प्रधानमंत्री पिक विमा योजना
प्रधानमंत्री पिक विमा योजना

प्रधानमंत्री पिक विमा योजना 13 जानेवारी 2016 रोजी लागू करण्यात आली

प्रधानमंत्री पिक विमा योजना शेतकऱ्यांचे संकटात पासून होणाऱ्या कृषी उत्पादनाची नुकसानभरपाई देण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आली आहे

प्रधानमंत्री पिक विमा योजनेची घोषणा मध्यप्रदेशातील सीहोर जिल्ह्यातील शिरपूर गावात झालेल्या शेतकरी महामेळाव्यात दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या द्वारे करण्यात आली

प्रधानमंत्री पिक विमा योजना पूर्वीच्या 2010 मधील पिक विमा योजनेच्या जागी स्थापन करण्यात आली

योजना सर्वप्रथम हरियाना राज्यात लागू करण्यात आली

प्रधानमंत्री पिक विमा योजना या योजनेत खरीप हंगामाच्या सर्व उत्पादनासाठी विमा रकमेच्या 2.0 present व रब्बी हंगामाच्या उत्पादनासाठी 1.5% हप्ता शेतकऱ्यांना भरावा लागतो

उर्वरित रक्कम सरकार मार्फत जमा करण्यात येते

प्रधानमंत्री पिक विमा योजना ही खरीप व रब्बी पिकांवर व्यापारी व फळबागांसाठी संरक्षण उपलब्ध करते

वार्षिक व्यापारी व फळबागा पिकांसाठी शेतकऱ्यांनी 5% हप्ता भरणे गरजेचे आहे

प्रधानमंत्री पिक विमा योजना 2016 च्या खरीप पिकांच्या पेरणीपासून सुरू करण्यात आली

प्रधानमंत्री पिक विमा योजना अंतर्गत खरीप तांदूळ मका ज्वारी धान बाजरी इत्यादी व रब्बी गहू जवस हरभरा मसूर इत्यादी

पिकांचा समावेश करण्यात आला आहे

या योजनेची घोषणा करताना सरकारने म्हटले एक राष्ट्र  एक योजना

या योजनेचे बकऱ्यांना पिकाबरोबर लाइफ इन्शुरन्स ही देण्यात आला आहे

या योजना सध्या पायलट प्रोजेक्ट तव्यावर 45 जिल्ह्यात लागू करण्यात आली आहे

प्रधानमंत्री पिक विमा योजना अंतर्गत 8.8 कोटी रुपये खर्च करण्याचे घोषित करण्यात आले आहे

प्रधानमंत्री पिक विमा योजनेत भरण्यात येणारा हप्ता शेतकऱ्यांच्या फायद्याच्या दृष्टीने कमी ठेवण्यात आला आहे कारण सर्व स्तरातील शेतकरी पीक विम्याचा लाभ घेऊ शकतील

या योजनांतर्गत सरकारी अनुदानावर कोणतीही कमाल मर्यादा घालण्यात आली नाही उर्वरित हप्ता 90% असला तरी तो सरकार द्वारे जमा करण्यात येईल

ही योजना राष्ट्रीय कृषी विमा योजना व संशोधित राष्ट्रीय कृषी विमा योजना या दोन्ही योजना च्या जागी स्थापन करण्यात आली आहे

प्रधानमंत्री पिक विमा योजनेत व्यक्तीमार्फत निर्माण संकट उदाहरण आग लावणे पिकांची चोरी होणे नासधूस करणे इत्यादींचा समावेश केला जात नाही

प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत गारपिट भूस्खलन पूर यासारख्या आपत्तींना स्थानिक आपत्ती मानून तसेच दुष्काळ अतिवृष्टी सारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे पेरणी करता आली नाही तर त्याचा  विमा शेतकऱ्यांना मिळेल

पिकाच्या कापणीनंतर 14 दिवसापर्यंत  पीक शेतात असताना चक्रीवादळ अवकाळी पाऊस अशा नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे हानीचा विचार आहे या योजनेत करण्यात आला आहे

प्रधानमंत्री पिक विमा योजनेत आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे पिकाच्या हानीची पाहणी करण्यात येईल

त्यामुळे शेतकऱ्यांना दाव्या पोटी  मिळणाऱ्या रकमेत होणारी दिरंगाई टाळता येईल

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.