राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना

या योजना सुरु करण्याबाबत चा शासन निर्णय 31 मे 2011 रोजी पारित करण्यात आला

या योजनेसाठी विमा कंपनीची निवड करणे तसेच योजनेच्या अंमलबजावणीसाठी सोसायटीची स्थापना करणे व इतर प्राथमिक बाबींची पूर्तता करण्यासाठी काही कालावधी लागल्याने ही योजना पहिल्या टप्प्यात रायगड धुळे सोलापूर नांदेड अमरावती गडचिरोली मुंबई शहर व मुंबई उपनगर या आठ जिल्ह्यांमध्ये दिनांक 2 जुलै 2012 पासून सुरू करण्यात आली.

दुसऱ्या टप्प्यात उर्वरित जिल्ह्याचा संपूर्ण राज्यात दिनांक 21 नोव्हेंबर 2013 पासून सुरू करण्यात आली आहे.

योजनेचा उद्देश

राज्यात दारिद्र रेषेखालील व्यक्तींना हृदय विकार मेंदू व मज्जासंस्था विकार कर्करोग व मूत्रपिंड प्रत्यारोपण या गंभीर व महागडे आजारावरील उपचार मोफत मिळावे यासाठी शासनाने जीवनदायी आरोग्य योजना सुरु केली होती.

या योजनेमध्ये समाविष्ट असलेल्या झाडांची संख्या वाढवून लाभार्थ्यांची उत्पन्न मर्यादा वाढविण्याची मागणी लोकप्रतिनिधींकडून सातत्याने केली जात होती.

त्यानुसार योजना बंद करून दारिद्र्यरेषेखालील व दारिद्र्यरेषेवरील कुटुंबाकरिता विमा कंपनीच्या साह्याने नवीन राजीव गांधी जीवनदायी योजना आरोग्य योजना सुरू करण्यात आली आहे.

या योजनेचा मुख्य उद्देश सर्वसामान्य जनतेच शासकीय तसेच खाजगी रुग्णालयांमध्ये मोफत व दर्जेदार उपचार मिळणे हा आहे.

योजनेची वैशिष्ट्ये

दारिद्र रेषेखालील पिवळी अंत्योदय अन्न योजना अन्नपूर्णा शिधापत्रिकाधारक कुटुंबे आणि दारिद्र्यरेषेवरील एक लक्ष रुपये पर्यंत वार्षिक उत्पन्न असलेली केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबे शासकीय निमशासकीय कर्मचारी व आय करदाते वगळून योजनेचे लाभार्थी आहेत.

लाभार्थी

या योजनेचा लाभ योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्यास आरोग्य ओळखपत्र किंवा ओळख पत्र मिळाले नसल्यास वैद्य शिधापत्रिका व फोटो ओळखपत्राच्या आधारे मिळवू शकतो.

योजनेमध्ये समाविष्ट असलेल्या लाभार्थी कुटुंबांचा विमा हप्ता शासनाकडून विमा कंपनीस अदा केला जातो.

या योजनेअंतर्गत लाभार्थी कुटुंबास प्रतिकुटुंब प्रतिवर्ष 1.5 रुपयाच्या मर्यादेपर्यंत मूत्रपिंड प्रत्यारोपण यासाठी 2.50 रुपये लक्ष्या मर्यादेपर्यंत मोफत उपचार दिले जातात.

या योजनेअंतर्गत ती स्पेशालिटी वरील 1971 प्रोसिजर्स चा समावेश असून यावरील संपूर्ण उपचार निशुल्क असून उपचार सुरू होण्यापूर्वी pre-existing असलेल्या आजारांवर उपचार दिले जातात

या योजनेअंतर्गत रुग्णास भोजन व एक वेळचा परतीचा प्रवास खर्चही दिला जातो

या योजनेअंतर्गत माननीय मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली परिषदेची स्थापना करण्यात आली असून योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना सोसायटी ची स्थापना करण्यात आली असून सदर सोसायटीचे प्रमुख हे अखिल भारतीय सेवेतील प्रशासकीय अधिकारी असतात त्यांचे सोसायटी वरील पदनाम मुख्य कार्यकारी अधिकारी असे आहे.

योजनेच्या अंमलबजावणीसाठी निविदा पद्धतीने विमा कंपनीची निवड करण्यात येते निवड केल्यानंतर सोसायटी व विमा कंपनी यांच्यामध्ये सामंजस्य करार केला जातो व त्यानुसार योजनेची अंमलबजावणी होते.

योजनेमध्ये सोसायटीनेही निश्चित केलेल्या निकषांमध्ये बसणाऱ्या ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर सदर रुग्णांची तपासणी करून त्यांना योजनेमध्ये सहभागी करून घेण्याबाबत निर्णय घेण्यात येतो.

या योजनेमध्ये समाविष्ट सर्व प्रोसिजर किदर हे निश्चित केलेले असून त्यानुसार सर्व रुग्णालयांना त्यांच्या दर्जाप्रमाणे दर निश्‍चित केले जातात.

योजनेमध्ये समाविष्ट रुग्णालयांमध्ये आरोग्य यांची नियुक्ती करण्यात येते त्यांच्यामार्फत योजनेअंतर्गत घेऊ इच्छिणाऱ्या रुग्णाचा आवश्यक ती सर्व मदत व मार्गदर्शन केले जाते.

योजनेचा लाभ मिळविण्यासाठी कोणत्याही कागदपत्रांच्या पूर्ततेची आवश्यकता नाही फक्त आरोग्यपत्र आरोग्य ओळखपत्र किंवा वर्ग शिधापत्रिका व फोटो ओळखपत्राच्या आधारे लाभार्थ्यास उपचार घेता येतात.

योजना संपूर्णपणे संगणकीकृत असून रुग्णाच्या नोंदणीपासून ते रुग्णालयांचे दावेदार करण्यापर्यंतची सर्व कामे ऑनलाइन पद्धतीने पार पाडली जातात.

राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना दारिद्र्यरेषेखालील पिवळे शिधापत्रिकाधारक दारिद्र्यरेषेवरील केशरी शिधापत्रिकाधारक  अन्नपूर्णा म्हणतो तशी the पत्रिका धारकांनी शेतकरी आत्महत्याग्रस्त 14 जिल्ह्यातील

  1. औरंगाबाद
  2. जालना
  3. परभणी
  4. हिंगोली
  5. बीड
  6. नांदेड
  7. उस्मानाबाद
  8. लातूर
  9. अमरावती
  10. अकोला
  11. वाशिम
  12. बुलढाणा
  13. यवतमाळ व
  14. वर्धा

पांढऱ्या पत्रिका धारक शेतकरी कुटुंबासह रुग्णांना निवडक आजारांवरील उपचारांकरिता रोख रक्कम विरहित वैद्यकीय सुविधा पुरविण्यासाठी नॅशनल इन्शुरन्स कंपनीच्या सहयोगाने राबविण्यात येते.

या योजनेअंतर्गत निवडक 489 रुग्णालयात द्वारे 78 शासकीय व 411 खाजगी रोख रक्कम विरहित वैद्यकीय सुविधा पुरवली जाते.

 

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.