राष्ट्रीय पाणीपुरवठा धोरण
राष्ट्रीय पाणीपुरवठा धोरण

घोषणा – 1 एप्रिल, 2002
देशांतर्गत उपलब्ध पाणीपुरवठा साठा त्याची मागणी आणि त्याची इतर वापर लक्षात घेऊन भारत सरकारद्वारे 2002 मध्ये राष्ट्रीय पाणीपुरवठा धोरणाची घोषणा केली.
या धोरणांतर्गत पाणी व्यवस्थापन आणि विकासासाठी संघटनात्मक कार्यक्रमावर अधिक लक्ष देण्यात आले.

राष्ट्रीय पाणीपुरवठा धोरणाची विशेषता

पूर प्रभावित भागांना पूर संरक्षणासाठी मास्टर प्लॅन बनविणे

देशातील उपलब्ध पाणीसाठ्याचा उचित आणि योग्य उपयोगासाठी विविध संघटनांची स्थापना करणे

पाणीपुरवठ्याच्या विकासासाठी दीर्घकालीन प्रशिक्षण कार्यक्रम तयार करणे

देशातील पाण्याचे उपलब्धतेनुसार पाणीसाठ्याची निवड व त्याचे वर्गीकरण करणे

पाणीसाठ्यात सुरक्षेसाठी योग्य व्यवस्थापन करणे आणि त्याची वेळोवेळी पाहणी करणे

भू अंतर्गत व भूपृष्ठावरील पाण्याच्या गुणवत्तेचे वेळोवेळी परीक्षण करणे आणि त्याची गुणवत्ता सुधारण्यासाठी योग्य कार्यक्रमांची अंमलबजावणी करणे

कृषी उद्योग, सेवा, शहरीकरण अशा अर्थी क्रियांसाठी विशेष योजना तयार करणे.

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.