१३ जुलै दिनविशेष - 13 July in History
१३ जुलै दिनविशेष - 13 July in History

हे पृष्ठ 13 जुलै रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

या पृष्ठावर, आम्ही १३ जुलै रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.

On this page, we will list all historical events that occurred on 13 July. The students can refer them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

महत्त्वाच्या घटना:

जतिंद्रनाथ दास
जतिंद्रनाथ दास

१६६०: पावनखिंड झुंजवणार्‍या वीर बाजीप्रभू देशपांडे यांनी शिवाजी महाराज विशाळगडावर पोहोचल्याच्या खुणेच्या तोफांचे आवाज ऐकल्यावर ‘आता मी सुखाने मरतो’ असे म्हणून प्राण सोडला.

१८३७: राणी व्हिक्टोरिया बकिंगहॅम पॅलेसमध्ये (Buckingham Palace) राहायला गेली. तेव्हापासून ते इंग्लंडच्या राजाचे/राणीचे अधिकृत निवासस्थान बनले.

१८६३: सक्तीच्या सैन्यभरती विरोधात न्यूयॉर्क शहरात दंगा झाला.

१८०३: साली राजा राम मोहन राय आणि अलेक्झांडर डफ यांनी आपल्या पाच विद्यार्ध्यांसोबत स्कॉटिश चर्च महाविद्यालयाची स्थापना केली.

१९०५: कलकत्ता येथील साप्ताहिक वर्तमानपत्र ‘संजीवनी’ मध्ये पहिल्यांदा विदेशी मालाचा बहिष्कार करा म्हणून प्रकाशित करण्यात आलं.

रुथ एलीस
रुथ एलीस

१९०८: लोकमान्य टिळकांवर दुसर्‍या राजद्रोहाच्या खटल्याचे काम सुरु झाले.

१९०८: ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये स्त्रियांना भाग घेण्यास परवानगी.

१९२९: जतिंद्रनाथ दास यांनी लाहोर तुरुंगात आपले आमरण उपोषण सुरू केले. या उपोषणातच त्यांचा मृत्यू झाला.

१९५५: २८ वर्षीय रुथ एलीसला (Ruth Ellis) प्रियकराचा खून केल्याबद्दल फासावर चढविण्यात आले. हॉलो वे तुरूंगातली ही फाशी ग्रेट ब्रिटनमधली स्त्रीकैद्याची अखेरची फाशी ठरली.

१९७७: रोहित्रावर (transformer) वीज पडल्यामुळे न्यूयॉर्क शहरातील वीजपुरवठा दीर्घकाळ खंडित झाला.

१९८३: श्रीलंकेत वांशिक हत्याकांड. ३,००० तामिळ व्यक्तींची हत्या. ४,००,००० हून अधिक तामिळींचे पलायन.

२००६: ईराण देशांतील अणुबॉम्ब निर्माण प्रकरण संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेकडे देण्यात आले.

२०११: मुंबई शहरात झालेल्या ३ बॉम्बस्फोटात २६ जण ठार तर १३० जण जखमी झाले.

केसरबाई केरकर
केसरबाई केरकर

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१८६३: अँग्लो-इंडियन इजिप्ततज्ञ, पुरातत्वशास्त्रज्ञ, मानववंशशास्त्रज्ञ, इतिहासकार आणि लोककलाकार तसचं, युनायटेड किंगडममधील पुरातत्व शाखेच्या प्राध्यापक मार्गारेट अलीस मुरे(Margaret Alice Murray)  यांचा जन्मदिन.

१८९२: केसरबाई केरकर – जयपूर-अत्रौली घराण्याच्या शास्त्रीय गायिका (मृत्यू: १६ सप्टेंबर १९७७)

१९३०: माजी भारतीय क्रिकेटपटू व माजी भारतीय कसोटी क्रिकेट पंच स्वरूप किशन यांचा जन्मदिन.

१९४०: भारतीय विद्वान, कादंबरीकार, लघुकथा लेखक आणि इंग्रजी आणि हिंदी साहित्याच्या कवी सुनिता जैन यांचा जन्मदिन.

हॅरिसन फोर्ड
हॅरिसन फोर्ड

१९४२: हॅरिसन फोर्ड – अमेरिकन अभिनेता

१९४४: रुबिक क्यूब चे निर्माते एरो रुबिक यांचा जन्म.

१९५३: राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सन्मानित भारतीय तमिळ भाषिक कवी, गीतकार आणि कादंबरीकार वैरामुथू रामासामी यांचा जन्मदिन.

१९६४: भारतीय क्रिकेट खेळाडू उत्पल चॅटर्जी यांचा जन्म.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

१६६०: पावनखिंड लढवून बाजीप्रभू देशपांडे यांनी स्वराज्यासाठी आपल्याल प्राणाचे बलिदान दिले.

१७९३: फ्रेंच क्रांतिकारी ज्याँपॉल मरात यांचे निधन.

१९६९: महर्षी न्यायरत्‍न धुंडिराजशास्त्री विनोद – तत्त्वज्ञ, विचारवंत, योगी, स्वातंत्र्य सैनिक आणि लेखक. (जन्म: १२ जानेवारी १९०२)

१९६९: बंगाली शिक्षणतज्ञ, लेखक, तत्वज्ञानी आणि पूर्व पाकिस्तानचे भाषाशास्त्रज्ञ मुहम्मद शाहिदुल्ला यांचे निधन.

१९८०: बोत्स्वानाचे पहिले राष्ट्राध्यक्ष सेरेत्से खामा यांचे निधन.

निळू फुले
निळू फुले

१९९०: अर्देशिर फुर्दोरजी सोहराबजी ऊर्फ ’बॉबी’ तल्यारखान – क्रीडा समीक्षक व समालोचक (जन्म: ? ? १८९७)

१९९४: पं. कृष्णा गुंडोपंत तथा ’के. जी.’ गिंडे – शास्त्रीय (धृपद) गायक, संगीतकार व शिक्षक (जन्म: २६ डिसेंबर १९२५)

१९९५: ज्ञानपीठ पुरस्कार विजेता भारतीय बंगाली भाषिक कादंबरीकार आणि कवी आशापूर्ण देवी यांचे निधन.

१९९५: भारतीय पत्रकार आणि स्तंभलेखक तसचं, सुप्रसिद्ध भारतीय चित्रपट मसिक लेखिका देवयानी चौबाल यांचे निधन.

मनोहारी सिंग
मनोहारी सिंग

२०००: इंदिरा संत – साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या कवयित्री व लेखिका (जन्म: ४ जानेवारी १९१४)

२००९: निळू फुले – संगीत नाटक अकादमी पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय हिंदी मराठी चित्रपट अभिनेते (जन्म: ? ? १९३०)

२०१०: मनोहारी सिंह – भारतीय संगीत दिग्दर्शक, सैक्सोफोनिस्ट आणि चित्रपट संगीतकार तसचं, गीतकार आर. डी. बर्मन यांचे मुख्य संयोजक (जन्म: ८ मार्च १९३१)

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *