जन्म दिनांक १७ जून १८६७ रोजी नागाव, जिल्हा रायगड या ठिकाणी झाला होता.
त्यांच्या वडिलांचे नाव विठोजीराव तर आईंचे नाव लक्ष्मीबाई असे होते.
त्यांनी ‘मराठा दीनबंधू’ हे पत्र स्वखर्चाने चालवले. ते शेवटी बंद पडले. भास्करराव सत्यशोधक समाजाचे कामही पाहत होते. ते मुंबई इलाख्याचे ‘पहिले मराठी शिक्षणमंत्री’ झाले. ते शेतकी आणि अबकारी खात्याचे मंत्री म्हणून 1925 ते 1930 दरम्यान निवडून आले. ते दिल्ली येथे लेजिस्लेटिव्ह असेंब्लीतही 1930 साली निवडले गेले. ते दोन्ही गोलमेज परिषदांनाही लंडनला जाऊन आले होते. त्यांनी अधिवेशन भरवण्याचा घाट घातला होता. त्यावेळी त्यांना मृत्यूची चाहूल लागली. त्यांचे अखेरचे भाषण सत्यशोधक समाजाच्या अधिवेशनातील ‘राम राम पाहुणं’ हेच होय.
Important Points
- भास्करराव विठोजीराव जाधव यांचे घराणे रायगडाच्या परिसरातील बिरवाडीचे
- रा.गो. भांडारकर हे त्यांचे सहाध्यायी होते
- मट्रिकच्या परीक्षेत ते मुंबई इलाख्यात सर्वप्रथम आले होते
- महात्मा फुले, आय्यवारू स्वामी , प्रा. केळूसकर ही त्यांची दैवते बनली . अशाप्रकारे ते सत्यशोधक समाजाचे खंदे पुरस्कर्ते बनले.
- पण्यातील ‘डेक्कन मराठा एज्युकेशन सोसायटी’चे अध्वर्यू अॅड. गंगाराम भाऊ म्हस्के यांनी त्यांचे नाव शाहू महाराजांना सुचवले.
- दर्मिळ गुणांमुळे त्यांनी भास्कररावांना आग्रहाने करवीर संस्थानात नेमून घेतले.
- 1895 ते 1921 या काळात भास्कररावांनी मुख्य महसूल अधिकारी , जिल्हा व सत्र न्यायाधीश, असिस्टंट प्लेग व फॅमिन कमिशनर, 1901 च्या शिरोगणतीचे उपाधीक्षक इ. अनेक महत्त्वाची पदे भूषवली
- बहुजन समाजाचे शिक्षण, जातीभेद निवारण, अस्पृश्यता निर्मुलन, ब्राह्मणेतरांचे राजकारण या बाबतीत त्यांचे व शाहू महाराजांचे विचार समान होते
- शाहू महाराजांचा प्रगाढ विश्वास असल्यामुळे कोल्हापूर नगरपालिकेच्या कारभाराची सर्व सूत्रे तब्बल 14 वर्षे भास्कररावांच्या हाती राहिली
- करवीरची जनता त्यांचा ‘कोल्हापूरचे दुसरे शिल्पकार’ असा त्यांचा अभिमानाने उल्लेख करते.
- तयांना प्रति शाहू महाराज असेही म्हटले जाते
त्यांच्या पत्नी भागीरथी जाधव या होत. त्यांना चार मुले आणि चार मुली होत्या. मुली सत्यवती, डॉ. ताराबाई, इंदुमती आणि मैत्रेयी याही शिक्षित आणि संस्कारित होत्या. भास्कररावांचे पुत्र हिंदुराव, विठोजीराव, आप्पासाहेब आणि कर्नल आनंदराव यांनी त्यांच्या कार्यातून भास्करराव यांचा वारसा टिकवला. अप्पासाहेब जाधव यांनी सहकारक्षेत्रात मोठे योगदान दिले. त्यांचे पुत्र रणजित जाधव यांनीही अर्बन बँकेच्या संचालक पदाच्या माध्यमातून सहकार चळवळ बळकट केली. त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी गीता या संचालक आहेत. आप्पासाहेब जाधव सिनेमा क्षेत्रात साउंड इंजिनीयर म्हणून काम करत, ते माझे आजोबा. मी भास्कररावांची पणती आहे.