एकात्मिक गृहनिर्माण व झोपडपट्टी विकास कार्यक्रम
एकात्मिक गृहनिर्माण व झोपडपट्टी विकास कार्यक्रम

सुरुवात 3 डिसेंबर 2005

उद्देश झोपडपट्टीधारकांना पुरेसा निवारा व मूलभूत पायाभूत सुविधा पुरवून निरोगी वातावरण तयार करणे

एकात्मिक गृहनिर्माण व झोपडपट्टी विकास कार्यक्रम ही योजना राज्य सरकार द्वारे राबवली जात असून यामध्ये JNNURM व BSUP कार्यक्रमांतर्गत समाविष्ट केलेली दहा शहरे वगळून इतर शहरांचा समावेश केला जातो

या योजनेअंतर्गत भारत सरकारचे 80% अनुदान 8% राज्य शासन राखी वर्गासाठी 10% आणि उर्वरित 12% पर्सेंट लाभार्थींचे योगदान असते

राजीव गांधी ग्रामीण निवारा योजना 1

सुरुवात 2005

उद्देश इंडिया आवास योजनेअंतर्गत पात्र नसलेल्या दारिद्र्यरेषेखालील ग्रामीण कुटुंबांना निवारा सुविधा पुरविणे

राजीव गांधी ग्रामीण निवारा योजना एक ही राज्यातील ग्रामीण भागातील दारिद्र रेषेखालील कुटुंबांसाठी राबविण्यात येत आहे या योजनेंतर्गत दारिद्र्यरेषेखालील लाभार्थ्यांना स्वतःचे घर बांधण्यासाठी 68 हजार 500 रुपये इतके अनुदान दिले जाते ही योजना जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत 33 जिल्हा परिषदांमध्ये राबविण्यात येत आहे

सुधारित राजीव गांधी ग्रामीण निवारा योजना 2

उद्देश दारिद्र रेषेवरील परंतु अल्प उत्पन्न गटातील कुटुंबांसाठी निवारा सुविधा उपलब्ध करणे

सुधारित राजीव गांधी ग्रामीण निवारा योजना 2 अंतर्गत दोन वर्षात दारिद्र्यरेषेवरील परंतु अल्प उत्पन्न गटातील कुटुंबांसाठी 1,25,000 घरे बांधण्याचे राज्याने ठरविले आहे

योजनेंतर्गत लाभार्थ्यांसाठी जिल्ह्यातील अग्रणी बँकेकडून रुपये 90,000 कर्ज  पुरविले जाते व उर्वरित रुपये 10,000 लाभार्थ्यांची भरावयाची आहे या कर्जावरील व्याज अनुदानाच्या स्वरूपात राज्य शासनाकडून दिले जाते


MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.