१७ जुलै दिनविशेष - 17 July in History
१७ जुलै दिनविशेष - 17 July in History

हे पृष्ठ 17 जुलै रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

या पृष्ठावर, आम्ही १७ जुलै रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.

On this page, we will list all historical events that occurred on 17 July. The students can refer them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

  • आंतरराष्ट्रीय न्याय दिन: World Day for International Justice
  • World Emoji Day

महत्त्वाच्या घटना:

१४८९: निजाम खान यांची सिकंदर शाह द्वितीय यांच्या नावाने दिल्लीचे सुल्तान म्हणून घोषित करण्यात आलं.

१८०२: मोडी लिपीतून पहिल्यांदाच मुद्रण करण्यात आले.

१८१९: ’अ‍ॅडॅम्स-ओनिस’ करारानुसार फ्लोरिडा हे राज्य अमेरिकेने स्पेनकडुन ५ दशलक्ष डॉलर देऊन विकत घेतले.

१८४१: अतिशय गाजलेल्या ’पंच’ या विनोदी साप्ताहिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला.

लक्ष्मणशास्त्री जोशी
लक्ष्मणशास्त्री जोशी

१९१७: किंग जॉर्ज (पाचवा) यांनी फतवा काढून जाहीर केले की त्यांच्या वंशातील पुरुष मंडळी ’विंडसर’ हे आडनाव लावतील.

१९४७: मुंबई ते रेवस अशी जलवाहतुक करणार्‍या ’रामदास’ या फेरीबोटीला गटारी अमावस्येच्या रात्री ’काशाचा खडक’ या ठिकाणाजवळ जलसमाधी मिळुन सुमारे ७०० लोक मृत्यूमुखी पडले.

१९५०: देशांतील पहिली विमान दुर्घटना पंजाब राज्यातील पठाणकोट येथे घडून आली.

१९५३: अमेरिकन व्यंग चित्रकार व लेखक वॉल्ट डिज़्नी (Walt Disney) यांनी अमेरिकेतील अ‍ॅनाहेम, कॅलिफोर्निया या दोन ठिकाणी ‘डिस्‍नेलँड’ सुरू केले.

१९५५: वॉल्ट डिस्‍ने यांनी अ‍ॅनाहेम, कॅलिफोर्निया येथे ’डिस्‍नेलँड’ सुरू केले.

१९७५: अमेरिकेचे अपोलो रशियाचे सोयुझ ही दोन अंतराळयाने एकमेकांस जोडली गेली.

१९७६: कॅनडातील मॉन्ट्रिअल येथे २१ व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.

वैजयंतीमाला बाली
वैजयंतीमाला बाली

१९९३: तेलगू भाषेतील प्रतिष्ठेचा मानला जाणारा ‘तेलगू थल्ली’ हा सर्वोच्‍च पुरस्कार ज्येष्ठ विचारवंत तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांना प्रदान

१९९४: विश्वकप फूटबॉलच्या अंतिम सामन्यात ब्राझिलने इटालीला पेनल्टी शूटआऊटमधे हरवले.

२०००: अभिनेत्री व नृत्यांगना वैजयंतीमाला बाली यांना’भरतनाट्य शिखरमणी’ पुरस्कार जाहीर

२००४: तामिळनाडुतील कुंभकोणम गावात एका शाळेला लागलेल्या आगीत ९० विद्यार्थी मृत्यूमुखी पडले.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१८८९: अर्ल स्टॅनले गार्डनर – अमेरिकन लेखक आणि वकील (मृत्यू: ११ मार्च १९७०)

१९१७: भारतीय अभिनेते, गायक आणि पटकथालेखक बिजोन भट्टाचार्य यांचा जन्म. (मृत्यू: १९ जानेवारी १९७८)

१९१८: ग्वाटेमालाचा राष्ट्राध्यक्ष कार्लोसमनुएल अराना ओसोरिया यांचा जन्म.

अँजेला मेर्केल
अँजेला मेर्केल

१९१९: स्‍नेहल भाटकर – संगीतकार (मृत्यू: २९ मे २००७)

१९२३: कूपर कार कंपनी चे सहसंस्थापक जॉन कूपर यांचा जन्म. (मृत्यू: २४ डिसेंबर २०००)

१९३०: बाबुराव बागूल – दलित साहित्यिक (मृत्यू: २६ मार्च २००८)

१९५४: अँजेला मेर्केल – जर्मनीच्या चॅन्सेलर

१९५९: भारतीय हिंदी आणि मल्याळम चित्रपट अभिनेत्री जरीना वहाब यांचा जन्मदिन.

१९६९: भारतीय हिंदी आणि भोजपुरी चित्रपट अभिनेता रवी किशन यांचा जन्मदिन.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

अ‍ॅडॅम स्मिथ
अ‍ॅडॅम स्मिथ

१७९०: अ‍ॅडॅम स्मिथ – स्कॉटिश अर्थशास्त्रज्ञ आणि तत्त्ववेत्ता (जन्म: ५ जून १७२३)

१८३५: मेघालय सम्राट तिरोट सिंग यांचे निधन.

१९२८: भारताच्या ज्येष्ठ समाजवादी नेत्या आणि भारतीय संसदेच्या सदस्या मृणाल गोरे यांचे निधन.

१९७२: गुजरात राज्यातील प्रसिद्ध राजकारणी आणि ‘अखिल भारतीय किसान सभे’चे नेते, इंदुलाल याज्ञिक यांचे निधन.

१९९२: काननदेवी – बंगाली व हिंदी चित्रपटातील अभिनेत्री व गायिका [१९३० ते १९५०] (जन्म: २२ एप्रिल १९१६)

१९९२: शांता हुबळीकर – प्रभातच्या ’माणूस’ चित्रपटामुळे गाजलेल्या अभिनेत्री, पुणे महापालिकेतर्फे ’बालगंधर्व पुरस्कार’ (जन्म: १४ एप्रिल १९१४)

मृणाल गोरे
मृणाल गोरे

२००५: युनायटेड किंग्डमचे पंतप्रधान सर एडवर्ड हीथ यांचे निधन.

२०१२: मृणाल गोरे – समाजवादी नेत्या आणि ६ व्या लोकसभेच्या सदस्य (जन्म: २४ जून १९२८)

२०१२: भारतीय-इंग्रजी राजकारणी मार्शा सिंह यांचे निधन. (जन्म: ११ ऑक्टोबर १९५४)

२०२०: सी.एस. शेषाद्री – भारतीय गणितज्ञ व चेन्नई मॅथेमॅटिकल इन्स्टिट्यूटचे संस्थापक – पद्म भूषण, शांती स्वरूप भटनागर पुरस्कार (जन्म: २९ फेब्रुवारी १९३२)

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *