जननी सुरक्षा योजना
जननी सुरक्षा योजना

जननी सुरक्षा योजना

योजनेची सुरुवात:-

1 एप्रिल 2005

योजनेत कार्यवाही:-

दहावी पंचवार्षिक योजना

उद्देश:-

दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील माता मृत्यू दर आणि शिशु मृत्यु दर दर कमी करणे

जननी सुरक्षा योजना ही योजना राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशनच्या एक घटक आहे.

जननी सुरक्षा योजना ही योजना राष्ट्रीय मातृत्व लाभ योजनेच्या जागी सुरू करण्यात आली.

जननी सुरक्षा योजना या योजनेचा लाभ एकोणवीस वर्षांपेक्षा अधिक वयाच्या स्त्रियांना पहिल्या दोन प्रसूतीच्यावेळी दिला जातो

जननी सुरक्षा योजना या योजनेअंतर्गत स्त्रियांना प्रसूतिपूर्व घरापासून चार केंद्रापर्यंत परिवहन सोयी उपलब्ध केल्या जातात

या योजनेंतर्गत दारिद्र्यरेषेखालील सर्व लाभार्थी अनुसूचित जाती अनुसूचित जमातीतील सर्व गर्भवती मातांना दारिद्र्यरेषेखालील नसलेल्या देखील महिलांना लाभ दिला जातो या लाभार्थी महिलेचे वय प्रसव पूर्ण नोंदणी करताना कमीत कमी 19 वर्षे असावे या योजनेचा लाभ दोन जिवंत अपत्यांपर्यंत देय असतो

ग्रामीण व शहरी भागातील फक्त दारिद्र्यरेषेखालील लाभार्थींची प्रसुती झाल्यास आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यास रुपये पाचशे एवढे अनुदान लाभार्थींना देय आहे

शहरी भागातील लाभार्थींची प्रसिद्धी कोणत्याही आरोग्य संस्थेत झाल्यास रुपये 600 एवढे अनुदान प्रसूतीनंतर सात दिवसाच्या आत देय आहे

ग्रामीण भागातील लाभार्थींची प्रसिद्धी कोणत्याही आरोग्य संस्थेत झाल्यास रुपये 700 एवढे अनुदान प्रसूतीनंतर सात दिवसाच्या आत देय आहे

सिझेरियन शस्त्रक्रिया झाल्यास लाभार्थीस 1500 रुपये लाभ देय आहे.

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.