मौलाना आझाद नॅशनल ऍकॅडमी फॉर स्किल्स
मौलाना आझाद नॅशनल ऍकॅडमी फॉर स्किल्स

मौलाना आझाद नॅशनल ऍकॅडमी फॉर स्किल्स

29 मार्च 2016 रोजी उद्योजकता नाविन्य व कौशल विकास कार्यक्रम मौलाना आझाद नॅशनल ऍकॅडमी फॉर स्किल्स, मानस केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री डॉ नजमा हेपतुल्ला यांच्याद्वारे सुरू करण्यात आला.

मानस एक पहिले व वेगळे पाऊल आहे ज्या अंतर्गत विविध कौशल क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणारे प्रतिष्ठित व्यक्ती कौशल विकास योजनेत सहभागी होतील ज्याद्वारे अल्पसंख्यांक गटातील वंचित वर्गास अधिक लाभ उपलब्ध होईल.

मानसचे लक्ष्य स्किल इंडिया अधिक यशस्वी बनविणे त्या माध्यमातून भारत सरकारचे सबका साथ सबका विकास हे ध्येय पूर्ण होईल.

मानस अखिल भारतीय स्तरावर सार्वजनिक खाजगी भागीदारी च्या आधारे प्रशिक्षण उपलब्ध करते यामध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तराचे प्रतिष्ठित प्रशिक्षक मदत करतात.

मानस ची स्थापना अल्पसंख्यांक कार्य मंत्रालयाच्या तत्त्व ध्यानात राष्ट्रीय अल्पसंख्यांक विकास व वित्त विकास निगम द्वारे 11 नोव्हेंबर 2014 रोजी करण्यात आली आहे.

मानस देशातील अल्पसंख्यांक गटाचे कौशल्य विकास आवश्यकता पूर्ण करण्यासाठी एक संस्थानिक व्यवस्था आहे.

मदरसा मस्जिद आणि अल्पसंख्यांक संस्थानांना मानसच्या माध्यमातून अल्पसंख्यांक कार्य मंत्रालयाच्या कौशल विकास कार्यक्रमात जोडण्यात आले आहे.

 

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.