महाराष्ट्रातील संत - मराठी संत महाराष्ट्राचे प्रणेते. Popular Saints of Maharashtra
महाराष्ट्रातील संत - मराठी संत महाराष्ट्राचे प्रणेते. Popular Saints of Maharashtra

महाराष्ट्रातील संत – मराठी संत महाराष्ट्राचे प्रणेते. Popular Saints of Maharashtra

महाराष्ट्राला संतांची पुरातन परंपरा आहे. या संतांनी महाराष्ट्राला व मराठी भाषेला वाङ्मयाचा मोठा वारसा दिला आहे

संत ज्ञानेश्वर

संत ज्ञानेश्वर

 • संत ज्ञानेश्वरांचा जन्म इ. स. १२७५ मध्ये औरंगाबाद मधील पैठणजवळील आपेगाव या गावी झाला होता.
 • भावार्थदीपिका किंवा ज्ञानेश्वरी (१८ अध्याय, ओवी ९ हजार) १२९० साली नेवासे सच्चिदानंद यांच्याकडून लिहून घेतली.
 • संत ज्ञानेश्वरांच्या ग्रंथसंपदेत अमृतानुभव, चांगदेव पासष्ठी, अभंगाची गाथा इत्यादींची भर पडली.
 • इ. स. १२९६ मध्ये संत ज्ञानेश्वर यांनी संजीवन समाधी आळंदी येथे घेतली.

संत नामदेव

संत नामदेव

 • इ.स. १२७० मध्ये संत नामदेवांचा जन्म पंढरपूर येथे झाला. त्यांचे मूळ गाव – नरसी बामणी (जि. हिंगोली) हे होते.
 • त्यांचे संपूर्ण नाव नामदेव दामाशेट्टी शिंपी असे होते.
 • संत नामदेवांच्या गुरुचे नाव संत विसोबा खेचर असे होते.
 • आद्य कीर्तनकार या नावाने नामदेवांना ओळखल्या जात असे.
 • ज्ञानेश्वर, सावतामाळी, चोखामेळा, गोराकुंभार, विसोबा खेचर यांच्या सोबत घेऊन नामदेवांनी भारतभर तीर्थयात्रा केली.
 • ‘नामदेवजी की मुखबानी’ या त्यांच्या ओव्या ‘गुरु ग्रंथसाहेब’ शीख धर्माच्या ग्रंथात समाविष्ट केल्या आहेत.
 • ज्ञानेश्वरांचे समकालीन चरित्रकार म्हणून संत नामदेवांना संबोधले जात असे.
 • इ. स.  १३५० मध्ये संत नामदेव यांचा मृत्यू झाला.
संत एकनाथ

संत एकनाथ

 • संत एकनाथ यांचा जन्म पैठण येथे इ. स. १५०४ मध्ये झाला. व ते पहिले समाजसुधारक संत होते.
 • संत एकनाथाच्या गुरूंचे नाव जनार्दन स्वामी होते.
 • संत एकनाथांनी अनेक भारुडे, गौळणी लिहिल्या.
 • चतुःश्लोकी भागवत, एकनाथी भागवत (२० हजार ओव्या) , रुक्मिणी स्वयंवर, भावार्थ रामायण इत्यादी त्यांच्या ग्रंथसंपदा आहेत.
 • संत एकनाथांचा मृत्यू इ. स. १५९९ मध्ये पैठण येथे झाला.
saint-chokhamela

संत चोखामेळा

जन्म:अज्ञात वर्ष – मृत्यू: इ.स. १३३८)

त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांच्या हाडांतून विठ्ठल नामाचा गजर ऐकू येत होता, यावरून नामदेवांनी चोखोबांची हाडे ओळखून ती गोळा केली व पंढरपूरला विठ्ठल मंदिरासमोर त्यांची समाधी बांधली असे चरित्रकार सांगतात.

संत मुक्ताबाई

संत मुक्ताबाई

जन्म: आळंदी, महाराष्ट्र, इ.स.१२७९ – मृत्यू: मेहूण (जळगाव जिल्हा), इ.स. १२९७

या मुक्ताई या नावानेही ओळखल्या जातात. संत निवृत्तिनाथ, संत ज्ञानेश्वर व संत सोपानदेव हे मुक्ताबाईचे थोरले भाऊ होते.

संत मुक्ताबाईंनी रचलेले ताटीचे एकूण ४२ अभंग प्रसिद्ध आहेत. या अभंगांमध्ये त्यांनी आपला भाऊ संत ज्ञानेश्वरांना बोध दिला आहे. त्या योगी चांगदेवांच्या गुरू होत. योगी चांगदेवांचा अहंकार छोट्याश्या मुक्ताबाईचे अलौकिक ज्ञान बघून गळून गेला होता. त्यांनी मुक्ताबाईना आपले गुरु मानले होते. मुक्ताबाईंनी ज्ञानबोध या ग्रंथाचेही लेखन केले आहे असे संशोधनांती स्पष्ट होते. ह्या ग्रंथामध्ये संत निवृत्तीनाथ आणि संत मुक्ताबाई ह्यांचा संवाद आलेला आहे. त्या समाधिस्थ होण्याच्या थोडेसे आधी झालेले हे लिखाण असावे, असे त्यातील अंतर्गत संदर्भांवरून लक्षात येते.

मुक्ताबाईचे कल्याण-पत्रिका, मनन, हरिपाठ, ताटीचे अभंग हे साहित्य आहे. हिची ‘निवृत्तीप्रसादे मुक्ताबाई’ ही अभंगरूपी कविता अद्याप अप्रसिद्ध आहे.

जळगाव जिल्ह्यातील एदलाबाद तालुक्याचे नाव बदलून मुक्ताईनगर केले आहे.

sant-narhari-sonar

संत नरहरी सोनार

वारकरी संप्रदायामध्ये विविध जाती जमातीच्या संतांची एकत्र येऊन वारकरी संप्रदाय वाढविण्याचा प्रयत्न अठरा प्रगट जाती जमातीच्या संतानी केला आहे. यात पंढरपूर मधील संत नरहरी सोनार यांनी आपल्या भक्तीचा ठसा महाराष्ट्रभर उमठविला होता. संत नरहरी सोनार हे जातीने सोनार असल्याने त्यांचा व्यवसाय हा दागिन्यांचा होता. त्यांची कलाकुसर त्यावेळेस चांगली प्रसिद्धी होती. आपल्या कलेच्या जोरावर व्यवसायाचा पंढरपुरात चांगला जम बसविला होता. संत नरहरी सोनार हे एक प्रसिद्ध शिव भक्त होते. त्यांच्या घरात शिवभक्ती परंपरेने चालत आली होती. त्यांची भगवान शंकरावर एकनिष्ठ भक्ती होती. त्यांच्या या भक्तीची चर्चा पंढरपुरामध्ये मोठ्या प्रमाणावर होती. रोज सकाळी उठल्यावर ते शिव आराधना करीत असे. रोज पहाटे जोतिर्लिंगावर ते बेल पत्र वाह असे.

संत तुकाराम

 संत तुकाराम

 • संत तुकारामांचा जन्म इ.स. १६०८ मध्ये देहू येथे झाला.
 • तुकाराम वोल्होबा आंबिले हे त्यांचे संपूर्ण नाव होते.
 • त्यांनी सुमारे ४५०० अभंग रचले.
 • भागवत धर्माचा तसेच वारकरी पंथाचा पाया जिथे ज्ञानेश्वरांनी रचला त्यावर कळस चढविण्याचे काम तुकारामांनी केले.
 • शिवाजी महाराज व संत रामदास हे तुकारामांचे समकालीन होते.
 • संत तुकाराम यांचा मृत्यू इ.स. १६४९ साली झाला.
समर्थ रामदास

समर्थ रामदास

 • संत रामदासांचा जन्म इ.स. १६०८ मध्ये मराठवाड्यातील जालना येथील जांब या गावी झाला.
 • नारायण सूर्याजीपंत ठोसर असे त्यांचे संपूर्ण नाव होते.
 • त्याचे वास्तव्य सातारा जिल्ह्यातील सज्जनगड येथे होते.
 • संत रामदासांनी नाशिकमधील पंचवटी येथे १२ वर्षे तपश्चर्या केली.
 • रामदासी संप्रदायाची स्थापना समाजप्रबोधनासाठी केली.
 • दासबोध, करुणाष्टके, मनाचे श्लोक. सोळा लघुकाव्ये, एकवीस समासी, चौदा शतक, आत्माराम रामायण, स्फुट ओव्या, दोन रामायणे इत्यादी त्यांनी रचना केल्या.
 • इ. स.  १६८१ मध्ये सज्जनगड येथे देहत्याग केला व तेथे त्यांची समाधी आहे.

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Join the Conversation

1 Comment

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *