ग्रामसेवक (Gramsevak)
ग्रामसेवक (Gramsevak)

महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ मधील ६० नुसार प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी एक ग्रामसेवक असतो.

– ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा प्रशासकीय प्रमुख असतो.

– ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा पदसिद्ध सचिव असतो.

– ग्रामसेवक हा जिल्हा परिषदेतील ग्रामविकास खात्याचा वर्ग ३ चा सेवक असून मोठ्या ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकास ग्रामसेवक अधिकारी असे संबोधले जाते. एका ग्रामपंचायतीसाठी एक अथवा एकापेक्षा अधिक ग्रामपंचायतीसाठी एक ग्रामसेवक असतो. ( ग्रामसेवकास बालविवाह प्रतिबंधक अधिकारी असे म्हणतात ).    

ग्रामसेवक (Gramsevak)

पात्रता

 1. तो महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
 2.  तो व्यक्ती १२ वि उत्तीर्ण असावा.
 3.  मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मते योग्य.

निवड:

जिल्हा निवड समितीमार्फत

नेमणूक:

मुख्य कार्यकारी अधिकारी  

वेतन:

  जिल्हा निधीमधून दिले जाते.  

रजा:

किरकोळ रजा गटविकास अधिकारी नंतरचे नियंत्रण मूख्य कार्यकारी अधिकारी देतात.  

नियंत्रण:

  जवळचे नियंत्रण गट विकास अधिकारी नंतरचे नियंत्रण मुख्य कार्यकारा अधिकारी  

राजीनामा:

मुख्य कार्यकारी अधिकारी ( CEO )  

बडतर्फी:

मुख्य कार्यकारी अधिकारी ( CEO )  

महाराष्ट्रातील व ग्रामसेवकांची प्रशिक्षण केंद्रे :

 • जालना
 • परभणी
 • बुलढाणा गारगोटी (कोल्हापूर )
 • मांजरी (पुणे)
 • सिंदेवाडी (चंद्रपूर )
 • कोसबाड (पुणे)
 • अमरावती  

ग्रामसेवकांचे अधिकार व कार्य :

 • १) गावातील जन्म, मृत्यू व विवाह यांच्या नोंदी ठेवणे.
 • २) ग्रामपंचायतीचे प्रशासकीय कामकाज पाहणे.
 • ३) ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांवर देखरेख व नियंत्रण ठेवणे.
 • ४) गावातील विविध कर गोळा करणे.
 • ५) ग्रामपंचायतीने मंजूर केलेल्या ठरावांची अंमलबजावणी करणे.
 • ६) ग्रामसभेचे आयोजन करणे व कामकाजाचा इतिवृत्तांत लिहिणे.
 • ७) ग्रामपंचायतीचा वार्षिक अहवाल, आर्थिक होशोब पंचायत समिती जवळ परिषदेला सादर करणे.
 • ८) ग्रामपंच्यातीचे पत्रव्यवहार, नोंदणी, पुस्तके व अभिलेख सांभाळणे
 • ९) ग्रामपंचायतीचे अंदाजपत्रक तयार करणे.
 • १०) गावाचा ग्रामनिधी सांभाळणे.
 • ११) ग्रामपंचायतीच्या सभा बोलावणे व सभांचे इतिवृत्त लिहिणे.
 • १२) शासनाच्या विविध योजनांची माहिती वेळोवेळी गावकर्यांना देणे.

महाराष्ट्र शासनाने ग्रामसेवकाच्या वेतन श्रेणीत वाढ करून त्यासाठी नवीन वेतन २४०० व बारा वर्षाच्या सेवेनंतर किंवा पाडोनोत्तीने ५२०० ते २०२०० ग्रेड पे वेतन ३५०० नवीन वेतन श्रेणी जाहीर केली आहे.

भारतात ग्रामीण इ- प्र्रशासनाच्या प्रयत्नतून संगणीकृत ग्रामतीण सूचना प्रणाली सुरु करण्यात आली आहे.  

FAQs

ग्रामसेवक कोण आहे?

सामुदायिक कल्याण आणि विकासाच्या बाबतीत गावकऱ्यांना सल्ला देण्यासाठी आणि मदत करण्यासाठी नियुक्त केलेला माणूस.

ग्रामसेविका कोणाला म्हणतात?

सामुदायिक कल्याण आणि विकासाच्या बाबतीत गावकऱ्यांना सल्ला देण्यासाठी आणि मदत करण्यासाठी कार्यरत असलेली एक महिला.

ग्रामसेवक आणि ग्रामसेविका यांची कार्ये काय आहेत?

गावातील पैशांशी संबंधित सर्व कामे ग्रामसेवक करतात, जसे की गावातील कोणत्या शेतात कुठे आणि किती पैसा खर्च होतो, कर जमा करणे, गावाचे अंदाजपत्रक तयार करणे. गावाच्या विकासावर लक्ष ठेवतो आणि उच्च अधिकार्‍यांना कळवतो.

ग्रामसेवकाचा पगार किती आहे?

ग्रामसेवकाचे मूळ वेतन 20000 ते 40000 दरम्यान आहे. एकूण वेतन मूळ वेतनाच्या 2x असेल. सरासरी पगार 7 व्या cpc स्तर 1-18 पासून सुरू होतो

ग्रामसेवक भारतीची वयोमर्यादा किती आहे?

ग्रामसेवेसाठी वयोमर्यादा १८-३८ वर्षे आहे. महाराष्ट्र सरकार वय शिथिलता: OBC – 3 वर्षे, SC/ST 5 वर्षे

ग्रामसेवकासाठी मला कोणती शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे?

उमेदवार 60% गुणांसह 12वी उत्तीर्ण असावा

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.