ऊर्जा
ऊर्जा

ऊर्जा ही अदिश राशी आहे

व्याख्या पदार्थाची कार्य करण्याची क्षमता म्हणजे ऊर्जा होय SI पद्धतीत उर्जेचे एकक जीवन ज्यूल आहे, तर CGS पद्धतीत अर्ग आह विविध क्षेत्रातील ऊर्जेच्या वापरानुसार  एकके बदलत जातात जसे की Kilowatt – Hour, Kilocalories इत्यादी

ऊर्जेचे विविध प्रकार पुढील प्रमाणे आहे

  • यांत्रिक ऊर्जा
  • रासायनिक ऊर्जा
  • Prakash ऊर्जा
  • उष्णता ऊर्जा
  • ध्वनि ऊर्जा
  • भू-औष्णिक ऊर्जा
  • जलविद्युत ऊर्जा इत्यादी

भौतिक शास्त्राच्या दृष्टीने ऊर्जेचे अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. ऊर्जेचे विविध प्रकार असले तरी भौतिक दृष्टीने यांत्रिक ऊर्जेत प्रमुख दोन प्रकार पडतात.

  1. गतिज ऊर्जा

व्याख्या पदार्थाच्या गतिमान अवस्थेमुळे प्राप्त होणाऱ्या ऊर्जेला गतिज ऊर्जा म्हणतात.

सूत्र   K.E. = ½ mv2

, वरील सूत्रात m = वस्तुमान (Mass)

v = वेग (Velocity)

उदाहरण व स्पष्टीकरण

1 समजा आपण वाहन चालवताना ब्रेक दाबला तर ज्या ठिकाणी ब्रेक दाबतो तिथेच वाहन थांबत नाही तर थोडे अंतर पुढे जाऊन थांबते कारण त्या वाहनाला गती असते आपण ब्रेक दाबतो म्हणजे गतीला विरोध करतो मात्र वाहनाला प्राप्त गतिज ऊर्जा संपल्या थोडे अंतर पुढे जावे लागते जडत्व

2 लोकल ट्रेनने प्रवास करताना गतिज ऊर्जेचा गमतीशीर अनुभव येतो लोकल ट्रेन काही सेकंदांसाठी रेल्वेस्थानकावर थांबते एवढ्या कमी वेळात उतरणे व चढणे अवघड असते म्हणून उत्तर त्यांना ट्रेनच्या दिशेने धावत उतरावे लागते व चढतानाही ट्रेनच्या दिशेने धावत चढावे लागते स्थिर स्थितीत गतिमान लोकल मध्ये चढताना अथवा उतरतांना अपघाताची दाट शक्यता असते

2) स्थितीज ऊर्जा

व्याख्या एखाद्या संस्थेतील निरनिराळ्या घटकांच्या परस्पर सापेक्ष स्थितीमुळे वत या घटकांच्या अन्योन्य क्रियांमुळे त्या संस्थेत निर्माण झालेली ऊर्जा म्हणजे स्थितिज ऊर्जा होय

सूत्र P. E. =mgh

m = वस्तुमान (mass)

g = गुरुत्व बल ( gravitational force)

h =  उंची (Height)

उदाहरण व स्पष्टीकरण

1)गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी पाण्याची टाकी असते त्यात पाणी साठवले जाते या साठलेल्या पाण्यात स्थितिज ऊर्जा असते गावच्या पाईपलाईनचे व्हाॅल्व्ह उघडल्यानंतर साठलेले पाणी वेगाने गावातील घराघरात पोहोचते.

साठलेल्या पाण्यातील स्थितिज ऊर्जा = पाण्याचे वस्तुमान (m) * गुरुत्व बल (g) * टाकीची उंची (h) = mgh.

2) चावीचे घड्याळ जुन्या काळातील चावीच्या घड्याळाला चावी दिल्यानंतर घड्याळातील काट्यांचा स्प्रिंग गुंडाळला जातो यामुळे त्या स्प्रिंगमध्ये स्थितिज ऊर्जा साठवली जाते नंतर याच ऊर्जेचे रूपांतर घडाळ्याच्या काट्यांना गती देतांना गतिज ऊर्जेत होते

3 बॉम्ब मधील स्फोटक

ऊर्जा अक्षयतेचा नियम (Law of Conservation of Energy) :

‘’ ऊर्जा नष्टही करता येत नाही किंवा निर्माणही करता येत नाही, तर ऊर्जेचे एका रूपातून दुसऱ्या रूपात रूपांतर करता येते. पृथ्वीवरील ऊर्जा नित्य स्थिर आहे. ‘’

सूर्य हा पृथ्वी वरील ऊर्जेचा सर्वात मोठा नैसर्गिक स्त्रोत आहे

ऊर्जास्त्रोतांच्या उपलब्धतेनुसार

1 नैसर्गिक ऊर्जा स्त्रोत

दोन कृत्रिम ऊर्जास्त्रोत असे दोन प्रकार पडतात तसेच ऊर्जास्त्रोतांचा निर्माणा नुसार दोन गट पडतात

1 पुनर्निर्मितीक्षम ऊर्जास्त्रोत

ज्या ऊर्जा स्रोतांपासून पुन्हा पुन्हा ऊर्जा मिळवता येते अशा उर्जा स्त्रोतांना  पुनर्निर्मितीक्षम ऊर्जास्रोत असे म्हणतात.

उदाहरण 1 सौर ऊर्जा

2 पवन ऊर्जा

3 लाटांपासून ऊर्जा

4 भू-औष्णिक ऊर्जा

5 जैविक ऊर्जा

या उर्जास्त्रोतांना अपारंपारिक ऊर्जास्त्रोत असे म्हणतात

या प्रकारांमध्ये सौर ऊर्जा पवन ऊर्जा भोजने kurja इत्यादींचा समावेश होतो

पुनर्निर्मितीक्षम ऊर्जा स्त्रोतांचे फायदे

1 या प्रकारच्या ऊर्जा स्त्रोतांपासून ऊर्जा अखंड मिळत राहणार आहे

2 या प्रकारची ऊर्जा प्राप्त करण्यासाठी कोणताही मोबदला अथवा गुंतवणूक करावी लागत नाही 3 प्रकारच्या ऊर्जेचा वापर केल्यामुळे प्रदूषण होत नाही

1 सौर ऊर्जा

सूर्य हा पृथ्वीचा जीवनदाता आहे असे म्हटले जाते पृथ्वीवरील जीवसृष्टी सूर्याच्या ऊर्जेमुळे निरामय आहे प्रकाश संश्‍लेषण क्रिया द्वार वनस्पती आपले अन्न तयार करतात  यासाठी सूर्यकिरण अत्यावश्यक असतात अन्नसाखळीचा प्रारंभ सूर्यापासून होतो अनंत ऊर्जेचा साठा असणारा हा तारा पृथ्वीपासून 1.496*10 8 Km

इतक्या अंतरावर आहे सूर्यकिरण पृथ्वीच्या पृष्ठभागावर पोहोचण्यासाठी 8 मिनिटे व 19 सेकंद इतका कालावधी लागतो. 4.6 अब्ज वर्षे वय असणाऱ्या सूर्याच्या पृष्ठभागावर खालील तक्त्यानुसार घटकांचे वास्तव्य असते

हायड्रोजन 73. 46%

हीलियम 24.85%

ऑक्सिजन 0.77%

कार्बन 0.29%

लोह 0.16%

neon 0.12%

नायट्रोजन 0.09%

सिलिकॉन 0.07%

मॅग्नेशिअम 0.05%

सल्फर  0.04%

साधारणतः पृथ्वीचे वातावरण सुर्यापासून 174 status इतक्याच प्रमाणात प्रारणे स्वीकारते त्यापैकी तीस टक्के प्रारणे परावर्तित होतात उर्वरित प्रारणे ढोक समुद्र व जमिनीकडून शोषले जातात समुद्र आणि जमीन यांनी सूर्यापासून घेतलेल्या उष्णतेमुळे पृथ्वीच्या पृष्ठभागाची सरासरी तापमान 14 डीग्री सेल्सियस इतके राहते

पृथ्वीचे वातावरण समुद्र व जमीन या तिन्ही घटकां द्वारा 38,50,000 Exajoules per year इतक्या प्रचंड प्रमाणात ऊर्जा ग्रहण केली जाते सोबतच्या आकृतीमध्ये पृथ्वीवरील सौर ऊर्जेचे वर्गीकरण दिलेली आहे

सौर ऊर्जेचे पारंपारिक उपयोग

1 अनादी काळापासून सूर्याच्या उष्णतेपासून कपडे वाळविले जातात

2 समुद्रकाठी मिठागरांमध्ये समुद्राचे पाणी साठवण सूर्याच्या उष्णतेने द्वारे बाष्पीभवन होऊन मीठ तयार केले जाते

3 अन्नधान्य कडधान्य तेलबिया इत्यादी पदार्थ वाढविण्यासाठी सूर्याच्या उष्णतेचा उपयोग होतो

4 फळे सुका मेवा मासे इत्यादी वाळवून साठवणूक करण्यासाठी सौर ऊर्जेचा उपयोग करतात

सौर ऊर्जा उपयोगाचे फायदे

1 सौर ऊर्जा वापरामुळे कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होत नाही त्यामुळे पर्यावरणाचा र्हास होत नाही

2 भारतासारख्या उष्ण प्रदेशामध्ये सौर ऊर्जेची उपलब्धता मोठ्या प्रमाणात आहे

3 कोणत्याही मोबदल्याशिवाय सौर ऊर्जा उपलब्ध होते

सौर ऊर्जा वापराच्या मर्यादा

1 पृथ्वीच्या परिवलन व परिभ्रमण यामुळे पृथ्वीवर ऋतुचक्र दिवस-रात्र असमान दिवस-रात्र असे परिणाम दिसून येतात त्यामुळे दिवसा सौर ऊर्जा उपलब्ध असतील परंतु रात्री ती उपलब्ध नसते

2 उन्हाळ्यात सौर ऊर्जा मोठ्या प्रमाणात उपलब्ध होते परंतु हिवाळा व पावसाळ्यात तिच्या प्रमाणात लक्षणीय घट होत असते

3 पावसाळ्यात ढगाळ वातावरणामुळे सौर ऊर्जा कमी प्रमाणात मिळते

4 पृथ्वीच्या पृष्ठभागावर सर्वत्र सूर्यकिरणांची तीव्रता एकसारखी नसल्यामुळे उष्णतेचे असमान वितरण होते

सुर्यापासून दर सेकंदाला 1.8 * 10 17 ज्यूल इतकी उर्जा प्राप्त होते परंतु तितक्या प्रमाणात साठवण होण्यासाठी संकलकाचा अभाव आहे

सौर उपकरणे

मित्रानो आपण वर बघितल्याप्रमाणे सौर ऊर्जा वापरात बऱ्याच अडचणी आहेत त्यामुळे आकाशात सूर्य असताना मिळणारी ऊर्जा साठवून ठेवणे गरजेचे असते साठवून ठेवलेली ऊर्जा सूर्य नसतानाही वापरता येते साठवणुकीच्या सामग्रीवर होणाऱ्या खर्चामुळे सौर ऊर्जेचे मूल्य वाढते संकलन आणि साठवण्याची पुरेशी व्यवस्था करून सौर ऊर्जा वापर शक्य आहे

1) सौर जलतापक

पृथ्वीवर घरगुती तसेच औद्योगिक क्षेत्रांमध्ये उष्ण व पाण्याची विविध कामांसाठी गरज पडते इलेक्ट्रिक वॉटर हिटर शेगडी यादी द्वारा पाणी तापविण्याच्या सौर चालता पकाने तापविणे परवडणारे व अतिशय सहज सोपे असते

सोबतच्या आकृतीप्रमाणे सौर जलतापक याचे दोन मुख्य प्रकार आहेत

1 सपाट पृष्ठाचा संकलक

2 उष्णता विरोधात साठवण टाकी

टाकी संकलकापेक्षा नेहमी वरच्या पातळीवर ठेवलेली असते कारण सूर्याच्या उष्णतेमुळे संकलकामधील पाणी

सौर ऊर्जेने तापते त्यामुळे ते प्रसरण पावते म्हणून त्याची घनता कमी होते संकलन कमी घनतेचे पाणी टाकी तिल पाण्याच्या पृष्ठभागाकडे जाते

त्याची जागा टाकीच्या तळाकडील थंड पाण्यातून घेतली जाते आणि टाकीचा वरील भागातील पाणी वापरासाठी उपलब्ध होते गरम पाणी काढून घेतले की थंड पाणी टाकीच्या तळाशी प्रवेश करते

2) सौरकुकर

सौर ऊर्जा क्षेत्रातील प्रगतीमुळे आज विविध प्रकारचे विविध आकारांचे सौरकुकर उपलब्ध आहेत या उपकरणांमध्ये सौर ऊर्जेच्या सहाय्याने अन्न शिजवले जाते सौर कुकर ची रचना सोबतच्या आकृतीमध्ये असते या धातूचे दुहेरी आवरण असलेली आयाताकार पेटी असते धातूच्या 2 आवरणांमध्ये उष्णतेचे दुर्वाहक असणाऱ्या एखाद्या पदार्थ भरलेला असतो पेटी च्या आतील बाजूला पूर्ण काळा रंग दिलेला असतो त्यावर एका पेटीला तंतोतंत झाकेल असे त्याचे झाकण असते

पेटीच्या वरच्या दिशेने सपाट आरसा बसविलेला असतो या आरशाच्या सहाय्याने पेटी च्या आतल्या भागात सूर्यप्रकाशाचे परावर्तन केले जाते या आरशाच्या सहाय्याने पेटी च्या आतल्या भागात सूर्यप्रकाशाचे परावर्तन केले जाते सौर कुकर मध्ये वापरावयाची भांडी उथळ असतात या भांडण बाहेरच्या बाजूने सुद्धा काळा रंग दिलेला असतो या काळ या भागावर पडणाऱ्या प्रारणांपैकी 98% भागाचे शोषण केले जाते

3) सौर शुष्कक

शेतीतील उत्पादन वाढविण्यासाठी सौर ऊर्जेचा वापर परंपरेने केला जातो यामुळे अन्नपदार्थांतील आर्द्रता निघून जाते व पदार्थ सुरक्षित राहतात उघड्यावर पसरून अन्नपदार्थ वाळविण्याची ही प्रक्रिया सदोष मंद आहे

या प्रक्रियेत पदार्थात धूळ कीटक मिसळण्याची शक्यता दाट असत यापेक्षा सोयीस्कर  परवडणारे वेगवान साधन म्हणजे सौर शुष्कक होय. सौर शुष्ककाचा उपयोग करून सुकामेवा तयार केला जातो

4) प्रकाश विद्युत् घट सौरघट

सौर ऊर्जेचे विद्युत ऊर्जेत रूपांतर करणाऱ्या घटांना प्रकाश विद्युत् घट किंवा सौरघट असे म्हणतात सौर घट विरळ प्रारणामध्ये सुद्धा समाधान कारक कार्यरत असतात तसेच हे घट महाग असतात अति दुर्गम भागांमध्ये वीजपुरवठा करणे अवघड असते अशा ठिकाणी सौर घटांच्या सहाय्याने विज पुरवठा होतो दुर्गम भागांमध्ये पंप चालविणे टीव्ही बल्ब रस्ते प्रकाशित करणे यासाठी सौर घटांचा उपयोग होतो

सौरघट बनविण्यासाठी अर्ध वाहकांचा उपयोग केला जातो जसे की सिलिकॉन गॅलियम जर्मेनियम इत्यादी या पदार्थांपासून बनविलेल्या सौर घटांची क्षमता दहा ते पंधरा टक्के असते आधुनिक काळातील सौरघट  सेलेनिअमपासून बनविले जातात.

त्यांची क्षमता 25 टक्के असते सौरघट वापरायचे फायदे म्हणजे सौरघट स्थिर असतो खर्च कमी असतो दुर्गम भागांमध्ये वापरता येतात

सामान्य सौर घटामध्ये 2 * 2 semi आकाराचा शुद्ध सिलिकॉनचा एक तुकडा असतो.

त्याद्वारे 0.7w इतकी वीज तयार होते.

सिलिकॉन मोठ्या प्रमाणात सापडत असल्यामुळे सौरघटात त्याचा उपयोग करतात. तसेच सिलिकॉन चा उपयोग पर्यावरणासाठी घातक नसतो

सौर घटाचे उपयोग

कृत्रिम उपग्रहांना अवकाशात भ्रमणासाठी ऊर्जेचा पुरवठा करण्यासाठी तसेच स्पेस स्टेशनला उर्जा पुरविण्यासाठी

रस्त्यांवरचे दिवे प्रकाशित करण्यासाठी traffic signal पाण्याचे पंप इत्यादींसाठी

समुद्रातील दीपस्तंभ व परिसराला वीज पुरवण्यासाठी जहाजांना वीज पुरवण्यासाठी

इलेक्ट्रॉनिक घड्याळे गणकयंत्र इत्यादीमध्ये सौर घट याचा वापर होतो

दुर्गम भागात टीव्ही रेडिओ लाईट पंप इत्यादी वापरासाठी

भारतातील सौर ऊर्जा

1) भारतात सौर उर्जेचा पुरेपूर वापर केल्यास वार्षिक 5000 ट्रिलियन kwh (युनिट) वीजनिर्मिती होऊ शकते. 31 मार्च 2017 अखेर देशात सौर ऊर्जेपासून 12,504 मेगावॅट वीजनिर्मिती क्षमता प्राप्त करण्यात आलेली आहे.

2) 2016 – 17 या वर्षात तामिळनाडू राज्य सौर ऊर्जा निर्मितीत आघाडीवर आहे. त्याखालोखाल राजस्थान, गुजरात, तेलंगाना, आंध्र प्रदेशाचा क्रमांक लागतो. 2016 – 17 मध्ये महाराष्ट्र 430.46mw क्षमतेसह आठव्या स्थानावर आहे.

3) सौर ऊर्जा विकासासाठी 19 नोव्हेंबर 2009 रोजी जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय सौर अभियान जाहीर करण्यात येऊन 11जानेवारी 2010 पासून सुरू करण्यात आले 2022 पर्यंत 20 हजार मेगावॉट सौर वीज निर्मितीचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे 2013 पर्यंत पहिल्या टप्प्यात 200 मेगावॉट सौर वीज निर्मिती केली गेली 2017 पर्यंत च्या दुसऱ्या टप्प्यात तीन हजार मेगावॉट तर 2022 पर्यंत च्या तिसऱ्या टप्प्यात 20 हजार मेगावॉट वीज निर्मिती केली जाईल

4) 1000 मेगावॉट क्षमतेचे 25 सौर पार्क उभारण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आह पैकी 14 राज्यांमधील  एकूण 17 सौर पार्कना मान्यता देण्यात आली आहे. NTPC

ने 2170 मेगावॉट क्षमतेचा सौर प्रकल्प उभारण्याचा करार केला आहे

5 इंटरनॅशनल सोलर अलायन्स ने भारताला सौर ऊर्जेचे jagadguru अशी पदवी दिली आहे

6 मार्च 2014 पर्यंत 11600 सौर पंप होते आता 1.1 लाख सौर पंप आहेत

2) पवन ऊर्जा

पवन ऊर्जानिर्मिती मागे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे पृथ्वीवरील वातावरण होय. पृथ्वीवर विषुववृत्ताच्या जवळपास चा भाग तापलेला असतो, तर ध्रुवीय भाग थंड असतो यामुळे हवेच्या दाबामध्ये फरक पडतो आणि हवा जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वाहते

पूर्वीपासून या पवन उर्जेचा उपयोग जहाजांना दिशा देण्यासाठी धान्य दळण्यासाठी विहिरीतून पाणी काढण्यासाठी केल्या जात जायचा आता पवन ऊर्जेचे उपयोग वीजनिर्मितीसाठी केला जात आहे लहान मुलांचे आवडते खेळणे म्हणजे फिरकी ही firki पवनचक्की निर्मितीचे निमित्त ठरले एका अंदाजानुसार जगामध्ये पवन ऊर्जेपासून दर वर्षी 1750 ते 2200 हजार अब्ज व्हॉट इतक्या प्रचंड प्रमाणात वीज निर्मिती होऊ शकते हे प्रमाण पृथ्वीवरील आजच्या एकून ऊर्जावापराच्या 2.7 पट आहे

ज्या क्षेत्रामध्ये पवनचक्क्या मोठ्या प्रमाणात असतात त्या क्षेत्राला पवनचक्क्यांची शेती किंवा पवन ऊर्जेची शेती असे म्हटले जाते भारतातील सर्वात मोठे पवन ऊर्जा क्षेत्र तामिळनाडू कण्याकुमारी जवळ आहे मार्च 2017 अखेर भारतातील पवन ऊर्जेचे उत्पादन क्षमता 32.3 GW (32287 मेगावॉट झालेली आहे

पवन ऊर्जा वापरातील मर्यादा

पवन ऊर्जा निर्मितीसाठी ज्या ठिकाणी सातत्याने वारा वहात असेल अशाच ठिकाणी प्रकल्प उभारला उभारता येतो

पवनचक्कीच्या प्रभावी वीज निर्मितीसाठी वाऱ्याची चाल 15 किलोमीटर परावाळ किमान असली पाहिजे परंतु इतकी चाल सातत्याने नसते

एक मेगावॅट इतक्या प्रमाणात वीज निर्मिती करावयाची असेल तर िमान दोन हेक्‍टर एवढे क्षेत्रावर पवन उर्जा शेती असावी

पवन ऊर्जा प्रकल्प उभारणी आर्थिक दृष्ट्या महाग आहे

वादळी पाऊस भूकंप ऊन पाऊस यामुळे पवनचक्कीचे पाती तुटल्यास पुनर्उभारणी खूप महाग असते

पवन ऊर्जा प्रकल्पामुळे पावसावर परिणाम होतो

भारतातील पवन ऊर्जा

  1. 31 डिसेंबर 2014 अखेर भारतातील पवन ऊर्जेचे उत्पादन क्षमता 22462 मेगावॉट झालेली आहे पवन ऊर्जा बाबतची अमेरिका जर्मनी स्पेन नंतर भारताचा जगात पाचवा क्रमांक लागतो परंतु 2017 अखेर ही क्षमता 32 हजार मेगावॅट पेक्षा जास्त आहे

2 पवन ऊर्जेच्या संशोधन व तंत्रज्ञान यासाठी चेन्नई येथे C-WET (Centre for Wind Energy Technology) उभारण्यात आलेले आहे

3 सध्या तामिळनाडू सर्वाधिक पवन ऊर्जानिर्मिती केंद्रे आहेत तामिनाडू पवन ऊर्जा निर्मितीत आघाडीवर असून तेथून 51% पवन ऊर्जानिर्मिती होते अधिक क्षमतेचे पवन ऊर्जा केंद् महाराष्ट्रातील वनकुसवडे  जिल्हा सातारा येथे असून त्याची स्थापित क्षमता 259 मेगावॉट आहे धुळे जिल्ह्यातील ब्राह्मणवेल येथे 545 मेगावॉट क्षमतेचे सर्वात मोठा पवन ऊर्जा केंद्र उभारले जात आहे

4 भारतात पाहणीनुसार 1 0 2 788 मेगावॉट इतकी वीजनिर्मिती पवनऊर्जेतून निर्माण होऊ शकते

3 सागरी ऊर्जा लाटांपासून ऊर्जा

चंद्राच्या आकर्षणामुळे समुद्राच्या पृष्ठभागाची उंची कमी-जास्त होते त्यामुळे लाटांची निर्मिती होते या लाटांपासून ऊर्जा निर्मिती करता येते चंद्र जेव्हा पृथ्वीच्या जवळ येतो तेव्हा गुरुत्व बलामुळे उंच लाटांची निर्मिती होते तसेच गुरुत्व बल कमी झाल्यावर कमी उंचीच्या लाटा निर्माण होतात लाटांच्या या उसळल्यामुळे समुद्रकिनाऱ्यावर

मोठ्या प्रमाणात ऊर्जा निर्माण होते ठिकाणी समुद्र रुंद असतो त्याठिकाणी धरणाची उभारणी करून विज निर्मिती करता येते

त्यांची उंचीही नेहमी टर्बाइन्स फिरणे इतपत असेलच असे नाही त्यामुळे काही मर्यादित ठिकाणीच अशा धरणांची उभारणी करता येते यामुळे लाटांपासून वीजनिर्मिती हा खूप मोठा पर्याय ठरत नाही

भारतातील सागरी ऊर्जा

एक समुद्राच्या उष्णतेपासून लाटांपासून भरती-ओहोटीच्या प्रवाहापासून टर्बाइन फिरवली जातात आणि विज निर्मिती केली जाते

2 तामिळनाडू किनारपट्टीवर 100 मेगावॉट क्षमतेचा OTEC (Ocean Thermal Energy Conversion) तत्त्वावरील प्रकल्प उभारला जात आहे.

3 विझिंजम येथे तिरुअनंतपुरम जवळ 150 मेगावॉट क्षमतेचा प्रकल्प तसेच दुर्गा दुआणी खाडी पश्चिम बंगाल येथे 3. 75 मेगावॉट उभारला जात आहे

2) अपुनर्निर्मितीक्षम ऊर्जास्त्रोत

ज्या ऊर्जा स्त्रोतांपासून पुन्हापुन्हा ऊर्जा मिळवता येत नाही ऊर्जेचा एकदा वापर झाला की उर्जा संपते. अशा  उर्जा स्त्रोतांना अपुनर्निर्मितीक्षम ऊर्जास्रोत असे म्हणतात.

उदा 1  कोळसा 2 नैसर्गिक वायु 3 पेट्रोलियम पदार्थ

1 कोळसा वीज निर्मिती

कोळसा वीज निर्मितीत महाराष्ट्र आघाडीवर आहे आधुनिक काळात मानवाच्या विकासाचा मोठा आधार कोळसा ठरला आहे विश्वातील एकूण ऊर्जेपैकी निम्मी गरज कोळसा द्वारे भागविली जाते Coal या शब्दाचा उगम तेराव्या शतकात इंग्रजी शब्द Col पासून झाला याचा अर्थच जीवाश्म युक्त कार्बनचे खनिज असा होतो प्राचीन काळात पृथ्वी वरील नैसर्गिक अरिष्टांमुळे

जंगल वनी सजीव गाडले गेल्यामुळे कोळसा निर्मिती झाली प्राचीन काळामध्ये जीवन सजीव पूर्णपणे विकसित नव्हते त्यावेळी दलदलीच्या जमिनीत शेकडो मीटर उंच आणि रुंद वृक्षांचे वास्तव्य होत तेव्हा पक्षी सस्तन प्राणी  अस्तित्वात नव्हती वृक्षांच्या पालापाचोळा जीर्ण फांद्या दलदलीत पडत व पुन्हा त्यावर नवे वृक्ष उगवत कालांतराने जंगल हळूहळू जमिनीत गाडले गेले हजारो वर्षे या मोठ्या वृक्षांची वने पृथ्वीच्या पोटात उष्णतेमध्ये दबले गेले  व त्यामुळे ते काळे व टणक झालेत तेच चमकदार कोळशाच्या रूपात ओळखले जाऊ लागले

ज्या युगात कोळशाची निर्मिती झाली त्या युगाला कार्बोनिफेरस period असे म्हणतात कोळसा हा कार्बन पासून बनलेला असतो कोळशातील कार्बनच्या प्रमाणानुसार कोळशाची चार प्रकार पडतात

1 पीट

पीट कोळसा हा निकृष्ट दर्जाचा कोळसा आहे हा कोळसा लाकडाप्रमाणे जळतो आणि मोठ्या प्रमाणात धूर निर्माण करतो साधारणतः या कोशाचा उपयोग घरगुती इंधन म्हणून होतो या प्रकारच्या कोळशामध्ये कार्बनचे प्रमाण 30 ते 40% पर्यंत असते या कोळशामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे मोठ्या प्रमाणात धूर निघतो व राख जास्त प्रमाणात मिळते

दोन लिग्नाइट या प्रकारचा कोळसा तपकिरी असतो या प्रकारच्या कोळशामध्ये कार्बनचे प्रमाण 40 ते 50 टक्‍क्‍यांपर्यंत असते

त्यामुळे तो लवकर जळतो व कमी प्रमाणात उष्णता मिळते

3 बिटुमिनस

बिटुमिनस कोळसा रंगाने काळा वजनाने जड असतो यात कार्बनचे प्रमाण 70 ते 80 टक्के असते त्यामुळे हा कोळसा मोठ्या प्रमाणात ज्वालाग्राही असतो हा कोळसा लवकर पडतो का लवकर विझतो.

4) अॅंथ्रॅंसाइट :-

अॅंथ्रॅंसाइट हा सर्वोत्कृष्ट कोळसा आहे यात कार्बनचे प्रमाण 95%  असते. याचा रंग काळा चकाकी असणारा असतो हा सर्वात सावकाश जळतो वर जास्त उष्णता देतो यापासून दूर कमी निघतो व राख ही कमी मिळते

भारतातील कोळसा निर्मित वीज

सध्या कशापासून 1,94,553 मेगावॉट (59.1%) वीज निर्मिती होते

भारतातील कोळसा वीज निर्मितीसाठी कमी प्रतीचा व कमी उष्मांक देणारे आहे भारतात 1kwh (युनिट) निर्मितीसाठी 0.7 किलोग्रॅम कोळसा लागतो तर अमेरिकेत 1kwh (युनिट) निर्मितीसाठी 0.45 किलोग्राम एवढाच कोळसा पुरतो देशातील साठी मुबलक असून देखील औष्णिक केंद्राला उत्पादित कोळसा अपुरा पडत असल्यामुळे कोळशाची आयात करावी लागते

भारतात 4760 मेगावॉट क्षमतेचा सर्वात मोठा प्रकल्प विंध्यनगर जिल्हा singh मध्यप्रदेश येथे आहे महाराष्ट्रात नांदगाव पेठ जिल्हा अमरावती येथे 2700 मेगावॅट क्षमतेचा मोठा प्रकल्प आह कोळसा उत्पादनात भारत चौथ्या स्थानावर आहे े

कोळसा निर्मित वीज निर्मितीत महाराष्ट्र राज्य आघाडीवर आहे तर कोळसा उत्पादनात छत्तीसगढ आघाडीवर आहे

देशात वर्धा खोरे तालचेर maura गड सोलापूर येथे कोळसानिर्मिती वीज प्रकल्पांची उभारणी केली जाणार आहे

5 मार्च 2015 ला प्रत्येकी 600 मेगावॉट क्षमतेच्या दोन औष्णिक प्रकल्पाचे डोंगलिया मध्य प्रदेश येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले या प्रकल्पाचे नाव सिंगाजी औष्णिक ऊर्जा प्रकल्प असे आहे मध्यप्रदेश ने वर्षभर वीज पुरवठा करण्याच्या देशाने अटल ज्योती अभियान सुरू केली आह

दोन नैसर्गिक वायू

पृथ्वीवरील विविध भौगोलिक घटनांमुळ पृथ्वीवरील वनस्पती प्राणी इतर सजीव  हे जमिनी खाली दाबले गेले त्यांच्या थरांवर मोठ्या प्रमाणात उष्णता व दाब निर्माण झाल्यामुळे सहस्त्रावधी वर्षानंतर नैसर्गिक वायूची निर्मिती होते सजीवनी सूर्यापासून घेतलेल्या ऊर्जेचे रासायनिक बंधामध्ये रूपांतरण झाल्यामुळे नैसर्गिक वायू अस्तित्वात येतो नैसर्गिक वायू हा अपुनर्निर्मितीक्षम

उर्जास्त्रोत आहे नैसर्गिक वायू हाइड्रोकार्बन वायू असतो

यात मूलतः मिथेन व इतर अल्केनचा समावेश होतो. काही प्रमाणात कार्बन डायऑक्साइड नायट्रोजन हायड्रोजन सल्फाईडचा समावेश असतो

नैसर्गिक वायूची निर्मिती दोन पद्धतीने होते

एक बायोजेनिक पद्धत

दोन थर्मोजेनिक पद्धत

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.