२० फेब्रुवारी दिनविशेष - 20 February in History
२० फेब्रुवारी दिनविशेष - 20 February in History

हे पृष्ठ 20 फेब्रुवारी रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

या पृष्ठावर, आम्ही २० फेब्रुवारी रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.

On this page, we will list all historical events that occurred on 20 February. The students can refer to them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

  • सामाजिक न्याय दिवस.

महत्त्वाच्या घटना:

लिओनिद ब्रेझनेव्ह
लिओनिद ब्रेझनेव्ह

१७९२: जॉर्ज वॉशिंग्टनने टपाल सेवा कायद्यावर सही केल्यामुळे अमेरिकेत टपाल खात्याची सुरूवात झाली.

१८३५: आजच्या दिवशी कोलकत्ता मेडिकल कॉलेज मध्ये अधिकारारिक रित्या विद्यार्थ्यांचे प्रवेश सुरु केले.

१८४६: इंग्रजांनी आजच्या दिवशी लाहोर वर ताबा मिळवला.

१८४७: घोड्यांच्या शर्यतीची संस्था रॉयल कलकत्ता टर्फ क्लब ची स्थापना करण्यात आली.

१८६८: बंगाल चे प्रसिद्ध वृतपत्र ‘अमृत बाजार पत्रिका’ आजच्या दिवशी सुरुवात झाली.

१९३५: कॅरोलीन मिकल्सेन हि पहिल्यांदा अंटार्क्टिका येथे हि पाउल ठेवणारी पहिली महिला ठरली.

१९४७: तत्कालीन ब्रिटीश प्रधानमंत्री क्लीमेंट एटली यांनी भारताचे स्वातंत्र्य देण्याची घोषणा केली.

१९७८: शेवटचा ’ऑर्डर ऑफ व्हिक्टरी’ सन्मान लिओनिद ब्रेझनेव्ह यांना देण्यात आला.

१९८७: मिझोराम भारताचे २३ वे राज्य बनले.

२००९: संयुक्त राष्ट्र संघाने २० फेब्रुवारी ला सामजिक न्याय दिवस म्हणून साजरे करण्यास सुरुवात केली.

२०१४: बर्‍याच गदारोळानंतर राज्यसभेतही आंध्र प्रदेशच्या विभाजनाचे विधेयक संमत झाल्याने ’तेलंगण’ हे भारताचे २९ वे राज्य बनले.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

गॉर्डन ब्राऊन
गॉर्डन ब्राऊन

१८४४: लुडविग बोल्टझमन – ऑस्ट्रियन भौतिकशास्त्रज्ञ (मृत्यू: ५ सप्टेंबर १९०६)

१९०१: इजिप्त चे पहिले अध्यक्ष मिसर मुहम्मद नागुईब यांचा जन्म. (मृत्यू: २८ ऑगस्ट १९८४)

१९०४: अलेक्सी कोसिजीन – रशियाचे पंतप्रधान (मृत्यू: १८ डिसेंबर १९८०)

१९२१: हरियाणा चे माजी मुख्यमंत्री राव वीरेंद्र सिंह यांचा जन्म.

१९२५: जपानी सुमो ४४ वे योकोझुना तोचीनिशिकी कियोटाका यांचा जन्म. (मृत्यू: १० जानेवारी १९९०)

१९३२: प्रसिद्ध नाटककार के.वी.सुबन्ना यांचा जन्म.

१९३६: माजी भारतीय फुटबॉल खेळाडू जर्नल सिंह यांचा जन्म.

१९५१: गॉर्डन ब्राऊन – इंग्लंडचे पंतप्रधान

१९५६: भारतीय चित्रपट अभिनेता अन्नू कपूर यांचा जन्म.

१९७३: भारतीय चित्रपट अभिनेते प्रियांशु चटर्जी यांचा जन्म.

१९८८: भारतीय चित्रपट अभिनेत्री जिया खान यांचा जन्म.

इंद्रजित गुप्ता
इंद्रजित गुप्ता

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

१९०५: विष्णुपंत छत्रे – भारतातील सर्कस उद्योगाचे जनक (जन्म: ? ? १८४६)

१९१०: ब्युट्रोस घाली – इजिप्तचे पंतप्रधान (जन्म: ? ? १८४६)

१९५०: बॅ. शरदचंद्र बोस – स्वांत्र्यसेनानी, झुंजार पत्रकार, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे वडील बंधू (जन्म: ६ सप्टेंबर १८८९)

के. नारायण काळे
के. नारायण काळे

१९७४: के. नारायण काळे – नाट्यसमीक्षक (जन्म: ? ? ????)

१९९३: प्रसिद्ध लक्झरी स्पोर्ट्स लॅम्बोर्गिनी कारचे निर्माते फारूशियो लॅम्बोर्गिनी यांचे निधन.

१९९४: त्र्यं. कृ. टोपे – घटनातज्ञ व मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू (जन्म: ? ? ????)

१९९७: श्री. ग. माजगावकर – पत्रकार, ’माणूस’ साप्ताहिकाचे संपादक (जन्म: ? ? ????)

बॅ. शरदचंद्र बोस
बॅ. शरदचंद्र बोस

२००१: इंद्रजित गुप्ता – केन्द्रीय गृहमंत्री आणि कम्युनिस्ट पक्षाचे नेते (जन्म: १८ मार्च १९१९)

२०१२: डॉ. रत्‍नाकर मंचरकर – संत साहित्याचे गाढे अभ्यासक, साक्षेपी समीक्षक व संशोधक (जन्म: ६ आक्टोबर १९४३)

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *