Pradhanmantri mudra yojna
Pradhanmantri mudra yojna

मुद्रा बँक ( Micro Units Development and Refinance Agency – MUDRA)  

– योजनेची घोषणा – वित्तमंत्री अरुण जरतली यांनी 2015-16 च्या अंदाजपत्रकीय भाषणात मुद्रा योजनेची घोषणा केली.

– सुरवात – 8 एप्रिल, 2015

 

– उददेश –

१) सूक्ष्म वित्त संस्था (MFI) आणि छोटे व्यापारी, रिटेलर, स्वसहाय्यता गट आणि व्यक्तींना उधार देणाऱ्या कंपनीस वित्तीय प्रक्रियांमध्ये मदत करणे

२) लघु व सूक्ष्म व्यवसाय करणाऱ्या स्व उद्योजकांना आर्थिक पाठबळ देणे.

३) व्यवसाय सूक्ष्म वित्तपुरवठा करणाऱ्या संस्थांना धोरण ठरविण्यासाठी मार्गदर्शन तत्वे ठरवून देणे.

४) सूक्ष्म वित्तपुरवठा संस्थांची नोंदणी करणे व अशा संस्थांवर देखरेख, ठेवणे त्याच बरोबर त्यांचा दर्जा ठरविणे

५) सूक्ष्म  येणाऱ्या कर्जासाठी ग्यारेंटि  क्रेडिट ग्यारेंटि स्कीम तयार करणे.

६) वितरित करण्यात आलेल्या कर्जाची पाहणी, कर्ज देणे आणि देण्याच्या प्रक्रियेमध्ये मदतीसाठी योग्य तंत्रज्ञान उपलब्ध करणे.

७) लघुउद्योजकांना वित्त पुरवठा करणे.

 

– मुद्रा बँकेचे लक्ष्य –

१) अनोपचारिक क्षेत्रातील लघु व्यावसायिक आणि देशातील  इतर महत्वाकांक्षी छोट्या व्यावसायिकांना 5.7 कोटीपेक्षा अधिक बँक कर्ज उपलब्ध करणे.

२) छोट्या उद्योगांसाठी वित्त पुरवठा उपलब्ध करणे.

 

– या योजने अंतर्गत कर्जाची उपलभडता हि फक्त छोट्या व्यापारासाठी करण्यात आली आहे.

– हि योजना शेती, वाहतूक, सामुदायिक, सामाजिक व वयक्तिक सेवा, खाद्य उत्पादन आणि टेक्सटाईल क्षेत्र इ. साठी लागू करण्यात आले आहे.

– या योजने अंतर्गत शैक्षणिक, घर खरेदी करणे यासारख्या उद्देशांसाठी कर्ज दिले जात नाही.

 

– मुद्रा बँक  योजनेचा लाभ

१) या योजनेतून शिक्षित युवकांना रोजगार मिळण्यास मदत होईल.

२) या योजनेतुन छोट्या व्यापाराचे मनोबल वाढून देशाचा आर्थिक विकास साध्य करता येईल.

 

– मुद्रा बँक योजनेअंतर्गत लघुउद्योगांना विकासाच्या अवस्थांच्या आधारे  प्रकारे वित्त पुरवठा केला जातो.

१) शिशु श्रेणी व्यवसायास 50,000 ते कर्ज मिळू शकते.

२) किशोर श्रेणी व्यवसायात 50,000 ते 5,00,000 रु. कर्ज मिळू शकते.

 

मुद्रा योजने अंतर्गत कर्ज मिळवण्यासाठीची पात्रता

१) ती व्यक्ती भारताची नागरिक असावी.

२) देशातील कोणतीही व्यक्ती ज्याचा स्वतःचा किंवा एखाद्या बरोबरभागीदारीचा व्यापार आहे. अशा व्यक्ती आपल्या कागद पत्रामार्फत मुद्रा कर्ज योजनेचा लाभ घेऊ शकते.

 

– महत्वपूर्ण कागदपत्रे

 

MUDRA  योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील कागदपत्रीची पूर्तता करणे आवश्यक ठरते.

१) स्व-सत्य प्रमाणपत्र

२) दोन फोटोग्राफ

३) जात प्रमाणपत्र (SC/ST)

४) उदयोगासंबंधित कागदपत्रे, लायसेन्स व सर्टिफिकेट

५) उद्योगासंबंधी संपूर्ण माहिती

 

– मुद्रा बँक योजना सिडबीची उपकंपनी या नात्याने RBI कडे बिगर बँकिंग वित्तीय संस्था म्हणून नोंदणीकृत आहे.

– मुद्रा बँकेवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) चे नियंत्रण आहे.

– मुद्रा बॅंकेअंतर्गत वार्षिक 7% दराने वित्तपुरवठा केला जातो.

– मुद्रा बॅंकेअंतर्गत जानेवारी 2016 पर्यंत 84, 672, 36 कोटी रु. वितरित करण्यात आले, त्यामधील 98,057,33 रु. शिशु श्रेणी, 28,359,87 रु. किशोर श्रेणीस आणि 18,255,16 रु. तरुण श्रेणीअंतर्गत वितरित करण्यात आले आहे.

– मुद्रा बँके अंतर्गत जानेवारी 2016 पर्यंत एकूण 2.19 कोटी कर्जदारांनी या योजनेचा लाभ घेतला, ज्यामधील उद्योजक आणि 1.10 कोटी अनुसूचित जाती/जमाती व इतर मागास वर्गातील कर्जदार आहेत.

 

MUDRA योजनेतील प्रथम 4 लाभार्थी

१) बबिता (हापूर)

२) राजेश जिंदाल

३) पुष्पा (मुरादनगर)

४) सामीरुद्दीन ( गाझियाबाद)

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.