२८ मे दिनविशेष - 28 May in History
२८ मे दिनविशेष - 28 May in History

On this page, we will list all historical events that occurred on 28th May. The students can refer them while preparing for all competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

महत्त्वाच्या घटना:

१४९०: मलिक अहमद या जुन्नर येथील बहामनी सेनापतीने उर्वरित बहामनी सैन्याचा पराभव करून जुन्नर येथे स्वतंत्र सल्तनतीची घोषणा केली.

१५०३: पोप अलेक्झांडर सहाव्याच्या फतव्यानुसार स्कॉटलँडचा राजा जेम्स चौथा व मार्गारेट ट्युडोरचे लग्न झाले.

१५८८: एकशे तीस युद्धनौकांवर ३०,००० सैनिकांसह स्पॅनिश आर्माडा इंग्लंडवर चाल करायला निघाला.

१७७४: अमेरिकन क्रांती – पहिल्या कॉन्टिनेन्टल काँग्रेसला सुरुवात.

१८३०: अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष अँड्र्यू जॅक्सनने इंडियन रिमुव्हल ऍक्टवर सही करून स्थानिक अमेरिकन जमातींना स्थलांतर करण्यास भाग पाडले.

१८९२: जॉन मुइरने सान फ्रांसिस्कोमध्ये सियेरा क्लबची स्थापना केली.

१९०५: रशिया-जपान युद्ध-त्सुशिमाची लढाई – जपानी दर्यासारंग टोगो हेहाचिरोने रशियाचे आरमार बुडवले व लढाई संपवली.

१९०७: पहिली आइल ऑफ मॅन टीटी रेस आयोजित करण्यात आली.

१९१८: अझरबैजानने स्वतःला स्वतंत्र घोषित केले.

१९३६: ऍलन ट्युरिंगने ऑन कम्युटेबल नंबर्स हा शोधनिबंध प्रकाशित केला.

१९३७: फ्रँकलिन डिलानो रूझवेल्टने वॉशिंग्टन डी.सी.मध्ये बटन दाबून सान फ्रांसिस्कोमधील गोल्डन गेट ब्रिज वाहतूकीला खुला केला.

१९३७: नेव्हिल चेंबरलेन युनायटेड किंग्डमच्या पंतप्रधानपदी.

१९४०: दुसरे महायुद्ध – बेल्जियमने जर्मनीसमोर शरणागती पत्करली.

१९५२: ग्रीसमधे स्त्रियांना मतदानाचा अधिकार प्राप्त झाला.

१९५८: ७५ व्या वाढदिवसानिमित्त स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा मुंबई महापालिकेतर्फे सत्कार करण्यात आला.

१९५९: अमेरिकन अंतराळ संस्था नासाने दोन अमेरिकन माकडांना अंतराळ यात्रा घडवून आणली.

१९६४: पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशन (PLO) ची स्थापना झाली.

१९७०: ऑल इंडिया ट्रेड युनियन कॉंग्रेस पक्षाचे औपचारिकपणे विभाजन करण्यात आले.

१९९६: भारताचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा राजीनामा

१९९८: भारताने केलेल्या अणुचाचणीला उत्तर म्हणून पाकिस्तानने पाच अणुबॉम्ब उडवले.

१९९९: इटली मध्ये लिओनार्डो दा विंची यांचे द लास्ट सपर हे चित्र प्रदर्शनासाठी ठेवण्यात आले.

२००४: अयाद अल्लावी इराकच्या पंतप्रधानपदी.

२००८: साली नेपाल मध्ये पुरातन काळापासून चालत आलेली राजशाही परंपरेचा अंत करण्यात आला.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

विनायक दामोदर सावरकर
विनायक दामोदर सावरकर

१५२४: सलीम दुसरा, ऑट्टोमन सम्राट.

१६६०:  इंग्लंडचा राजा जॉर्ज (पहिला) यांचा जन्म. (मृत्यू: ११ जून १७२७)

१७३८: जोसेफ-इग्नास गिलोटिन, फ्रांसचा डॉक्टर.

शंतनुराव किर्लोस्कर
शंतनुराव किर्लोस्कर

१७५९: छोटा विल्यम पिट, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान.

१८८३: क्रांतिकारक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म. (मृत्यू: २६ फेब्रुवारी १९६६)

१९०३: उद्योगपती, किर्लोस्कर उद्योगसमूहाचे आधारस्तंभ शंतनुराव किर्लोस्कर यांचा जन्म. (मृत्यू: २४ एप्रिल १९९४)

१९०७: स्वातंत्र्यसेनानी रायगड मिलिटरी स्कूलचे संस्थापक दिगंबर विनायक तथा नानासाहेब पुरोहित यांचा जन्म. (मृत्यू: २७ नोव्हेंबर १९९४)

१९०८: दुसर्‍या महायुध्दातील गुप्तहेर, लेखक, पत्रकार आणि जेम्स बाँड चा जनक इयान फ्लेमिंग यांचा जन्म. (मृत्यू: १२ ऑगस्ट १९६४)

१९२१: शास्त्रीय गायक पं. दत्तात्रय विष्णू ऊर्फ बापूराव पलुसकर यांचा जन्म. (मृत्यू: २५ ऑक्टोबर १९५५)

एन. टी. रामाराव, लोकप्रिय तेलुगू अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक, आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री.
एन. टी. रामाराव, लोकप्रिय तेलुगू अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक, आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री.

१९२३: तेलगू अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते व आंध्रप्रदेशचे १० वे मुख्यमंत्री एन. टी. रामाराव यांचा जन्म. (मृत्यू: १८ जानेवारी १९९६)

१९२५: ब्युलेंट एसेव्हिट, तुर्कस्तानचा पंतप्रधान.

१९४६: भारतीय कवी आणि समीक्षक के. सच्चिदानंदन यांचा जन्म.

१९४८: प्रख्यात भारतीय मल्याळम आणि इंग्रजी भाषिक कवी आणि समीक्षक तसचं, मल्याळ भाषेतील आधुनिक काव्याचे प्रणेते, द्वैभाषिक साहित्य समीक्षक, नाटककार, संपादक, स्तंभलेखक आणि अनुवादक,  भारतीय साहित्य जर्नलचे माजी संपादक आणि साहित्य अकादमीचे माजी सचिव के. सच्चिदानंदन यांचा जन्मदिन.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

१७८७: ऑस्ट्रियन संगीतकार व व्हायोलिनवादक लिओपोल्ड मोत्झार्ट यांचे निधन. (जन्म: १४ नोव्हेंबर १७१९)

१९६१: प. कृ. गोडे, प्राच्यविद्या संशोधक.

१९७९: पद्मश्री पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय चिकित्सक (डॉक्टर), शिक्षणतज्ज्ञ, बँकर आणि समाजसेवक डॉ.  टोन्से माधव अनंत पाई यांचे निधन.

१९८२: बळवंत दामोदर ऊर्फ कित्तेवाले निजामपूरकर यांचे निधन.

१९९४: हिंदूसभेचे नेते व पुण्याचे महापौर गणपतराव नलावडे यांचे निधन.

१९९९: भारतीय दिग्दर्शक आणि निर्माते बी. विट्टालाचारी यांचे निधन. (जन्म: १८ जानेवारी १९२०)

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Join the Conversation

1 Comment

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *