महत्त्वाची सूचना

MPSC राज्यसेवा व संयुक्त पूर्व परीक्षा अपडेट्स व सराव प्रश्नसंच प्रसिद्ध!

मराठी वाक्प्रचार व त्यांचे अर्थ – संपूर्ण यादी

calendar_today update person लेखक: Vinay Yadav verified MPSC Today अधिकृत लेख
Marathi Idioms Study Guide
Marathi Idioms Study Guide
notifications_active

दररोज मोफत अपडेट्स, चालू घडामोडी व PDF नोट्स मिळवा

आमच्या अधिकृत चॅनल्सवर त्वरित सामील व्हा:

मराठी व्याकरणाच्या अभ्यासात वाक्प्रचारांना महत्त्वाचे स्थान आहे. वाक्प्रचारांचा अर्थ, त्यांचा योग्य संदर्भ आणि वाक्यातील उपयोग समजून घेतल्याने मराठी भाषेचे आकलन अधिक चांगले होते. महाराष्ट्रातील विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वाक्प्रचारांचा अभ्यास उपयुक्त ठरतो.

या पानावर MPSC व इतर महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी वाक्प्रचार व त्यांचे अर्थ यांची संकलित यादी दिली आहे. ही यादी मराठी व्याकरण शिकवणाऱ्या विविध पुस्तकांमधील संदर्भांच्या आधारे संकलित करण्यात आली आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) राज्यसेवा, गट-ब, गट-क तसेच इतर संबंधित भरती परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना या यादीचा अभ्यास, शब्दसंग्रह वाढवणे आणि उजळणी करणे यासाठी उपयोग होऊ शकतो.

खालील तक्त्यात वाक्प्रचार आणि त्यांचे अर्थ दिले आहेत. प्रत्येक वाक्प्रचाराचा भावार्थ समजून घ्या आणि त्याचा योग्य वाक्यात उपयोग करण्याचा सराव करा. परीक्षेच्या तयारीसाठी आपल्या संबंधित परीक्षेचा अधिकृत अभ्यासक्रम आणि उपलब्ध मागील प्रश्नपत्रिकांचाही संदर्भ घ्या.

वाक्प्रचारअर्थ
अ
अंग काढून घेणेसंबंध तोडणे
अंगद धरणेलठ्ठ होणे
अंगाचा तिळपापड होणेअतिशय संताप येणे
अंगाची लाही होणेखूप राग येणे
अंगाला होणेअंगाला छान बसणे
अंगावर काटा येणेभीती वाटणे
अंगावर काटे उभे राहणेभीतीने अंगावर शहारे येणे
अंगावर मूठभर मांस चढणेधन्यता वाटणे
अंगी ताठा भरणेमग्रुरी करणे े
अंथरूण पाहून पाय पसरणेएपती नुसार खर्च करणे
अग्निदिव्य करणकठीण कसोटीला उतरणेे
अजरामर होणेकायमस्वरूपी टिकणे
अटकेपार झेंडा लावणेफार मोठा पराक्रम गाजवला
अट्टहास करणेआग्रह धरणे
अठरा गुणांचाखंडोबा लबाड माणूस
अठराविश्वे दारिद्र्य असणेपराकोटीचे दारिद्र्य असणे
अडकित्त्यात सापडणेपेचात सापडणे
अत्तराचे दिवे लावणेभरपूर उधळपट्टी करणे
अनभिज्ञ असतेएखाद्या विषयाचे मुळीच ज्ञान असणे
अनमान करणेसंकोच करणे
अन्नास जागणेउपकाराची आठवण ठेवणे
अन्नास मोताद होणेआत्यंतिक दारिद्र्यात जगणे
अन्नास लावणेउपजीविकेचे साधन मिळवून देणे
अपूर्व योग येणेदुर्मिळ योग येणे
अप्रूप वाटणेआश्चर्य किंवा कौतुक वाटणे
अभंग असणेअखंड असणे
अभिलाषा धरणेएखाद्या गोष्टीची इच्छा बाळगणे
अमलात आणणेकारवाई करणे
अर्धचंद्र देणेहकालपट्टी करणे
अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणेथोड्याशा यशाने चढून जाणे
अवाक होणेआश्चर्यचकित होण
आ
आंदण देणेदेऊन टाकणे
आंबून जाणेभेटून जाणे थकणे विपर्यास होणे
आकांडतांडव करणेरागाने आदळआपट करणे
आकाश ठेंगणे होणेअतिशय आनंद होणे
आकाश पाटणेचारी बाजूंनी संकटे येणे
आकाश पाताळ एक करणेफार मोठ्याने आरडाओरड करून थैमान घालने
आकाशाची कुराडआकस्मिक संकट
आकाशाला गवसणी घालनेआवाक्याबाहेरची गोष्ट करण्याचा प्रयत्न करणे
आखाडे बांधणेमनात आराखडा किंवा अंदाज करणे
आगीत तेल ओतणेभांडण किंवा वाद विकोपाला जाईल असे करणे
आज लागणेझळ लागणे
आड येणेअडथळा निर्माण करणे
आतल्या आत कुढणेमनातल्या मनात दुःख करणे
आत्मसात करणेमिळवणे अंगी बाणवणे
आपल्या पोळीवर तूप ओढणेस्वतःचा फायदा करून घेणे
आभाळ कोसळणेएकाएकी फार मोठे संकट येणे
आभाळाला कवेत घेणेमोठे काम साध्य करणे
आयोजित करणेसिद्धता करणे प्रभावित होणे
आवर्जून पाहणेमुद्दामहून पाहण
इ
इतिश्री करणेशेवट करणे
उ
उंटावरून शेळ्या हाकणेमनापासून काम न करणे दूरवरून निर्देश देणे स्वतः सामील न होता सल्ले देणे
उंबराचे फूलक्वचित भेटणारी व्यक्ती
उखळ पांढरे होणेपुष्कळ फायदा होणे
उखाळ्या-पाखाळ्या काढणेएकमेकांची उणीदुणी काढणे किंवा दोष देणे
उचलबांगडी करणेएखाद्याला जबरदस्तीने हलवणे
उच्छाद मांडलाधिंगाना घालने
उताणा पडणेपराभूत होणे
उताणे पडणेपराभूत होणे
उत्पात करणेविध्वंस करणे
उदक सोडलेएखाद्या वस्तूवरील आपला हक्क सोडून देणे
उदास होणेखिन्न होणे
उदास होनेखिन्न होणे
उध्वस्त होणेनाश पावणे
उन्मळून पडणेमुळासकट कोसळणे
उन्हाची लाही फुटणेअतिशय कडक ऊन पडणे
उपोषण करणेलंघन करणे उपाशी राहणे
उराशी बाळगणेमनात जतन करुन ठेवणे
उलटी अंबारी हाती येणेभीक मागण्याची पाळी येणे
उष्टे हाताने कावळा न हाकणकधी कोणाला यत्किंचितही मदत न करणे
उसंत मिळणेवेळ मिळणे
उसने बळ आणणेखोटी शक्ती दाखविणे
उसने बळ आननेखोटी शक्ती दाखविणे
ऊ
ऊहापोह करणेसर्व बाजूंनी चर्चा करून साधकबाधक विचार करणे
ए
एक घाव दोन तुकडे करणेताबडतोब निर्णय घेऊन गोष्ट निकालात काढणे
ओ
ओक्साबोक्शी रडणेमोठ्याने आवाज करत रडणे
ओढा असणेकल असणे
क
कंठशोष करणओरडून गळा सुकवणे उगाच घसाफोड करून खूप समजावून सांगणे े
कंठस्नान घालनेठार मारणे
कंपित होणेकापणे थरथरणे
कंबर कसणेएखाद्या गोष्टीसाठी हिम्मत करून तयार होणे
कच्छपी लागणेनादी लागणे
कट करणेसख्य नसणे मैत्री नसणे
कटाक्ष असणेकल असणे
कणव असणेआस्था किंवा करून असणे
कणिक तिंबणेखूप मार देणे
कपाळ फुटणेदुर्दैव ओढवणे
कपाळमोक्ष होणेमरण पावणे
कसं लावणेसामर्थ्य पणाला लावणे
कसून मेहनत करणेखूप नेटाने कष्ट करणे
कहर करणेअतिरेक करणे
काका वर करणेआपल्याजवळ काही नाही असे दाखवणे
कागदी घोडे नाचवणेलेखनात शूरपणा दाखविणे
काट्याचा नायटा होणेशुल्लक गोष्टीचा भयंकर परिणाम होणे
काट्याने काटा काढणेका शत्रूच्या सहाय्याने दुसर्‍या शत्रूचा पराभव करणे
काण फुंकणेदुसऱ्याच्या मनात किल्मिष निर्माण करणे
कात्रीत सापडणेदोन्ही बाजूंनी संकटात सापडले
कानउघाडणी करणेक** शब्दात चूक दाखवून देणे
कानशिलं ची भाजी होणेमारून मारून कानशिलांच्या आकार बदलणे
कानाडोळा करणेदुर्लक्ष करणे
कानावर हात ठेवणेमाहीत नसल्याचा बहाणा करणे
कापरे सुटणेघाबरल्यामुळे थरथरणे
कायापालट होणेस्वरूप पूर्णपणे बदलणे
कारवाया करणेकारस्थाने करणे
काळजाचे पाणी पाणी होणेअति दुःखाने मन विदारण होणे
काळीज उडणेभीती वाटणे
काळ्या दगडावरची रेघखोटे न ठरणारे शब्द
कावरा बावरा होणेबाबरने
किरकिर करणेएखाद्या गोष्टीबाबत सतत तक्रार करणे
कुंपणानेच शेत खाणेज्यांच्यावर जबाबदारी आहे अशा विश्वासातील माणसाने फसवणे
कुणकुण लागणेचाहूल लागणे
कुत्रा हाल न खाणेअतिशय वाईट स्थिती येणे
कूच करनेवाटचाल करणे
केसाने गळा कापणेवरकरणी प्रेम दाखवून कप्तान एखाद्याचा घात करणे
कोंबडे झुंजवणेदुसऱ्यांचे भांडण लावून आपण मजा पाहणे
कोडकौतुक होणेलाड होणे
कोपरापासून हात जोडणेकाही संबंध न राहण्याची इच्छा प्रकट करणे
ख
खंड न पडणेएखादे कार्य करताना मध्ये न थांबणे
खडा टाकून पहाणेअंदाज घेणे
खडे चारणेशरण येण्यास भाग पाडणे
खडे फोडणेदोष देणे
खळखळ करणेनाखुशीने सतत नकार देणे टाळाटाळ करणे
खसखस पिकणेमोठ्याने हसणे
खाजवुन खरुज काढणेमुद्दाम भांडण करू उकरून काढणे
खापर फोडणेएखाद्यावर निष्कारण ठपका ठेवणे
खायचे वांदे होणेउपासमार होणे खायला न मिळणे
खाल्ल्याघरचे वासे मोजणेउपकार करणार याचे वाईट चिंतेने
खितपत पडणेक्षीण होत जाणे
खूणगाठ बांधणेनिश्चय करणे
खो घालनेविघ्न निर्माण करणे
ग
गंगेत घोडे न्हानेकार्य तडीस गेल्यावर समाधान वाटणे
गट्टी जमणेदोस्ती होणे
गढून जाणेमग्न होणे गुंग होणे
गर्भगळीत होणेअतिशय घाबरणे
गळ घालनेअतिशय आग्रह करणे
गळ्यात धोंड पडणेतिचं असताना जबाबदारी अंगावर पडणे
गळ्यात पडणेएखाद्याला खूपच भीड घालने
गळ्यातील ताईतअतिशय प्रिय
गळ्याशी येणेनुकसानीबाबत अतिरेक होणे
गाजावाजा करणेखूप प्रसिद्धी मिळविण्याचा प्रयत्न करणे
गाजावाजा करनेप्रसिद्धी मिळविण्याचा प्रयत्न करणे
गाडी पुन्हा रुळावर येणेचुकीच्या मार्गावरून पुन्हा पूर्ववत मार्ग योग्य मार्गाला येणे
गाशा गुंडाळणेएकाएकी निघून जाणे एकदम पसार होणे
गुजराण करणेनिर्वाह करणे
गुण दाखवणेनिर्गुण दाखवून दुर्गुण दाखवणे
गुण्यागोविंदाने लहानेप्रेमाने एकत्र रहाणे
गुमान काम करणेनिमूटपणे काम करणे
ग्राह्य धरणेयोग्य आहे असे समजणे
घ
घडी भरणेविनाश काळ जवळ येऊन ठेपणे
घर डोक्यावर घेणेअतिशय गोंगाट करणे
घर धुवून नेणेसर्वस्वी लुबाडणे
घाम गाळणेखूप कष्ट करणे
घालून-पाडून बोलणेदुसऱ्याच्या मनाला लागेल असे बोलणे
घोकंपट्टी करणेअर्थ लक्षात न घेता केवळ पाठांतर करणे
घोडे पुढे धामटणेस्वतःच्या फायद्यासाठी पुढे सरसावणेे
घोडे पेंड खाणेअडचण निर्माण होणे े
घोडे मारणेनुकसान करणे
च
Yogakshema चालविणेरक्षणाची काळजी वाहणे जीवाची मुंबई करणे अतिशय चैनबाजी करणे
चक्कर मारणेफेरफटका मारणे
चतुर्भुज होणेलग्न करणे
चार पैसे गाठीला बांधणेथोडीफार बचत करणे
चारी दिशा मोकळ्या होणेपूर्ण स्वातंत्र्य मिळणे
चाहूल लागणेमागोवा लागणे
चाहूल लागणेएखाद्याचे अस्तित्व जाणवणे
चिंता वाहनेआस्था असणे
चितपट करणेकुस्ती हरविणे
चित्त विचलित होणेमूळ विषयाकडे लक्ष दुसरीकडे जाणे
चुरमुरे बाळा खात बसणेखजील होणे
चेहरा खोलनेआनंद होणे
चौदावे रत्न दाखवणेमार देणे
छ
छातीत धस्स देशी गोळा येणेअचानक खूप घाबरणे
छाननी करणेतपास करणे
छाप पडणेपरिसीमा गाठणे प
छोटे शाई चालवणेदांडगाई करणे
ज
जंग जंग पछाडणेनिरनिराळ्या रीतींनी प्रयत्न करणे कमालीचा प्रयत्न करणे
जम बसनेस्थिर होणे
जमीनदोस्त होणेपूर्णपणे नष्ट होणे
जळफळाट होणेरागाने लाल होणे
जिभेला हाड नसणेवाटेल ते बेजबाबदार पणे बोलणे जिवात जिव येणे काळजी नाहीशी होऊन पुन्हा धैर्य येणे
जिव थोडा थोडा होणेअतिशय काळजी वाटणे
जिवाचे रान करणेखूप कष्ट सोसणे
जिवावर उठणेजीव घेण्यास उद्युक्त होणे
जीव अधीर होणेउतावीळ होणे
जीव की प्राण असणेप्राणाइतके प्रिय असणे
जीव खाली पडणेकाळजी मुक्त होणे
जीव गहाण ठेवणेकोणत्याही त्यागास तयार असणे
जीव टांगणीला लागणेचिंताग्रस्त होणे
जीव भांड्यात पडणेकाळजी दूर होणे
जीव मेटाकुटीस येणेत्रासाने अगदी कंटाळून झाली
जीव मोठीच धरणेमन घट्ट करणे
जीव वरखाली होणेघाबरणे
जीवाची मुंबई करणेअतिशय चैनबाजी करणे
जीवाला घोर लागणेखूप काळजी वाटणे
जीवावर उड्या मारणेदुसऱ्यावर अवलंबून राहून चैन करणे
जीवावर उदार होणेप्राण देण्यास तयार होणे
जोपासना करणेकाळजीपूर्वक संगोपन करणे
ज्याचे नाव ते असणेउपमा देण्यात उदाहरण नसणे
झ
झळ लागणेथोडाफार दुष्परिणाम भोगावा लागणे
झाकले माणिकसाधा पण गुणी मनुष्य
झुंज देणे लढा देणेसंघर्ष करणे
ट
टक लावून पाहणेएकसारखे रोखून पाहणे
टाके ढीले होणेअतोनात श्रम झाल्यामुळे अंगी ताकत न रहाणे
टाहो फोडणेमोठ्याने आकांत करणे
टिकाव लागणेनिभाव लागणे
टेंभा मिरविणेदिमाख दाखवणे
ठ
ठसा उमटवणेछाप पाडणे
ठाण मांडणेएका जागेवर बसून राहणे
ड
डांगोरा पिटणेजाहीर वाच्यता करणे
डाळ शिजणेथारामानी मिळणे आणि सोया जुळणे मनाजोगे काम होणे
डाव येणेखेळात राज्य येणे
डाव साधनेसंधीचा फायदा घेऊन कार्य साधने योजलेल्या युक्तीने इष्ट वस्तू मिळविणे
डोके खाजविणेएखाद्या गोष्टीचा विचार करणे
डोक्यावर खापर फोडणेएखाद्यावर निष्कारण ठपका ठेवणे
डोक्यावर घेणेअति लाड करणे
डोक्यावर मिरी वाटणेवरचढ होणे
डोळा चुकवणेअपराधी भावनेमुळे नजरेला नजर देणं टाळणे
डोळे खिळून राहणेएखाद्या गोष्टीकडे सारखे बघत राहणे
डोळे दिपवलेथक्क करून सोडले
डोळे निवणेसमाधान होणे
डोळे फाडून पहाणेतीक्ष्ण नजरेने पाहणे आश्चर्यचकित होऊन पाहणे
डोळे फिरलेखूप घाबरणे
डोळे भरून पहाणेसमाधान होईपर्यंत पाहाने
डोळे लावून बसणेखूप वाट पाहणे
डोळे वटारणेरागाने बघणे
डोळ्यांचे पारणे फिटणेपूर्ण समाधान होणे
डोळ्यांत खुपणेसहन न होणे
डोळ्यांवर कातडे ओढणेजाणून बुजून दुर्लक्ष करणे
डोळ्यात तेल घालून रहाणेअतिशय जागृत रहाणे
डोळ्यात धूळ फेकणेफसवणूक करणे
डोळ्यात प्राण आणणेएखाद्या गोष्टीसाठी अतिशय आतुर होणे
डोळ्याला डोळा न भिडवणेघाबरून नजर न देणे
त
तगादा लावणेपुन्हा पुन्हा मागणी करणे
तगून राहणेमुखोद्गत असणे
तजवीज करणेतरतूद करणे
तडीस नेणेपूर्ण करणे
तळपायाची आग मस्तकात जाणेअतिशय संताप होणे
तळहातावर शीर घेणेजीवावर उदार होणे
ताट वाढणेजेवायला वाढणे
ताटकळत उभे राहणेवाट पाहणे
तारांबळ उडणेअतिशय घाई होणे
तारांबळ होणेघाईगडबड होणे
ताळ्यावर आननेयोग्य समज देणे
तिलांजली देणेसोडणे त्याग करणे
तोंड काळे करणेदृष्टीआड होणे नाहीसे होणे
तोंड ढाकणेबोलणे
तोंड देणेमुकाबला करणे सामना करणे
तोंड भरून बोलणेखूप स्तुती करणे
तोंडचे पाणी पळणेअतिशय घाबरले भयभयीत होणे
तोंडात बोट घालनेआश्चर्यचकित होणे
तोंडाला पाणी सुटणेलालसा उत्पन्न होणे
तोंडाला पाने पुसणेफसवणे
तोंडावाटे ब्र न काढणेएकही शब्द न उच्चारणे
तोंडीलावणेजेवताना चाखण्यासाठी एखादा पदार्थ देणे
तोंडून अक्षरं न फुटणेघाबरून न बोलणे
त्राटिकाकजाग बायको
थ
थांब न लागणेकल्पना न येणे
थुंकी झेलणेखुशामत करण्यासाठी लाचारी पत्करणे
द
दक्षता घेणेकाळजी घेणे
दगडावरची रेघखोटे न ठरणारे शब्द
दगा देणेफसवणे
दडी मारणेलपून राहणे
दत्त म्हणून उभे राहणेएकाएकी हजर होणे
दप्तरी दाखल होणेसंग्रही जमा होणे
दबा धरून बसणे टपून बसणेे
दाढी धरणेविनवणी करणे
दात ओठ खाणेद्वेषाची भावना दाखवणे
दात धरणेवैर बाळगणे
दातखिळी बसणेबोलणे अवघड होणे
दातखिळी बसणेबोलती बंद होणे
दातांच्या कन्या करणेअनेक वेळा विनंती करून सांगणे
दातास दात लावून बसणेकाही न खातो उपाशी राहणे
दाती तृण धरणेशरणागती पत्करणे
दाद मागणेतक्रार करून किंवा गार्‍हाणे सांगून न्याय मागणे
दिशा फुटेल तिकडे पडणेसैरावैरा पळणे
दिस बुडून जाणेसूर्य मावळणे
दुःखावर डागण्या देणेझालेल्या माणसाला वाईट वाटेल असे बोलून आणखी दुःख देणे धरणे धरणे हट्ट धरून बसणे
दुमदुमून जाणेनिनादून जाणे
दुसऱ्याच्या ओंजळीने पाणी पिणेदुसऱ्याच्या तंत्राने किंवा सल्ल्याने चालणे
देखभाल करणेजतन करणे
देखरेख करणेराखण करणे
देणे-घेणे नसणेसंबंध नसणे
देहातून प्राण जाणेमरण येणे
दोन हातांचे चार हात होणेविवाह होणे
द्राविडी प्राणायाम करणेसोपा मार्ग सोडून कठीण मार्गाने जाणे
ध
धडपड करणेखूप कष्ट करणे
धडा करणे जिवाच्या धडा करणेपक्का निश्चय करणे
धन्य होणेकृतार्थ होणे
धाबे दणाणणेखूप घाबरणेे
धारवाडी काटाबिनचूक वजनाचा काटा
धारातीर्थी पडणेरणांगणावर मृत्यू येणे
धिंडवडे निघणेफजिती होणे
धुडगूस घालनेगोंधळ घालून करणे
धूम ठोकणेवेगाने पळून जाणे
धूळ चारणेपूर्ण पराभव करणे
न
नक्राश्रू ढाळणअंतर्यामी आनंद होत असताना बाह्यतः दुःख दाखवणे
नक्शा उतरवणेगर्व उतरवणे
नजर करणेभेटवस्तू देणे े
नजर वाकडी करणेवाईट हेतू बाळगणे
नजरेत भरणेउठून दिसणे
नसती बिलामत येणे नसती कटकट ओढणे
नांगी टाकणेहातपाय गाळणे
नाक ठेचणेनक्शा उतरवणे
नाक मुठीत धरणेअगतिक होणे
नाक मुरडणेनापसंती दाखवणे
नाकाने कांदे सोलणेस्वतःचे दोष असूनही उगाच बढाया मारणे
नाकाला मिरच्या झोंबणेएखाद्याचे वर्म काढल्यामुळे त्याला राग येणे
नाकावर राग असणेलवकर चिडणे
नाकाशी सूत धरणेआता मरतो की घटकेने मरतो अशी स्थिती निर्माण होणे
नाकी नऊ येणेमेटाकुटीला येणे फार त्रास होणे
नाद घासणेस्वतःची कार्य साधण्यासाठी दुसर्‍याचे पाय धरणे
नाळ तोडणेसंबंध तोडणे
नाव कमावणेकीर्ती मिळवणे
नाव मिळवणेकीर्ती मिळवणे
निक्षून सांगणेस्पष्टपणे सांगणे
निद्राधीन होणेझोपणे
निवास करनेरहाणे
निष्प्रभ करणेमहत्व कमी करणे
नूर पातळ होणेरूप उतरणे
प
पडाव पडणेवस्ती करणे
पदरमोड करणेदुसऱ्यासाठी स्वतःचा पैसा खर्च करणे
पदरात घालनेसुख पटवून देणे स्वाधीन करणे
पदरात घेणेस्वीकारणे
पदरी घेणेस्वीकार करणे
पराचा कावळा करणेमामुली गोष्टीला भलतेच महत्त्व देणे
परिपाठ असणेविशिष्ट पद्धत असणे नित्यक्रम असणे
पहारा देणेराखण करणे
पाऊल वाकडे पडणेवाईट मार्गाने जाणे
पाचवीला पुजणेत्रासदायक गोष्टींची कायमची सोबत असणे
पाचवीला पूजलेएखादी गोष्ट जन्मापासून असणे
पाठ दाखवणेपळून जाणे
पाठ न सोडणेएखाद्या गोष्टीचा पिच्छा पुरवणे
पाठिंबा देणेदुजोरा देणे
पाठीशी घालनेसंरक्षण देणे
पाढा वाचणेसविस्तर हकीकत सांगणे
पाणी पडणेवाया जाणे
पाणी पाजणेपराभव करणे
पाणी मुरणेकपटाने काहीतरी लपवून ठेवणे गुप्त कट शिजवत असणे
पाणी सोडणेआशा सोडणे
पाण्यात पाहणेअत्यंत द्वेष करणे
पादाक्रांत करणेजिंकणे
पायमल्ली करणेउपमर्द करणे
पायाखाली घालनेपादाक्रांत करणे
पार पाडणेपूर्ण करणे
पार पाडणेसांगता करणे
पाळत ठेवणेलक्ष ठेवणे
पाळी येणेवेळे येणे
पाहुणचार करणेआदरातिथ्य करणे
पिंक टाकणे थुंकणे
पुंडाई करणेदांडगाईने वागणे
पुढाकार घेणेनेतृत्व करणे
पुनरुज्जीवन करणेपुन्हा उपयोगात आणणे
पोटाची damdi वळणेखायला न मिळणे
पोटात कावळे काव काव करणेअतिशय भूक लागणे
पोटात घालनेक्षमा करणे
पोटात ठेवणेगुप्तता ठेवणे
पोटात ब्रह्मराक्षस उठणेखूप खावेसे वाटणे
पोटात शिरणेमर्जी संपादन करणे
पोटाला चिमटा घेणेपोटाला न खाता राहणे
पोटावर पाय देणेउदर निर्वाहाचे साधन काढून
प्रक्षेपित करणेप्रसारित करणे
प्रघात पडणेरीत असणे
प्रचारात आणणेजाहीरपणे माहिती देणे
प्रतिकार करणेविरोध करणे
प्रतिबंध करणेअटकाव करणे
प्रतिष्ठान लाभणेमान मिळवणे
प्रतिष्ठापीत करणेस्थापना करणे
प्रत्यय येणेप्रचीती येणे
प्रश्नांची सरबत्ती करणेएक सारखे प्रश्न विचारणे
प्रस्ताव ठेवणेठराव मांडणे
प्राण कानात गोळा करणेऐकण्यासाठी अतिशय उत्सुक होणे
प्राणाला मुकलेजीव जाणे मरण येणे
प्राणावर उदार होणेजिवाची पर्वा न करणे
प्राप्त करणेमिळवणे
प्रेरणा मिळणेस्फूर्ती मिळणे
फ
फंदात न पडणेभानगडीत न अडकणे
फटफटती सकाळ होणेपोटात कावळे ओरडत भुकेने व्याकूळ होणे
फाटे फोडणेउगाच अडचणी निर्माण करणे
फिदा होणेखुश होणे
फुटाण्यासारखे उडणेझटकन राग येणेवाक्प्रचार
ब
बट्ट्याबोळ होणेविचका होणे
बडेजाव वाढवणेप्रौढी मिरवणे
बत्तर बाळ्या होणेचिंध्या होणे नासधूस होणे
बत्तीशी रंगवणेजोराने थोबाडीत मारणे
बळ लावणेशक्ती खर्च करणे
बस्तान ठोकणेमुक्काम ठोकणे
बस्तान बसणेपसंती मिळणे अनुकूलता लाभणे
बस्ती घेणेधक्का घेणे घाबरणे
बहिष्कार टाकणेेवाळीत टाकणे नकार देणे
बांधणी करणेरचना करणे
बाजार गप्पानिंदानालस्ती
बादरायण संबंध असणेओढून ताणून लावलेला संबंध असणे
बाबरनेगोंधळणे
बारा गावचे पाणी पिणेविविध प्रकारचे अनुभव घेणे
बारा वाजलेपूर्ण नाश होणे
बाहू स्फुरण पावणेस्फूर्ती येणे
बुचकळ्यात पडणेगोंधळून जाणे
बेत आखणेयोजना आखणे
बेत करणेयोजना आखणे
बेत हाणून पाडणेबेत सिद्धीला जाऊ न देणे
बोचणी लागणेएखादी गोष्ट मनाला लागून राहते
बोटावर नाचवणेआपल्या इच्छेप्रमाणे दुसऱ्याला वागायला लावणे
बोल लावणेदोष देणे
बोलाफुलाला गाठ पडणेदोन गोष्टींची सहजासहजी एक वेळ जमून येणे
बोळ्याने दूध पिणेबुद्धिहीन असणे
ब्रम्हा करणेबोभाटा करणे सगळीकडे प्रसिद्ध करणे
ब्रह्म करणेभटकंती करणे
भ
भंडावून सोडलेत्रास देणे
भगीरथ प्रयत्न करणेचिकाटीने प्रयत्न करणे
भडभडून येणेहुंदके देणे गलबलले
भर असणेजोर असणे
भरभराट होणेप्रगती होणे समृद्धी होणे
भाऊबंदकी असणेना त्यांना त्यात भांडण असणे
भान ठेवणेजाणीव ठेवणे
भान नसणेजाणीव नसणे
भानावर येणेपरिस्थितीची जाणीव होणे शुद्धीवर येणे
भारून टाकणेपूर्णपणे मोहून टाकणे
म
मती गुंग होणेआश्चर्य वाटणे
मत्सर वाटणेकाळजी घेणे
मधाचे बोट लावणेआशा दाखवणे
मधून विस्तव न जाणेअतिशय वैर असणे
मन मोकळे करणेसुखदुःखाच्या गोष्टी बोलून दाखविणे
मन सांशक होणेमनात संशय वाटू लागणे
मनात घर करणे मनात कायमचे राहणे
मनात मांडे खाणेव्यर्थ मनोराज्य करणे
मनाने घेणेमनात पक्का विचार येणे
मनावर ठसणमनावर जोरदारपणे बिंबणे
मनावर बिंबवणेमनावर ठसवणे
मनोरथ पूर्ण होणेइच्छा पूर्ण होणे
मराठी भरारी मारणेझेप घेणे
मशागत करणेमेहनत करून निगा राखणे
मागमूस नसणेथांगपत्ता नसणे
मात करणेविजय मिळवणे
मात्रा चालणेयोग्य परिणाम होणे
मान्यता पावणेसिद्ध होणे
माशा मारणेकोणताही उद्योग न करणे
माशी शिंकणेअडथळा येणे
मिनतवारी करणेदादा पुता करणे
मिशांना तूप लावणेउगीच ऐट दाखवणे
मिशीवर ताव मारणेबढाई मारणे
मूग गिळणेउत्तर न देता गप्प राहणे
मोहाला बळी पडणेएखाद्या गोष्टीच्या आसक्ती मध्ये वाहून जाणे
य
यक्षप्रश्न असणेमहत्त्वाची गोष्ट असणे
र
रक्ताचे पाणी करणेअतिशय मेहनत करणे
रक्षणाची काळजी घेणेयोगक्षेम चालविणे
रवाना होणेनिघून जाणे
रस असणेअत्यंत आवड असणे
राईचा पर्वत करणेशुल्लक गोष्टीला उगाच मोठे स्वरूप देणे
राकोटीला जाणेकाळ्यापाण्याची शिक्षा मरेपर्यंत कैद होणे
राख होणेपूर्णपणे नष्ट होणे
राब राब राबणेसतत खूप मेहनत करणे
राबता असणेसतत ये-जा असणे
राम नसणेअर्थ नसणे
राम म्हणणेशेवट होणे मृत्यू येणे
रियाज करणेसराव करणे
रुची निर्माण होणेगोडी निर्माण होणे
रोज ठेवणे चिडणेनाराजी असणे
ल
लक्ष वेधून घेणेलक्ष ओढून घेणे
लक्ष्मीचा वरदहस्त असणेलक्ष्मीची कृपा असणे श्रीमंती असणे
ललकारी देणेजयघोष करणे
लळा लागणेओढ वाटणे
लवलेश नसणेजराही पत्ता नसणे जराही न होणे
लष्कराच्या भाकर्‍या भाजणेदुसऱ्यांच्या उठाठेवी करणे
लष्टक लावणेझंझट लावणे निकड लावणे
लहान तोंडी मोठा घास घेणेआपणास न शोभेल अशाप्रकारे वरचढपणा दाखवणे
लांछनास्पद असणेलाजिरवाणी असणे
लौकिक मिळवणेसर्वत्र मान मिळवणे
व
वंचित रहाणेएखादी गोष्ट न मिळणे
वकील पत्र घेणेएखाद्याची बाजू घेणे
वजन पडणेप्रभाव पडणे
वठणीवर आणणेताळ्यावर आणणेे
वड्याचे तेल वांग्यावर काढणेएकाचा राग दुस-यावर काढणे
वणवण भटकणेएखादी गोष्ट मिळविण्यासाठी खूप फिरणे
वनवन करणेखूप भटकणे
वरदान देणेकृपाशीर्वाद देणे
वाचा बंद होणेतोंडातून एक शब्दही बाहेर न पडणे
वाचा बसणेएक शब्द येईल बोलता न येणे
वाट तुडवणेरस्ता कापणे
वाट लावणेविल्हेवाट लावणे मोडून तोडून टाकणे
वाटाण्याच्या अक्षता लावणेस्पष्टपणे नाकारले
वारसा देणेवडिलोपार्जित हक्क सोपवणे
वाऱ्यावर सोडणेअनाथ करणे
विचलित होणेमनाची चलबिचल होणे
विडा उचलणेनिश्चय किंवा प्रतिज्ञा करणे
विदीर्ण होणेभग्न होणे मोडतोड होणे
विरस होणेनिराशा होणे उत्साहभंग होणे
विरोध दर्शवणेप्रतिकार करणे
विसंवाद असणेएकमेकांशी न जमणे
विसावा घेणेविश्रांती घेणे
विहरणेसंचार करणे
वेड घेऊन पेडगावला जाणेमुद्दाम ढोंग करणे
वेसन घालनेमर्यादा घालने
व्रत घेणेवसा घेणे
श
शंभर वर्ष भरणेनाश होण्याची वेळी घेणे
शब्द जमिनीवर पडू न देणेदुसऱ्याच्या इच्छेनुसार लगेच कार्यवाही करणे
शहानिशा करणेएखाद्या गोष्टीबाबत चौकशी करून खात्री करून घेणे
शिगेला पोचणेशेवटच्या टोकाला जाणे
श्रीगणेशा करणेआरंभ करणे
स
संधान बांधनेजवळीक निर्माण करणे
संपवणेसंपन्न होणे
संभ्रमात पडणेगोंधळात पाडणे
संभ्रमित होणेगोंधळणे
सख्या नसणेप्रेमळ नाते नसणे े
सपाटा लावणेएक सारखे वेगात काम करणे
समजूत काढणेसमजावणे हेवा वाटणे
समरस होणेगुंग होणे
सर्वस्व पणाला लावणेसर्व शक्य मार्गांचा अवलंब करणे
सहभागी होणेसामील होणे
सही ठोकणेनिश्चित करणे
सहीसलामत सुटणेदोष न येता सुटका होणे
सांगड सांगड घालनेमेळ साधने
सांजावनेसंध्याकाळ होणे
साक्षर होणेलिहिता-वाचता येणे
साक्षात्कार होणेआत्मिक ज्ञान प्राप्त होणे खरेखुरे स्वरूप कळणे
साखर पेरणेगोड गोड बोलून आपलेसे करणे
साद घालनेमनातल्या मनात दुःख करणे
सामोरे जाणेनिधड्या छातीने संकटास तोंड देणे
सारसरंजाम असणेसर्व साहित्य उपलब्ध असणे हाडीमांसी भिनने अंगात मुरणे
साशंक होणेशंका येणे
सुताने स्वर्गाला जाणथोडा सुगावा लागताच संपूर्ण गोष्टीचे स्वरूप तर्काने जाणण्याचा प्रयत्न करणे े
सुळकांडी मारणेसूर मारणे
सूड घेणेबदला घेणे
सूतोवाच करणेपुढे घडणार्‍या गोष्टींची प्रस्तावना करणे
सोन्याचे दिवस येणेअतिशय चांगले दिवस येणे
स्तंभित होणेआश्चर्याने स्तब्ध होणे
स्वप्न भंगणेमनातील विचार कृतीत न येणे
स्वर्ग दोन बोटे उरणेआनंदाने गर्वाने अतिशय फुगून जाणे
ह
हंबरडा फोडणेमोठ्याने रडणे
हट्टाला पेटणेमुळीच हट्ट न सोडणे
हमरीतुमरीवर येणेजोराने भांडू लागणे
हरभऱ्याच्या झाडावर चढणेखोटी स्तुती करून मोठेपणा देणे
हवालदील होणेहताश होणे
हशा पिकणेहास्य स्फोट होणे
हसता हसतापोट दुखणे खूप हसणे
हसता हसता पुरेवाट होणेअनावर हसू येणे
हस्तगत करणेताब्यात घेणे
हाऊस मागवणेआवड पुरवून घेणे
हात ओला होणेफायदा होणे
हात चोळणेचरफडणे
हात झाडून मोकळे होणेजबाबदारी अंगावर टाकले की व जबाबदारी टाकून टाकून मोकळे होणे
हात टेकणेनाइलाज झाल्याने माघार घेणे
हात देणेमदत करणे
हात धुवून पाठीस लागणेचिकाटीने एखाद्या गोष्टीच्या मागे लागणे
हात न पसरणेन मागणे
हात मारणेताव मारणे भरपूर खाणे
हात हलवत परत येणेकाम न होता परत येणे
हातचा मळ असणेसहजशक्य असणे
हातपाय गळणेधीर सुटणे
हातभार लावणेसहकार्य करणे
हाता पाया पडणेगयावया करणे
हातात कंकण बांधणेप्रतिज्ञा करणे
हाताला हात लावणेथोडीदेखील मेहनत न घेता फुकटचे श्रेय घेणे
हातावर तुरी देणेडोळ्यांदेखत फसवून निसटून जाणे
हातावर शीर घेणेजिवावर उदार होऊन किंवा प्राणांचीही पर्वा न करणे
हाय खाणेधास्ती घेणे
हीच काय दाखविणेबळ दाखवून किंमत लक्षात आणून देणे
हुडहुडी भरणेथंडी भरणे
हूल देणेचकवणे

MPSC परीक्षेसाठी वाक्प्रचारांचा अभ्यास कसा करावा?

वाक्प्रचार केवळ पाठ करण्याऐवजी त्यांचा अर्थ आणि वापर समजून घेणे अधिक उपयुक्त ठरते. अभ्यास करताना पुढील गोष्टी लक्षात ठेवा.

  • अर्थ समजून घ्या: वाक्प्रचाराचा शब्दशः अर्थ आणि प्रत्यक्ष वापरातील भावार्थ यांतील फरक समजून घ्या.
  • वाक्यात उपयोग करा: प्रत्येक वाक्प्रचार वापरून स्वतः उदाहरण-वाक्य तयार करा.
  • नियमित उजळणी करा: दररोज काही वाक्प्रचारांचा अभ्यास करा आणि आधी शिकलेल्या वाक्प्रचारांची पुनरावृत्ती करा.
  • स्वतःची चाचणी घ्या: वाक्प्रचार वाचून त्याचा अर्थ आठवा आणि अर्थावरून योग्य वाक्प्रचार ओळखण्याचा सराव करा.
  • संदर्भग्रंथांचा वापर करा: एखाद्या वाक्प्रचाराच्या अर्थाबद्दल शंका असल्यास विश्वसनीय मराठी व्याकरण पुस्तक किंवा शब्दकोशाचा संदर्भ घ्या.

मराठी व्याकरणाच्या अभ्यासासाठी उपयुक्त संदर्भ

वाक्प्रचारांसोबत म्हणी, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, शब्दसमूहाबद्दल एक शब्द आणि शब्दांच्या योग्य वापराचाही अभ्यास करा. या घटकांचा अभ्यास करताना संबंधित परीक्षेचा अधिकृत अभ्यासक्रम आणि उपलब्ध मागील प्रश्नपत्रिका यांना प्राधान्य द्या.

टीप: ही यादी विविध मराठी व्याकरणविषयक पुस्तकांमधील संदर्भांच्या आधारे संकलित केली आहे. वेगवेगळ्या संदर्भग्रंथांमध्ये काही वाक्प्रचारांचे शब्दरूप किंवा अर्थ मांडण्याची पद्धत वेगळी असू शकते. त्यामुळे अभ्यास करताना आवश्यकतेनुसार मूळ संदर्भग्रंथांचा आधार घ्या.

menu_book स्पर्धा परीक्षा द्रुत संदर्भ व अभ्यास साहित्य

या विषयाशी संबंधित अधिकृत अभ्यासक्रम, मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYQs) आणि सराव टेस्ट खालील लिंकवरून त्वरित मिळवा:

feed संबंधित व ताजी अपडेट्स (Related Articles)

सर्व लेख पहा →