भौतिक राशी
भौतिक राशी

भौतिक राशी म्हणजेच पदार्थ वस्तु तसेच एखाद्या संकल्पनेचा भौतिक गुणधर्म याचे मापन करून अंकात व्यक्त करता येते त्यासाठी मूलभूत एककांचा वापर केला जातो भौतिक राशीच्या मापनासाठी खालील पद्धतीचा वापर केला जातो

1) एमकेएस (m.k. s) पद्धत

इसवी सन 1901 मध्ये जीआॅर्गी यांनी ही संकल्पना मांडली परंतु प्रत्यक्षात आंतरराष्ट्रीय स्तरावर या पद्धतीचा वापर 1940 पासून सुरु झाला यामध्ये मापनासाठी विविध मूलभूत एककांचा वापर केला जातो

उदा. मीटर, किलोग्रॅम, सेकंद

या पद्धतीलाच SI ( System Internationale or Inter National system of units) पद्धत असेही म्हणतात. युरोप वगळता संपूर्ण जगात इ. स. 1960 पासून ही पद्धत वापरली जाते. युरोपमध्ये मापनासाठी FPS ही पद्धत वापरली जाते. यामध्ये लांबीसाठी फुट वस्तुमानासाठी पाउंड आणि वेळेसाठी सेकंद हे एकक वापरले जात. े

( 1 फुट = 30.48 cm, 1 पाऊंड = 0.454 kg)

2)  सीजीएस पध्दत (CGS Method) :

या पद्धतीमध्ये मापनासाठी खालील मूलभूत घटकांचा वापर केला जातो.

उदा. सेंटिमीटर, ग्रॅम आणि सेकंद.

3) एसआय पध्दत ( SI Method) :

या पध्दतीलाच एककांची आंतरराष्ट्रीय पध्दत असे म्हणतात. यामध्ये दैनंदिन जीवनातील वाणिज्य आणि विज्ञान यांच्या मापनासाठी एकूण सात मुलभुत एककाचा वापर केला जातो

1 वस्तुमान – किलोग्राम

2 अंतर – मिटर

3 प्रकाशाचा वेग – कॅन्डेला

4 वेळ – सेकंद

5 विद्युत धारा – ॲम्पिअर

6 तापमान – केल्विन

7 रेणुभार – मोल

भौतिक राशींचे प्रकार

1) सदिश राशी (Vector Quantities) :

परिमाण आणि दिशा या दोघांचीही आवश्यकता असते.

उदा. वेग, बल, संवेग, वजन, त्वरण आणि विस्थापन.

2) अदिश राशी (Scalar Quantities) :

फक्त परिमाणाची ( प्रमाणाची ) आवश्यकता असते.

उदा. वस्तुमान, चाल, प्रभार, आकारमान, तापमान, घनता, कार्य, ऊर्जा

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.