९ फेब्रुवारी दिनविशेष - 9 February in History
९ फेब्रुवारी दिनविशेष - 9 February in History

हे पृष्ठ 9 फेब्रुवारी रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

या पृष्ठावर, आम्ही ९ फेब्रुवारी रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.

On this page, we will list all historical events that occurred on 9 February. The students can refer to them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

  • वन अग्नि सुरक्षा साप्ताहाच तिसरा दिवस.
  • व्हॅलेंटाईन आठवड्याचा तिसरा दिवस (चॉकलेट डे)

महत्त्वाच्या घटना:

रवींद्र जैन
रवींद्र जैन

१९००: लॉन टेनिस या खेळातील ’डेव्हिस कप’ या करंडकाची सुरूवात झाली.

१९३३: साने गुरुजी यांनी नाशिकच्या कारागृहात असताना ’श्यामची आई’ या पुस्तकाच्या लेखनाला सुरुवात केली.

१९५१: स्वतंत्र भारताची पहिली जनगणना सुरू

१९६९: बोइंग-७४७ विमानाचे पहिले चाचणी उड्डाण झाले.

१९७१: “अपोलो १४ मिशन” चंद्रावरून पृथ्वीवर सुरक्षित परत आले.

१९७३: बिजू पटनायक ओरिसा विधानसभेचे विरोधी पक्षनेते बनले.

१९७५: रशिया चे सुयोज-१७ हे अवकाशयान २९ दिवसानंतर पुन्हा पृथ्वीवर सुरक्षित परत आले.

१९९९: भारतीय चित्रपट निर्माता शेखर कपूर यांचा एलिझाबेथ हा चित्रपट ऑस्कर साठी नॉमिनेट केल्या गेला.

२००३: संगीतकार रवींद्र जैन यांना मध्यप्रदेश सरकारचा लता मंगेशकर पुरस्कार प्रदान.

२०१०: बीटी-ब्रिंजल वाणाची शेती करण्यावर काही दिवसासाठी बंदी आली.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१४०४: शेवटचा बायझेंटाईन सम्राट कॉन्स्टन्टाईन (अकरावा) यांचा जन्म.

१७७३: अमेरिकेचे ९वे अध्यक्ष विल्यम हेन्री हॅरिसन यांचा जन्म. (मृत्यू: ४ एप्रिल १८४१)

ग्लेन मॅकग्रा – ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज
ग्लेन मॅकग्रा – ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज

१८७४: स्वातंत्र्यशाहीर गोविंद त्र्यंबक दरेकर उर्फ कवी गोविंद – लहानपणीच तापामुळे कमरेखालील सर्व अंग लुळे पडून त्यांना कायमचे अपंगत्व आले, त्यामुळे त्यांचे शिक्षणही होऊ शकले नाही. कविता मात्र बालपणापासून करीत होते. स्वातंत्रवीर सावरकरांशी निकटचे संबंध आल्यानंतर त्यांच्या कवितेला उत्कट राष्ट्रभक्तीची आणि तीव्र स्वातंत्र्याकांक्षेची दिशा गवसली. (मृत्यू: २८ फेब्रुवारी १९२६ – नाशिक)

१९१७: होमी जे. एच. तल्यारखान – गांधीवादी नेते, सिक्‍कीमचे पहिले राज्यपाल, मंत्री व आमदार (मृत्यू: २७ जून १९९८)

१९२२: जिम लेकर – इंग्लिश क्रिकेट खेळाडू (मृत्यू: २३ एप्रिल १९८६)

१९२९: महाराष्ट्रचे ८वे मुख्यमंत्री ए. आर. अंतुले यांचा जन्म. (मृत्यू: २ डिसेंबर २०१४)

१९४०: प्रसिद्ध भारतीय लेखक विष्णू खरे यांचा जन्म.

१९४५: संसद चे माजी सदस्य श्याम चरण गुप्ता यांचा जन्म.

१९५८: भारतीय चित्रपट अभिनेत्री अमृता सिंह यांचा जन्म.

१९६८: भारतीय अभिनेता राहुल रॉय यांचा जन्म.

१९७०: ग्लेन मॅकग्रा – ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज

१९८४: ला भारतीय अभिनेत्री उदिता गोस्वामी यांचा जन्म.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

डॉ. मुरलीधर देविदास ऊर्फ बाबा आमटे
डॉ. मुरलीधर देविदास ऊर्फ बाबा आमटे

१८७१: फ्योदोर दोस्तोवस्की – रशियन कादंबरीकार आणि तत्त्वज्ञ (जन्म: ११ नोव्हेंबर १८२१)

१८९९: भारतीय स्वातंत्र्य सैनिक बालकृष्ण चापेकर यांचे निधन.

१९१८: प्रसिद्ध भारतीय नृत्यांगना टी. बालासरस्वती यांचे निधन.

१९६६: दामूअण्णा जोशी – बालमोहन नाटक मंडळीचे संस्थापक. या संस्थेने प्रल्हाद केशव अत्रे यांची अनेक नाटके केली. (जन्म: ? ? ????)

१९७९: राजा परांजपे – चित्रपट दिग्दर्शक, निर्माते आणि अभिनेते (जन्म: २४ एप्रिल १९१०)

१९८१: एम. सी. छागला – न्यायाधीश, मुत्सद्दी आणि केंद्रीय मंत्री (जन्म: ३० सप्टेंबर १९००)

तंजोर बालसरस्वती
तंजोर बालसरस्वती

१९८४: तंजोर बालसरस्वती – भरतनाट्यम नर्तिका (जन्म: १३ मे १९१८)

२०००: शोभना समर्थ – चित्रपट अभिनेत्री व निर्माती (जन्म: ? ? १९१५)

२००१: माजी हवाई दल प्रमुख, एर चीफ मार्शल दिलबागसिंग यांचे निधन.

२००६: भारतीय अभिनेत्री नादिरा यांचे निधन.

२००८: डॉ. मुरलीधर देविदास ऊर्फ बाबा आमटे – कुष्ठरोग्यांच्या पुनर्वसनासाठी आयुष्य वाहून घेणारे थोर समाजसेवक (जन्म: २६ डिसेंबर १९१४)

२०१२: प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक ओ. पी. दत्ता यांचे निधन.

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *