Sickle Cell Anaemia
Sickle Cell Anaemia

पेशीजन्य रोग (Cellular Disease)

कर्करोग/ कॅन्सर (Cancer)

व्याख्या: पेशींच्या अनियंत्रित  विभाजनातून शरीराच्या कोणत्याही भागात अनावश्यक पेशींच्या गाठी/ समुह तयार होणे म्हणजेच कर्करोग होय. अश्या अनावश्यक पेशींच्या समूहालाच गाठ (Tumour) असे म्हणतात.

गाठीचे प्रकार (Types Of Tumours)

निरुपद्रवी गाठ (Benign Tumour): अशा प्रकारच्या गाठींचा परिणाम शरीरातील इतर अवयवांवर होत नाही.

दुर्दम्य गाठ (Mallignant Tumour):अशा प्रकारच्या गाठींचा परिणाम अंतर्गत अवयवांच्या कार्यावर होतो.  आणि यामुळेच कर्करोगाच्या स्थितीला दूर्दम्यता (Mallignancy) असेही म्हणतात.

रक्ताद्वारे कॅन्सरच्या वाढत असलेल्या पेशी जेव्हा सर्व शरीरभर पसरतात त्या स्थितीला Metastatis असे म्हणतात.

मानवी शरीरातील कोणत्याही अवयवात कॅन्सर होऊ शकतो. सर्वाधिक तोंडाचा, स्तनांचा, आणि रक्ताचा कॅन्सर बघायला मिळतो.

लक्षणे: कर्करोगाची लक्षणे सुरुवातीला आढळत नाहीत. न भरणाऱ्या जखमा, असाधारण रक्तस्त्राव, अपचन, ताप, वजन कमी होणे, खूप थकवा जाणवणे, त्वचेमध्ये बदल होणे.

कर्करोगाची कारणे: 

कर्करोग निर्माण करणाऱ्या घटकांचे तीन गट केले जाते.

1) अपसारी/ प्रारणे ऊर्जा (radiant Energy):

 • अतिनील किरणे, क्ष- किरणे, आणि गॅमा किरणे कर्करोगजन्य असतात. ही  किरणे विविध मार्गांनी डी. एन. ए. रेणूंची हानी करतात.
 • डी. एन. ए. वरील परिणांव्यतिरिक क्ष-किरणे आणि गॅमा किरणे उतींमध्ये घटक मुक्त मूलके निर्माण करतात.
 • जगातील सुमारे 10% लोकांना यामुळे कर्करोग होतो.

2) रासायनिक सयुंगे (Chemical Compounds): 

 • जगातील सुमारे 80% लोकांना विविध रासायनिक सयुंगांमुळे कर्करोग होतो.
 • उदा. आर्सेनिक, कोबाल्ट, कॅडमिअम, अल्फोटॉक्सिन -B-1, अबेसटॉस, पोलिसायक्लिक हाड्रोकार्बन, बेन्झीन, बेरिलियम, निकेल, डॉक्टीनोमायसिन या संयुगांचा परिणाम DNA रेणूंतील ग्वानिन या नत्ररेणूवर होतो.

3) विषाणू (Viruses):

 • कॅन्सर घडवून आणण्याची क्षमता असलेल्या जनुकांना कर्करोग जनुक म्हणतात. काही रोगांचे विषाणू कर्करोगजनक स्थिती निर्माण करतात. त्याचे प्रमाण 5% आहे.
 • उदा: हिपॅटिटिस -B आणि हिपॅटिटिस -C च्या विषाणूमुळे यकृताचा कर्करोग होतो.
 • राउस -सार्कोमा हर्पस विषाणूमुळे रक्ताचा कर्करोग होतो.
 • पॅपिलोमा विषाणूमुळे त्वचेचा कर्करोग होतो.

4) इतर घटक (Miscllaneous): 

 • जगातील सुमारे 5% लोकांना अनारोग्यादायी सवयीमुळे कर्करोग होतो व दिवसेंदिवस यांचे प्रमाण वाढत चालले आहे.
 • धूम्रपान आणि तंबाखू सेवनामुळे तोंड, स्वरयंत्र, फुप्फुस, ग्रसनी, ग्रासनिका, स्वादुपिंड इत्यादींचा कर्करोग होतो.
 • अतिमद्यप्राशनामुळे यकृत व ग्रासनलिका यांचा कर्करोग होतो.
 • अतिमेदयुक्त आहारामुळे स्तनांचा कर्करोग होतो.

 

कर्करोगाचे प्रकार 
कार्सिनोमाअभिस्तर पेशींचा किंवा त्वचेचा रोग
सार्कोमासंयोजी उतींचा कर्करोग
लिम्फोमालसिकापेशींचा कर्करोग
ल्युकेमियारक्ताचा/ श्वेतपेशींचा कर्करोग
सेमिनोमावृषणाचा कर्करोग
डीसजर्मीनोमाअंडाशयाचा कर्करोग
ब्लास्टोमाअपरीकव पेशींचा कर्करोग

 

कर्करोगाची चाचणी: कर्करोगाच्या चाचणीसाठीबायोप्सी (Biopsy) चाचणी मार्गांचा वापर केला जातो.  यामध्ये शंकास्पद उतींचा छोटा तुकडा काढून सूक्ष्मदर्शकाखाली त्याचे निरीक्षण केले जाते.

कर्करोगाचा उपचार/ प्रतिबंध (Prevention/ Treatment):

१) कर्करोगग्रस्त पेशी व उटी पूर्णपणे काढून टाकणे

२) रेडियो थेरपी चा वापर: मानवी शरीरातील कॅन्सरच्या उपचारासाठी कोबाल्ट 60 चा वापर, थायरॉईड ग्रंथींच्या कर्करोगाच्या उपचारासाठी किरणोत्सारी आयोडीनचा वापर, जीभ आणि गर्भाशयाच्या कॅन्सरच्या उपचारासाठी किरणोत्सारी सुयांचा वापर

३) किमो थेरपी: कँसरविरोधी औषधांचा वापर, प्रामुख्याने रक्ताच्या कॅन्सरच्या उपचारासाठी

ऍस्पिरीन या औषधांमुळे कर्करोगामुळे होणारा संभाव्य मृत्यूचा धोका 7% ने कमी झाला आहे.

टॅमॉक्झिफेन किंवा रॅलोक्झिफेनमुळे स्त्रियांमध्ये ब्रेस्ट कँसर होण्याचा धोका कमी होऊ शकतो.

विषाणूंमुळे होणाऱ्या कर्करोगाविरुद्ध मानवी पॅपिलोमा विषाणू  लस आणि हिपॅटिटिस-बी ची लस यांचा वापर केला जातो.

कर्करोग शरीरात इतरत्र कसा पसरतो

कर्करोगाचे निदान योग्य वेळी न होऊ शकल्यास तो मूळ भागातून हळूहळू शरीराच्या इतर भागांमध्ये पसरत जातो. कर्करोगाच्या पेशी लागण झालेल्या भागापासून फुटून शरीरात इतरत्र पसरल्यामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण जवळजवळ ९० टक्के इतके आहे. या इन्फोग्राफमध्ये पाहा.

How Cancer is spread elsewhere in the body
How Cancer is spread elsewhere in the body
कर्करोग शरीरात इतरत्र कसा पसरतो

2) दात्र पेशी पांडूरोग (Sickle Cell Anaemia):

हा रोग अनुवांशिक आहे .

शरीरातील अमिनो आम्लांची जागा बदलल्यामुळे हा रोग उद्भवतो.

मानवी पेशीतील 9 वे अमिनो आम्ल ग्लुटॅमिक आम्ल आणि 20 वे अमिनो आम्ल व्हविलीन यांनी आपसात जागा बदल्यास त्याचा परिणाम रक्तपेशींवर होतो.

तांबडया रक्तपेशींमध्ये हिमोग्लोबिन नावाचे प्रथिन असते. या पेशींवर परिणाम होऊन त्यांचा आकार दात्राकृती किंवा विळ्यासारखा होत असल्याने याला दात्रपेशी पांडूरोग असे म्हणतात.

 

 

3) महालोहित पेशीजनक पांडूरोग (Megaloblastic Anaemia):

हा अनुवांशिक रोग आहे.

सायनो- कोबालमिन (B-12) जीवनसत्वाच्या अभावामुळे हा रोग होतो.

यामध्ये तांबडया रक्तपेशी अपरिपकव राहून त्यांचा आकार वाढतो.

या अपरिपकव तांबडया पेशीतील हिमोग्लोबीनच्या कार्यावर परिणाम होऊन हि रोगकारक स्थिती निर्माण होते.

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Join the Conversation

1 Comment

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *