५ जुलै दिनविशेष - 5 July in History
५ जुलै दिनविशेष - 5 July in History

हे पृष्ठ 5 जुलै रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

या पृष्ठावर, आम्ही ५ जुलै रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.

On this page, we will list all historical events that have occurred on 5 July. The students can refer them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

  • राज्य मतदार दिन (महाराष्ट्र सरकार)
  • ‘आझाद हिंद सेने’चा आज स्थापनादिन 
  • स्वातंत्र्य दिन: अल्जीरिया, केप व्हर्दे, व्हेनेझुएला.

महत्त्वाच्या घटना:

१६५८: मुघल शासक बादशाहा औरंगजेब यांनी आपल्या मोठा भाऊ मुघल मुराद बख्श यांना बंदी बनवलं.

१६८७: सर आयझॅक न्यूटन यांनी फिलोसॉफी नॅचरालिस प्रिन्सिपिया मॅथेमॅटिका हे अतिमहत्त्वाचे पुस्तक प्रकाशित केले.

रॉजर फेडरर
रॉजर फेडरर

१८११: व्हेनेझुएलाला (स्पेनपासुन) स्वातंत्र्य मिळाले.

१८३०: फ्रान्सने अल्जीरीया पादाक्रांत केला.

१८४१: थॉमस कुक यांनी लेस्टर ते लोफबरो अशी पहिली सहल आयोजित केली.

१८८४: जर्मनीने कॅमॅरून हा देश ताब्यात घेतला.

१९०५: लॉर्ड कर्झन याने बंगालची फाळणी केली.

१९१३: किर्लोस्कर नाटक मंडळीतील प्रमुख नट गणपतराव बोडस आणि गोविंदराव टेंबे यांच्या भागीदारीत बालगंधर्वांनी ‘गंधर्व नाटक मंडळी’ची स्थापना केली.

१९४६: फ्रान्स फॅशन शोमध्ये पदार्पण केल्यानंतर बिकिनीची विक्री सुरु.

१९५०: इस्रायेलच्या क्‍वेन्सेटने जगातील कोणत्याही ज्यू व्यक्तीला इस्रायेलमध्ये राहण्याचा हक्क दिला.

१९५४: आंध्रप्रदेश उच्‍च न्यायालयाची स्थापना

१९५४: बीबीसीने पहिले टेलिव्हिजन बातम्या बुलेटिन प्रसारित केले.

१९६२: अल्जीरीयाला (फ्रान्सपासुन) स्वातंत्र्य मिळाले.

अँडी रॉडीक
अँडी रॉडीक

१९७५: विम्बल्डन एकेरी लॉन टेनिस स्पर्धा जिंकणारा आर्थर अ‍ॅश हा पहिला कृष्णवर्णीय खेळाडू बनला.

१९७५: ’केप व्हर्डे’ला (पोर्तुगालकडून) स्वातंत्र्य मिळाले.

१९७५: ’देवी’ या रोगाचे भारतातुन समूळ उच्‍चाटन झाल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) जाहीर केले.

१९७७: पाकिस्तानमध्ये लष्करी उठाव – झुल्फिकार अली भूट्टो तुरुंगात

१९८०: स्वीडन टेनिसपटू ब्योर्न बोरग यांनी विम्बल्डन एकेरी लॉन टेनिस स्पर्धा सलग पाच वेळा जिंकली.

१९९६: संरक्षण मंत्र्यांचे वैज्ञानिक सल्लागार डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम व अवकाश आयोगाचे सदस्य एन. पंत यांना ’आर्यभट्ट पुरस्कार’ जाहीर

१९९७: स्वित्झर्लंडच्या अवघ्या १६ वर्षाच्या मार्टिना हिंगीसने चेक प्रजासत्ताकाच्या याना नोव्होत्‍नाला पराभूत करुन सर्वात लहान वयात विंबल्डन टेनिस स्पर्धेतील महिला एकेरीचे विजेतेपद जिंकण्याची कामगिरी केली. हे तिच्या कारकिर्दितील दुसरे ग्रँड स्लॅम विजेतेपद होते.

१९९८: साली तामिळनाडू राज्यात डॉल्फिन सिटीचे उद्घाटन करण्यात आले.

१९९८: भारतीय लष्कर दलाने स्वदेश निर्मित रणगाडाविरोधी नाग क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली.

१९९९: संयुक्त राष्ट्र अमेरिकेने तालिबान राष्ट्रावर प्रतिबंध लावण्याची घोषणा केली.

२००४: FRBM कायदा २००३ अमलात.

२००४: इंडोनेशियात प्रथमतः राष्ट्राध्यक्षपदासाठी निवडणुका.

२००९: अँडी रॉडीकला विम्बल्डनमधे पराभूत करुन रॉजर फेडररने विक्रमी १५ वे ग्रँड स्लॅम विजेतेपद जिंकले.

२०१२: ३१० मीटर (१०२० फूट) उंचीसह लंडनमधील द शर्ड ही युरोपमधील सर्वात उंच इमारत ठरली.

२०१७: राज्य मतदार दिन (महाराष्ट्र सरकार) सुरुवात.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

हजरत इनायत खाँ
हजरत इनायत खाँ

१८८२: हजरत इनायत खाँ – हिन्दुस्थानी शास्त्रीय गायक (मृत्यू: ५ फेब्रुवारी १९२७)

१९१८: के. करुणाकरन – केंद्रीय उद्योगमंत्री व केरळचे मुख्यमंत्री व गृहमंत्री आणि केरळमधील ’युनायटेड डेव्हलपमेंट फ्रंट’ चे संस्थापक (मृत्यू: २३ डिसेंबर २०१०)

१९२०: आनंद साधले – संस्कृत वाङ्‌मयातील अनेक ग्रंथांचा मोठ्या रसाळ पद्धतीने मराठीत परिचय करुन देणारे साहित्यिक (मृत्यू: ४ एप्रिल १९९६)

१९२५: नवल किशोर शर्मा – केन्द्रीय मंत्री व गुजरातचे राज्यपाल (मृत्यू: ८ आक्टोबर २०१२)

रेणू सलुजा
रेणू सलुजा

१९४६: राम विलास पासवान – केंद्रीय मंत्री, राज्यसभेचे खासदार आणि लोक जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष (मृत्यू: ८ ऑक्टोबर २०२०)

१९५२: रेणू सलुजा – ’परिंदा’, ’धारावी, ’सरदार’ आणि ’गॉडमदर’ इ. चित्रपटांच्या संकलनासाठी चार वेळा राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपट संकलक (मृत्यू: १६ ऑगस्ट २००० – मुंबई)

जॉन राईट
जॉन राईट

१९५४: जॉन राईट – न्यूझीलंडचे क्रिकेटपटू व प्रशिक्षक

१९६८: युट्युब चे मुख्य कार्यकारी अधिकारी सुसान वॉजिकी यांचा जन्म.

१९९५: पद्मश्री व पद्मभूषण पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय व्यावसायिक बॅडमिंटनपटू पुसरला वेंकट सिंधु उर्फ पी. वी. सिंधु यांचा जन्मदिन.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

बाळू गुप्ते
बाळू गुप्ते

१८२६: सर थॉमस स्टॅम्फोर्ड रॅफल्स – सिंगापूरचे संस्थापक व ब्रिटिश मुत्सद्दी (जन्म: ६ जुलै १७८१)

१८३३: जगातील पहिले परिचित असलेला फोटो काढणारे निकेफोरे निओपे यांचे निधन. (जन्म: ७ मार्च १७६५)

१९४५: ऑस्ट्रेलियाचे १४ वे पंतप्रधान जॉन कर्टिन यांचे निधन.

१९५७: भारतीय वकील आणि राजकारणी अनुग्रह नारायण सिन्हा यांचे निधन. (जन्म: १८ जून १८८७)

१९९६: चंद्रकांत सखाराम चव्हाण ऊर्फ ’बाबूराव अर्नाळकर’ – रहस्यकथाकार (जन्म: ????)

२००५: बाळू गुप्ते – लेग स्पिन गोलंदाज (जन्म: ३० ऑगस्ट १९३४)

२००६: भारतीय कवी आणि विद्वान थिरुल्लालु करुणाकरन यांचे निधन. (जन्म: ८ ऑक्टोबर १९२४)

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *