हे पृष्ठ 30 जून रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.
या पृष्ठावर, आम्ही ३० जून रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.
On this page, we will list all historical events that occurred on 30th June. The students can refer to them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.
जागतिक दिवस:
–
महत्त्वाच्या घटना:
१८५९: चार्ल्स ब्लांडिन यांनी नायगारा धबधबा एकादोरीबारून कसरत करीत पार केला.
१९३७: जगातील पहिला तत्काळ दूरध्वनी क्रमांक ९९९ लंडनमध्ये सुरु करण्यात आला.
१९४४: मुंबईच्या ’सेंट्रल’ सिनेमात ’प्रभात’चा ’रामशास्त्री’ हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटात ललिता पवार या अभिनेत्रीवर खलनायिकेचा कायमचा शिक्का बसला.
१९६०: काँगोला (बेल्जियमपासुन) स्वातंत्र्य मिळाले.
१९६५: भारत व पाकिस्तानमध्ये कच्छचा करार झाला.
१९६६: कोका सुब्बा राव यांनी भारताचे ९ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
१९६६: अमेरिकेची सर्वात मोठी स्त्रीवादी संस्था नॅशनल ऑरगनायझेशन फॉर वुमन ची स्थापना झाली.
१९७१: सोयुझ-११ या रशियन अंतराळयानात बिघाड होऊन तीन अवकाशवीर ठार झाले.
१९७८: अमेरिकेच्या संविधानात २६ वा बदल संमत झाला त्यामुळे मतदानाचे वय १८ वर्षे झाले.
१९८६: केन्द्र सरकार व मिझो नॅशनल फ्रंट यांच्यात करार होऊन मिझोरामला राज्याचा दर्जा देण्याचे ठरले.
१९९७: ब्रिटनने चीनकडुन ९९ वर्षांच्या भाडेपट्ट्याने घेतलेल्या हाँगकाँग बेटांच्या भाडेपट्ट्याची मुदत संपल्याने ब्रिटनने हे बेट समारंभपूर्वक चीनला परत दिले.
२०००: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बील क्लिंटन(Bill Clinton) यांनी अमेरिकेत डीजीटल हस्ताक्षर करण्यास वैध रित्या परवानगी दिली.
२००२: ब्राझीलने फुटबॉल विश्वकप जिंकला.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
१४७०: चार्ल्स (आठवा) – फ्रान्सचा राजा (मृत्यू: ७ एप्रिल १४९८)
१९०३: भारतीय राजकारणी व भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस राजकीय पक्षाचे सदस्य मुकुट बिहारी लाल भार्गव यांचा जन्मदिन.
१९११: साहित्य अकादमी चे फेलोशिप प्राप्त भारतीय साहित्यकार नागार्जुन यांचा जन्मदिन.
१९१९: हॉट एअर बलूनचे निर्माते एड यॉस्ट यांचा जन्म: (मृत्यू: २७ मे २००७)
१९२८: कल्याणजी वीरजी शाह – सुमारे तीन दशके रसिकांवर आपल्या सुरावटीची मोहिनी घालणार्या ’कल्याणजी-आनंदजी’ या संगीतकार द्वयीतील ज्येष्ठ बंधू (मृत्यू: २४ ऑगस्ट २०००)
१९३४: भारतीय रसायनशास्त्रज्ञ चिंतामणी नागेश रामचंद्र राव यांचा जन्म.
१९४३: सईद मिर्झा – दिग्दर्शक आणि पटकथालेखक
१९५४: डॉमिनिकाचे पंतप्रधान पिएर चार्ल्स यांचा जन्म.
१९५९: भारतीय-इंग्लिश उद्योगपती आणि राजकारणी संदीप वर्मा यांचा जन्म.
१९६६: माईक टायसन – अमेरिकन मुष्टीयोद्धा
१९६९: सनत जयसूर्या – श्रीलंकेचा क्रिकेटपटू
१९७३: भारतीय क्रिकेट खेळाडू दोड्डा गणेश यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
१८५७: शाही डोगरा राजवंशाचे संस्थापक आणि जम्मू-काश्मीर राज्याचे पहिले महाराजा तसचं, ब्रिटीश भारतातील दुसर्या क्रमांकाचे सर्वात मोठे रियासतदार महाराजा गुलाबसिंह जामवाल यांचे निधन.
१९१७: पितामह दादाभाई नौरोजी – भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एक संस्थापक आणि राजकीय व सामाजिक नेते, ब्रिटिश संसदेचे सदस्यत्त्व मिळवणारे पहिले भारतीय (जन्म: ४ सप्टेंबर १८२५)
१९१९: नोबल पारितोषिक विजेता ब्रिटीश भौतिकशास्त्रज्ञ जॉन विलियम्स स्ट्रट रेले(John William Strutt) यांचे निधन.
१९९२: डॉ. वसंत कृष्ण वराडपांडे – साहित्यिक, वक्ते व समीक्षक (जन्म: ? ? ????)
१९९४: बाळकृष्ण हरी तथा ’बाळ’ कोल्हटकर – नाटककार, कवी, अभिनेते, निर्माते, लेखक व दिग्दर्शक (जन्म: २५ सप्टेंबर १९२६)
१९९७: राजाभाऊ साठे – शास्त्रोक्त व नाट्यसंगीत गायक, यांनी २५ वर्षे कै. राम मराठे यांच्याबरोबर संगीत सौभद्र नाटकात श्रीकृष्णाची भूमिका केली होती.
१९९९: कृष्णा बळवंत तथा कृ. ब. निकुंब – सहजसुंदर काव्याविष्काराचा प्रत्यय घडवणारे मराठी काव्यसृष्टीतील कवी (जन्म: ? ? ????)
२००७: दिल्लीचे चौथे मुख्यमंत्री साहिबसिंह वर्मा यांचे निधन. ( जन्म: १५ मार्च १९४३)
२००८: भारतीय पंजाब राज्यातील प्रसिद्ध वैद्यकीय व्यावसायिक आणि राजकारणी केवल कृष्ण यांचे निधन.