पंडिता रमाबाई
पूर्ण नावपंडिता रमाबाई सरस्वती
जन्म२४ एप्रिल १८५८
मृत्यू५ एप्रिल १९२२
जोडीदारबिपिन बिहारी मेधवी (म. 1880-1882)
मुलेमनोरमाबाई
पालकलक्ष्मीबाई डोंगरे, अनंत शास्त्री डोंगरे
पंडिता रमाबाई

पंडिता रमाबाई या परीत्यक्ता , पतिता व विधवा स्त्रियांच्या सर्वांगीन विकासाकरिता सपर्पित भावनेने सतत कार्यरत राहिलेल्या एक मराठी सामाजिक कार्यकर्त्या विदूषी होत्या.

रमाबाई रानडे यांचा जन्म अनंत शास्त्री डोंगरे व लक्ष्मीबाई डोंगरे यांचे पोेटी, गंगामुळ (कर्नाटक) येथे झाला. त्यांचे वडिल अनंतशास्त्री हे त्याकाळी स्त्रीयांच्या बाबतीत पुरोगामी विचारांचे होते. स्त्रियांना शिक्षन द्यावे या मताचे ते हेते. पत्नी लक्ष्मिबाई व मुलगी रमाबाई यांना त्यांनी वेदशास्त्राचे शिक्षन दिले. रमाबाई नऊ वर्षाच्या झाल्या , तरी त्यांचे लग्न करुन दिले नाही म्हनुन ज्ञांतिबांधवांनी त्यांना वाळित टाकले होते. त्या काळात रमाबाईंत्या आई- वडिलांना लोकांच्या त्रासामुळे राहन्याची ठिकाने बदलावी लागली. रमाबाई १७-१८ वर्षांच्या असतानाच त्यांच्या आई-वडिलांचे निधन झाले. इ.स १८८० साली त्यांनी कोलकत्यातील बिपीन बिहारीदास मेधावी या वकिलासी लग्न केले. हा त्या काळातील क्रांतीकारी असा विवाह होता. कारण पंडिता रमाबई या ब्र्हामन तर त्यांचे पती शुद्र मानले गेलेल्या जातीचे होते.

पंडिता रमाबाई stamp
पंडिता रमाबाई stamp

बालविवाह ,पुनर्विवाह बंदी यांसारख्या घातक चालीरिती व रूढींपासुन समाजास मुक्त करन्याच्या उद्देशाने त्यांनी प्रथम पुण्यात व नंतर नगर, सोलापुर, ठाणे, मुंबई,पंढरपुर व बार्शी या ठिकानी “आर्य महिला समाजाची” स्थापना केली. आपल्या विचाराच्या प्रसारार्थ त्यांनी ” स्त्रीधर्मनिती ” हे पुस्तक लिहले. इ.स १८८३ साली त्या इंग्लंडला गेल्या व तेथिल चेल्टन ह्याम लेडिज कॉलेज मध्ये संस्कृत श्कवले. १८८६ साली त्या आपल्या स्त्रीशिक्षन विषयक कार्याला मदत मिळवन्यासाठी अमेरिकेस गेल्या. तेथे त्यांनी हिंदू बालविधवांच्या प्रश्नाचा उहापोह करनारे “द हायकास्ट हिंदू वुमन” हे पुस्तक लिहले. अनेक ठिकानी व्याख्याने देउन त्यांनी भारतातील समस्या तेथिल लोकांसमोर मांडल्या. भारतातिल बालविधवांच्या कार्यात मदत करन्यासाठी काही अमेरिकन लोकांनी बॉस्टन येथे “रमाबाई असोसिएशन” ची स्थापना केली. पुढील काळात त्यांनी युनायटेड स्टेट्सची लोकस्थिती व प्रवासवृत्त हे पुस्तक़ प्रकाशित केले. त्यांनी मुळ हिब्रु भाषेतिल बायबलचे मराठी भाषेत भाषांतरही केले. अशा या थोर विदूषीला इ.स १९१९ साली त्यांच्या कार्याबद्दल तत्कालिन ब्रिटीश राज्यव्यवस्थेतिल सर्वोच्च पुरस्कार ” “कैसर- ए- हिंद ” ने गौरवन्यात आले. कैसर ए हिंद हे सुवर्ण पदक होते. पुढे १९८९ मध्ये त्यांच्यावर टपाल तिकीटही काढन्यात आले. स्त्री शिक्षन, स्त्रियांचे समाजासमोर येने, कोनत्याही क्षेत्रात स्त्रियांचा सहभाग या गौष्टी फारशा प्रलित नसतानाच्या काळात संस्कृत भाषा, स्त्रियांचे प्रश्न, आदी क्षेत्रात भारतासह परदेशातही पंडिता रमाबाई यांनी आपल्या विचारांचा ठसा उमटवला. अशा या थोर विदूषीचा मृत्यू १९२२ साली केडगाव येथे झाला.

नोव्हेंबर १८९० मध्ये ‘शारदा सदन’ पुण्यात आणण्यात आले. ‘शारदा सदन’ मध्ये प्रत्येक मुलीला धर्माचे स्वातंत्र्य दिले होते तरीही गैरसमजातून झालेल्या विरोधामुळे त्यांना आपल्या कार्याचे मुख्य केंद्र केडगाव (जि. पुणे) येथे हलवावे लागले. २४ सप्टेंबर १८९८ रोजी केडगावला ‘मुक्तिसदना’चे उद्घाटन करण्यात आले.

तयांनी अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाकरिता स्त्रीप्रतिनिधित्वाचा पुरस्कार केला. केशवपनाविरुद्ध त्यांनी प्रचार केला व संमती वयाच्या चळवळीस पाठिंबाही दिला.

१८९७ मध्ये मध्य प्रदेशात व १९०० मध्ये गुजरातमध्ये पडलेल्या दुष्काळात निराश्रित झालेल्या स्त्रियांना त्यांनी या आश्रमात आश्रय दिला. त्यात ३०० हून अधिक उच्चवर्णीय स्त्रिया होत्या.

हंटर आयोगासमोर साक्ष

१८८३ साली सरकारी विद्याविषयक हंटर आयोगासमोर त्यांनी प्रभावी साक्ष दिली. मे १८८३ मध्ये स्त्रियांच्या उद्धाराकरिता अधिक प्रभावी कार्य करता यावे म्हनुन इंग्रजी भाषा व वैद्यक या विषयांच्या शिक्षनाकरिता त्या त्यांची कन्या मनोरमा यांच्यासह इंग्लंडला गेल्या. हा प्रवास खर्च त्यांनी स्त्रीधर्मनिती या पुस्तकाच्या विक्रीतुन केला. इंग्लंडमध्ये त्या वॉटिंज गावच्या सेंट मेरी मठात राहिल्या. येशु ख्रिस्तांच्या पतित स्त्रियाबाबतंच्या दृष्टीकोनामुळे तसेच भूतदया व प्रेमाचे शिकवनिने त्या ख्रिस्ती धर्माकडे आकर्शित झाल्या. म्हनुन त्यांनी २९ सप्टेंबर १९८३ रोजी वॉटिज येथिल चर्चमध्ये ख्रिस्ती धर्माचा स्विकार केला.

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.