महत्त्वाची सूचना

MPSC राज्यसेवा व संयुक्त पूर्व परीक्षा अपडेट्स व सराव प्रश्नसंच प्रसिद्ध!

२१ जून दिनविशेष – 21 June in History

calendar_today update person लेखक: Vinay Yadav verified MPSC Today अधिकृत लेख
डॉ. केशव बळीराम हेडगेवार
डॉ. केशव बळीराम हेडगेवार

हे पृष्ठ 21-june रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

या पृष्ठावर, आम्ही २१ जून रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.

On this page, we will list all historical events that have occurred on 21st June. The students can refer them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

  • हा उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस तर दक्षिण गोलार्धातील सर्वात छोटा दिवस असतो.
  • महाकवी कालिदास जयंती [आषाढ शुद्ध प्रतिपदा]

महत्त्वाच्या घटना:

१७८८: न्यू हॅम्पशायर अमेरिकेचे ९ वे राज्य बनले.

१८९८: अमेरिकेने स्पेनकडून ’ग्वाम’ हा प्रांत ताब्यात घेतला.

१९४८: पहिले भारतीय गव्हर्नर जनरल म्हणून चक्रवर्ती राजगोपालाचारी यांच्याकडे सूत्रे

१९४९: राजस्थान उच्‍च न्यायालयाची स्थापना

१९५७: एलेन फेअरक्लो यांनी कॅनडाच्या पहिल्या महिला कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली.
 
१९७५: इंग्लंड देशांत आयोजित क्रिकेट विश्वकप वेस्टइंडीज वेस्टइंडीज क्रिकेट संघाने प्रथम जिंकला.

१९६१: अमेरिकेतील शास्त्रज्ञांनी समुद्राच्या खार्‍या पाण्याचे गोड्या पाण्यात रुपांतर करणारे यंत्र विकसित केले.

१९८९: अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने देशाचा ध्वज जाळण्याची कृती आणि वाचा स्वातंत्र्याची अभिव्यक्ती असल्यामुळे वैध ठरवली.

१९९१: भारताचे ९ वे पंतप्रधान म्हणून पी. व्ही. नरसिंह राव यांनी सूत्रे हाती घेतली.

१९९२: विज्ञान, तंत्रज्ञान आणि समाजविज्ञानाच्या क्षेत्रात विशेष कार्य करणार्‍या डॉ. रघुनाथ माशेलकर यांना मध्यप्रदेश सरकारतर्फे जवाहरलाल ने21हरु राष्ट्रीय पारितोषिक जाहीर

१९९५: पर्यावरणक्षेत्रात विशेष कार्य केल्याबद्दल पर्यावरणतज्ञ रश्मी मयूर यांना अमेरिकेतील ’द युनिटी इन योग इंटरनॅशनल’ या संस्थेने विशेष सन्मान जाहीर केला.

१९९८: फ्रॅंकफर्ट बुद्धीबळ महोत्सवात विश्वनाथन आनंदने ’फ्रिट्झ-५’ या संगणकाचा सहज पराभव केला.

१९९९: विश्वकरंडक स्पर्धेत १००० धावा पूर्ण करणारा मार्क वॉ (ऑस्ट्रेलिया) हा चौथा खेळाडू ठरला.

विश्वनाथन आनंद
विश्वनाथन आनंद
मार्क वॉ
मार्क वॉ

२००६: नवीनच शोध लागलेल्या प्लूटोच्या उपग्रहांचे ’निक्स’ व ’हायड्रा’ असे नामकरण करण्यात आले.

२००९: भारताची बॅडमिंटन स्टार सायना नेहवाल सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरली.

२०१४: संयुक्त राष्ट्राच्या १९३ सदस्य देशांनी मिळून २१ जून या दिवशी ‘जागतिक योग दिवस’  साजरा करण्याच्या प्रस्तावास ११ डिसेंबर २०१४ साली मंजुरी मिळाली.

२०१५: जागतिक योग दिनाची पराक्रमी सुरवात.

 

पी. व्ही. नरसिंह राव
पी. व्ही. नरसिंह राव
चक्रवर्ती राजगोपालाचारी
चक्रवर्ती राजगोपालाचारी

 

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१७८१: फ्रेंच गणितज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ सिमिओन-डेनिसपॉइसॉन यांचा जन्म.
बेनझीर भूट्टो
बेनझीर भूट्टो

१९०५: जेआँ-पॉल सार्त्र – फ्रेन्च लेखक, कवी, तत्त्वज्ञ आणि नोबेल पारितोषिक विजेते (मृत्यू: १५ एप्रिल १९८०)

१९१२: भारतीय लेखक व नाटककार विष्णू प्रभाकर यांचा जन्म.(मृत्यू: ११ एप्रिल २००९)

१९१६: सुरेन्द्रनाथ कोहली – भारताचे ९ वे नौदल प्रमुख (मृत्यू: २१ जानेवारी १९९८)

१९२३: सदानंद रेगे – मराठी कवी, कथाकार आणि अनुवादक (मृत्यू: २१ सप्टेंबर १९८२)

१९२७: रेमन मैग्सेसे पुरस्कार सन्मानित ज्येष्ठ भारतीय पत्रकार व ‘हिंदुस्तान टाईम्स’ आणि ‘इंडियन एक्सप्रेस’ या वृत्तपत्राचे संपादक बी. जी. वर्गीज यांचा जन्मदिन.

१९४१: भारतीय बिशप अलॉयसियस पॉल डिसोझा यांचा जन्म.

१९५२: जेरमी कोनी – न्यूझीलंडचा क्रिकेटपटू

सदानंद रेगे
सदानंद रेगे

१९५३: बेनझीर भूट्टो – पाकिस्तानच्या पंतप्रधान (मृत्यू: २७ डिसेंबर २००७)

१९५८: भारतीय अभिनेत्री रीमा लागू यांचा जन्म. (मृत्यू: १८ मे २०१७)
 
१९६७: ईबे (eBay) चे स्थापक पियरे ओमिदार यांचा जन्म.
 
१९६७: थायलंड देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान यिंगलक शिनावात्रा(Yingluck Shinawatra) यांचा जन्मदिन.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
 
१५२७: इटालियन नवनिर्मित काळातील मुत्सद्दी, तत्त्वज्ञ आणि लेखक व इटली येथील आधुनिक राजकीय तत्वज्ञानाचे जनक निकोलो मैकियावेली (Niccolò Machiavelli) यांचे निधन.
 
१८७४: स्वीडीश भौतिकशास्त्रज्ञ अँडर्सयोनास अँग्स्ट्रॉम यांचे निधन.
 
१८९३: अमेरिकन उद्योगपती तसेच स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीचे संस्थापक लिलँड स्टॅनफोर्ड यांचे निधन.
 
अरुण सरनाईक
अरुण सरनाईक

१९२८: द्वारकानाथ माधव पितळे उर्फ ’नाथमाधव’ – सामाजिक व ऐतिहासिक कादंबरीकार. त्यांच्या ’वीरधवल’, ’रायक्लब’ अथवा सोनेरी टोळी’ या कादंबर्‍यांनी वाचकांना अक्षरश: वेड लावले होते. (जन्म: ३ एप्रिल १८८२)

१९३२: आधुनिक काळातील सर्वश्रेष्ठ ब्रजभाषा कवि जगन्नाथदास रत्नाकर यांचे निधन.

१९४०: डॉ. केशव बळीराम हेडगेवार – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक व पहिले अध्यक्ष (जन्म: १ एप्रिल १८८९)

१९५७: नोबल पारितोषिक विजेता जर्मन भौतिकशास्त्रज्ञ जोहन्नेस स्टार्क (Johannes Stark) यांचे निधन.

१९७०: सुकार्नो – इंडोनेशियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष (जन्म: ६ जून १९०१)

१९८४: मराठी चित्रपट व नाट्य अभिनेते अरुण सरनाईक यांचे पत्‍नी व मुलासह कोल्हापुरजवळ मोटार अपघातात निधन. ते तबलावादक, गायक आणि हार्मोनियमवादकही होते. (जन्म: ४ आक्टोबर १९३५)

२००३: लिऑन युरिस – अमेरिकन कादंबरीकार (जन्म: ३ ऑगस्ट १९२४)

द्वारकानाथ माधव पितळे उर्फ ’नाथमाधव
द्वारकानाथ माधव पितळे उर्फ ’नाथमाधव

२०१२: भालचंद्र दत्तात्रय खेर – लेखक व पत्रकार (जन्म: १२ जून १९१७)

२०१२: भारतीय छायाचित्रकार आणि पत्रकार सुनील जना यांचे निधन. (जन्म: १७ एप्रिल १९१८)

 

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

menu_book स्पर्धा परीक्षा द्रुत संदर्भ व अभ्यास साहित्य

या विषयाशी संबंधित अधिकृत अभ्यासक्रम, मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYQs) आणि सराव टेस्ट खालील लिंकवरून त्वरित मिळवा:

feed संबंधित व ताजी अपडेट्स (Related Articles)

सर्व लेख पहा →