदा: बटाटा, बीट

२) स्थूलकोन उती (Collenchyma):

  • स्थूलकोन उतींमधील पेशी जिवंत असून त्यांच्यात केंद्रक असते.
  • पेशींच्या भिंती कोपऱ्यांना जाड होत असल्याने आंतर पेशीय जागा भरून निघतात.
  • कार्य: लवचिक खोडांना आधार देण्याचे कार्य त्या करतात
  • स्थूल उती पानांच्या देठात, फांद्यांमध्ये आढळतात.

3) दृढ उती (Sclerenchyma):

  • दृढ उतींमधील पेशी मृत असतात आणि त्यांच्यातील केंद्रक नाहीसे झालेले असते.
  • दृढ उती तंतुमय असतात व त्या वनस्पतींच्या सर्व भागात आढळतात.
  • कार्य: वनस्पतींना मजबुती तसेच टणकपणा आणतात.
  • उदा: नारळ, ताग, भुईमूग.

जटील स्थायी उती (Complex Tissues) : 

यामध्ये जलवाहिनी आणि रसवाहिनी या दोन उतींचा समावेश होतो.

1)  जलवाहिनी (Xylem):

जलवाहिनी उती मुळांनी शोषलेले क्षारयुक्त पाणी पानांकडे पोहोचवतात तसेच वनस्पतीला आधार देतात.जलवाहिनी उती चार सरल उतींची बनलेली असते.

जलवाहिनी मूल उती (Xylem parenchyma)

  • जलवाहिनी मूल उतींमधील पेशी जिवंत असतात व अन्नपदार्थ साठवतात.
  • या उतींमधील पेशींच्या भिंती जाड झालेल्या असतात त्यांपासूनच लाकूड तयार होते.
  • या उती जलवहनाचे व आधाराचे काम करतात.
वाहिनिका (Xylem tracheids)

  • वाहिनिका उतींमधील पेशी मृत असतात.
  • या उती जलवहनाचे व आधाराचे काम करतात.
वाहिनी (Xylem Vessels)

  • वाहिनी उतींमधील पेशी मृत असतात.
  • या उती जलवहनाचे व आधाराचे काम करतात.
जलवाहिनी तंतू (Xylem Fibers)

  • जलवाहिनी तंतू उतींमधील पेशी मृत असतात.
  • या उती फक्त आधाराचे काम करतात.

 

 

2) रसवाहिनी (Phloem):

रसवाहिनी उती पानांत तयार झालेले अन्न वनस्पतींच्या इतर भागात पोहचवतात. रसवाहिनी उती ही चार सरल उतींची मिळून बनलेली असते.

रसवाहिनी मूल उती (Phloem parenchyma)

  • रसवाहिनी मूल उतींमधील पेशी जिवंत असतात.
  • या उती अन्नवहनाचे तसेच आधाराचे काम करतात.
चाळणनलिका (Sieve Tubes)

  • चाळणनलिका उतींमधील पेशी जिवंत असतात.
  • या उती अन्नवहनाचे तसेच आधाराचे काम करतात.
सहपेशी (Companion Cells)

  • सहपेशी उतींमधील पेशी जिवंत असतात.
  • या उती अन्नवहनाचे तसेच आधाराचे काम करतात.
रसवाहिनी तंतू (Phloem fibres)

  • रसवाहिनी तंतू उतींमधील पेशी मृत असतात.
  • रसवाहिनी तंतू फक्त वनस्पतींना आधार देण्याचे काम करतात.

 

 

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *