भारतीय हवामान विभागाने देशभरात चक्रीवादळ जवाद संदर्भात अलर्ट जारी केला आहे.
ह वादळ ४ डिसेंबरला ओडिशा आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर धडकणार असल्याचे सांगण्यात येत आहे. हे चक्रीवादळ ३ डिसेंबर रोजी मध्य बंगालच्या उपसागरात चक्रीवादळात रूपांतरित होऊ शकते, अशी माहिती हवामान खात्याने दिली आहे.
जवाद म्हणजे काय?
जवाद सौदी अरेबियाच्या सूचनेवरून या वादळाला नाव देण्यात आले आहे. जवाद हा अरबी शब्द आहे. अरबी शब्दात त्याचा अर्थ ‘परोपकारी किंवा दयाळू’ असा आहे. त्यामुळे हे वादळ फारसे धोकादायक ठरणार नाही. या चक्रीवादळाचा सामान्य जीवनावर इतर चक्री वादळांसारखा विनाशकारी परिणाम होणार नाही.
भारतीय हवामानशास्त्र विभाग (IMD) द्वारे राखलेल्या चक्रीवादळ विकास वारंवारता डेटानुसार, 1891 ते 2021 दरम्यान आठ वेळा, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन्ही कालावधीत या प्रदेशात चक्रीवादळ विकसित झाले नाहीत. ही वर्षे होती – 2021, 1990, 1961, 1954, 1953, 1914, 1900 आणि 1895. गेल्या 132 वर्षात 41 वर्षांमध्ये ऑक्टोबरमध्ये चक्रीवादळ आले नाही आणि नोव्हेंबरमध्ये 32 वेळा चक्रीवादळ आले.
चक्रीवादळ जवाद हे नाव कसे पडले?
चक्रीवादळ जवाद हे नाव सौदी अरेबियाने दिलेले आहे. हे एक सौदी अरेबियातील नाव आहे.
चक्रीवादळ जवादला भारतामध्ये काय म्हणतात?
दरवर्षी अरबी समुद्र मध्ये चक्रीवादळे निर्माण होत असतात आणि त्या एरिया मध्ये म्हणजेच ज्या क्षेत्रामध्ये चक्रीवादळ निर्माण झाली आहे त्याच्या स्थानानुसार त्याचे नाव दिले जाते. यावर्षी सौदी अरेबिया या देशांनी या चक्रीवादळाचे नाव जवाद असे ठेवलेले आहे, त्यामुळे भारतामध्ये या वादळाला जवाद चक्रीवादळ म्हणूनच ओळखले जाते.
जवाद चक्रीवादळ भारतामध्ये कुठे पडणार आहे?
जवाद हे चक्रीवादळ भारताच्या दक्षिण भागांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तेथील क्षेत्रांना प्रभावित करणार आहे उदाहरणार्थ अंदमान निकोबार या सोबतच पश्चिम बंगालच्या काही किनारपट्टीला या चक्रीवादळाचा मोठ्या प्रमाणात प्रभाव जाणवणार आहे.