मारायचा होता “टेगार्ट ” मेला “अर्नेस्ट डे”
गोष्ठ आहे गोपीनाथ सहाची
वर्ष १९२४ असहकार चळवळीत सहभागी झालेला असहकार चळवळ मधेच बंद झाल्यामुळे हा उमदा तरुण बंगाल मधुन युंगातर दल स्थापन करतो.
पोलीस डिटेक्टीव दलाचा प्रमुख क्रुरकर्मा अधिकारी “चार्लस टेगार्ट”ज्याने बंगालमधे क्रांतिकारकाना त्रस्त केले होते याचा खुन करण्याचा निश्चय करुन रिव्हालवर मधुन गोपीनाथाने गोळी घातली पण दुर्दैवाने तो टेगार्ट नव्हता तर “डे” होता.
पुढे या कृत्याबद्दल गोपीनाथ सहा यांना फाशीची शिक्षा १९२४ साली झाली.
गांधीजींनी या कृत्याबद्दल गोपीनाथांच्या माफीच्या ठराव कॉग्रेस च्या अधिवेशनात मांडायला विरोध केला होता .