महत्त्वाची सूचना

MPSC राज्यसेवा व संयुक्त पूर्व परीक्षा अपडेट्स व सराव प्रश्नसंच प्रसिद्ध!

विझलो आज जरी मी – प्रेरणादायी कविता | कवी सुरेश भट

calendar_today update person लेखक: Vinay Yadav verified MPSC Today अधिकृत लेख
विझलो आज जरी मी – प्रेरणादायी कविता | कवी सुरेश भट
विझलो आज जरी मी – प्रेरणादायी कविता | कवी सुरेश भट
notifications_active

दररोज मोफत अपडेट्स, चालू घडामोडी व PDF नोट्स मिळवा

आमच्या अधिकृत चॅनल्सवर त्वरित सामील व्हा:

कवी : सुरेश भट
कवितेचा विषय : संघर्ष, आत्मविश्वास, जिद्द आणि सकारात्मक दृष्टिकोन
साहित्यप्रकार : प्रेरणादायी कविता

‘विझलो आज जरी मी’ ही सुरेश भट यांच्या नावाने प्रचलित असलेली एक प्रेरणादायी कविता आहे. जीवनातील अपयश, संकटे, संघर्ष आणि प्रतिकूल परिस्थिती यांवर मात करण्यासाठी आवश्यक असलेली जिद्द या कवितेतून व्यक्त होते.

यश मिळविण्याच्या प्रवासात अनेक अडथळे येतात. कधी अपयशाचा सामना करावा लागतो, तर कधी परिस्थिती माणसाच्या क्षमतेची परीक्षा पाहते. मात्र, अशा वेळी खचून न जाता पुन्हा नव्या उमेदीने उभे राहणे आणि ध्येयाच्या दिशेने वाटचाल सुरू ठेवणे, हा या कवितेचा मुख्य संदेश आहे.

विझलो आज जरी मी,
हा माझा अंत नाही…
पेटेन उद्या नव्याने,
हे सामर्थ्य नाशवंत नाही…

छाटले जरी पंख माझे,
पुन्हा उडेन मी.
अडवू शकेल मला,
अजुन अशी भिंत नाही

माझी झोपडी जाळण्याचे,
केलेत कैक कावे..
जळेल झोपडी अशी,
आग ती ज्वलंत नाही..

रोखण्यास वाट माझी,
वादळे होती आतूर..
डोळ्यांत जरी गेली धूळ,
थांबण्यास उसंत नाही..

येतील वादळे, खेटेल तुफान,
तरी वाट चालतो..
अडथळ्यांना भिवून अडखळणे,
पावलांना पसंत नाही…

-सुरेश भट

परिस्थिती कितीही कठीण असली, तरी प्रयत्न करण्याची इच्छा जिवंत असेल तर नव्या सुरुवातीची शक्यता कायम असते.

आजचे अपयश उद्याच्या यशाची पायाभरणी ठरू शकते. त्यामुळे प्रयत्न थांबवू नका!

menu_book स्पर्धा परीक्षा द्रुत संदर्भ व अभ्यास साहित्य

या विषयाशी संबंधित अधिकृत अभ्यासक्रम, मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYQs) आणि सराव टेस्ट खालील लिंकवरून त्वरित मिळवा:

feed संबंधित व ताजी अपडेट्स (Related Articles)

सर्व लेख पहा →