Sagar Mala Project
Sagar Mala Project

सागरमाला प्रोजेक्ट (Sagar Mala Project)

सागरमाला प्रोजेक्टची सुरवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याद्वारे 14 एप्रिल, 2016 रोजी मुंबई येथे झालेल्या मेरीटाईम इंडिया कार्यक्रमावेळी करण्यात आली.

– सागरमाला प्रोजेक्ट अंतर्गत निळ्या क्रांतीतील महत्वपूर्ण बदलाबरोबर बंदर आधारित विकासवाढीस चालना देण्यात येणार आहे.

– सागरमाला प्रोजेक्टअंतर्गत Ministry of Shipping द्वारे 700 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येईल.

सागरमाला प्रोजेक्ट उददेश

१) योजनेचा प्रमुख उद्देश बंदराच्या जवळ प्रत्यक्ष / अप्रत्यक्ष विकासास प्रोत्साहन देणे.

२) बंदरापर्यंत मालाची गती, सुरक्षा व कमी खर्चात ने-आण  करण्यासाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करणे.

३) या अंतर्गत प्रतिकृतीबरोबर विकासाच्या नवीन क्षेत्रात विकास करणे व महत्वपूर्ण प्रतिकृतीस प्रोत्साहन देणे.

४) मुख्य बाजारापर्यंत संपर्क वाढविणे, त्याचबरोबर रेल्वे, क्षेत्रीय व रस्ते सेवांमध्ये सुधारणा करणे.

५) भारताच्या GDP मध्ये वाणिज्यिक वस्तूंचे व्यापार प्रमाण 42% आहे. ते वाढवून 70-75% करणे.

 

सागराला प्रोजेक्टअंतर्गत क्षेत्र

A) बंदराचे आधुनिकीकरण

१) 5-6 नवीन बंदराची निर्मिती करणे

२) बंदराची क्षमता वाढविणे

३) बंदराची खोली वाढविणे

 

B) बंदराच्यामध्ये संपर्क

१) किनारपट्टी क्षेत्र वाहतूक मजबूत बनविणे

२) भारतीय रेल्वे मंत्रालयाने 20, 000 कोटी रुपयांची पोर्ट रेल्वे संपर्क (SPV) बनवून मालभाडे खर्च कमी करण्यास प्रोत्साहन दिले आहे.

 

C) बंदर आधारित विकास

१) किनारपट्टी रेषेबरोबर औद्योगिक आणि निर्यात विकासास गती देणे.

२) किनारपट्टी रेषेजवळील किनारपट्टी आर्थिक क्षेत्रा (CEZs) बरोबर बंदर विकास साध्य करणे.

 

D) किनारपट्टी सामुदायिक विकास

१) मासेमारी करणारे व इतर किनारपट्टी समुदायास रोजगार उपलब्ध करणे.

२) भारतीय किनारपट्टीजवळील द्वीपांचा (बेटांचा) विकास करणे.

 

E) इतर क्षेत्र

१) किनारपट्टी पर्यटन व मनोरंजासंबंधी कार्यक्रमास प्रोत्साहन देणे.

२) छोटी समुद्री जहाज, किनारपट्टी जहाज वाहतूक वाढीस लावणे.

३) जहाज निर्माण, जहाज दुरुस्ती व जहाज पूर्ण बांधणीस प्रोत्साहन देणे.

४) लॉजिस्टिक पार्क, गोडावून, समुद्री सेवा निर्माण करणे.

 

 

सागरमाला प्रोजेक्टअंतर्गत 6 मोठ्या बंदराचा विकास करण्यात येईल.

  1. Kerala – Vizhinjam International Seaport
  2. Tamilnadu – Colachel Seaport
  3. Maharashtra – Vadhavan Port
  4. Karnataka – Tadadi Port
  5. Andhra Pradesh – Machhlipatnam Port
  6. West Bengal – Sagar Island Port

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.