संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान
संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान

संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान

ग्रामीण जनतेचा आरोग्यमान उंचावण्यासाठी सन 2000 – 2001 पासून गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे.

या अभियानाअंतर्गत जनजागृतीचा व्यापक कार्यक्रम अमलात आणण्यात आला त्यामधून लोकांच्या पुढाकार मध्ये शासनाचा सहभाग असा नवीन विचार विकास योजना देण्यात आला.

लोकांना प्रोत्साहन देण्यासाठी या अभियानाअंतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा सुरु केली आहे. या अभियानास लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने हा कार्यक्रम आता कायमस्वरूपी राबविण्यात येत आहे.

सन 2008- 2009 पासून राबविण्यात येणाऱ्या संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाअंतर्गत जिल्हा परिषद मतदान संघ स्तरावरील मिळालेल्या गुणांवर ग्रामपंचायतीची खालील प्रमाणे प्रति वारी ठरविण्यात येते.

  • अ 60% व त्याहून अधिक गुण
  • ब 50% ते 59%
  • क 49% व त्यापेक्षा कमी गुण

उत्कृष्ट  काम करणाऱ्या ग्रामपंचायतींना व द्यावयाच्या बक्षिसाचे स्वरूप खालीलप्रमाणे आहे

बक्षीस क्रमांक   पंचायत समिती स्तर(रु.)    जिल्हा स्तर(रु.)    विभागीय स्तर(रु.)   राज्य स्तर(रु.)  

प्रथम              25 हजार                       5 लाख              10 लाख              25 लाख 

द्वितीय             15  हजार                     3  लाख               8  लाख             20 लाख   

तृतीय              10  हजार                    2   लाख               6  लाख            15  लाख  

तसेच संपूर्ण राज्यात केंद्र शासनाकडून पुरस्कार मिळालेल्या पंचायत समितीला संबंधित वर्षात राज्य शासनातर्फे चार लाख रुपये व केंद्र पुरस्कृत निर्मल पुरस्कार योजनेअंतर्गत केंद्र शासनाकडून पुरस्कार मिळाल्यानंतर संबंधित प्रत्येक जिल्हा परिषदेला संबंधित वर्षात राज्य शासनातर्फे वीस लाखाचा तसेच ज्या जिल्हा परिषदांमधील जास्तीत जास्त टक्के ग्रामपंचायतींना निर्मलग्राम पुरस्कार मिळेल त्या जिल्हा परिषदेला 10 लाखांची बक्षिसे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या नावाने देण्यात येतात.

सन 2005 – 2006 पासून तालुका, जिल्हा विभाग व राज्य पातळीवर प्रत्येक स्तरावर पात्र असलेल्या ग्रामपंचायतीमधून स्वच्छ अंगणवाडी व स्वच्छ प्राथमिक शाळांची निवड करून त्यांच्यातून प्रत्येक स्तरावर सावित्रीबाई फुले स्वच्छ अंगणवाडी व साने गुरुजी स्वच्छ प्राथमिक शाळा यांच्या नावाने रोख स्वरुपात बक्षिसे देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात येतो.

विभाग                  पंचायत समिती          जिल्हा              विभाग              राज्य 

प्राथमिक शाळा         10 हजार             50 हजार           1 लाख           3 लाख 

अंगण वाडी               5 हजार              25 हजार         50 हजार         1 लाख

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.