pm-interaction-with-awardees-of-pradhan-mantri-rashtriya-bal-puraskar-2
pm-interaction-with-awardees-of-pradhan-mantri-rashtriya-bal-puraskar-2

राष्ट्रीय बाल पुरस्कार 2020 विजेत्यांशी पंतप्रधान साधणार संवाद

– पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या म्हणजेच 24 जानेवारी 2020 रोजी प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2020 विजेत्या 49 मुलांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधणार आहेत.

– विविध राज्यांमधील या 49 विजेत्यांमध्ये जम्मू आणि काश्मीर, मणीपूर आणि अरुणाचल प्रदेशाच्या प्रत्येकी एका मुलाचा समावेश आहे.

– ही मुले कला आणि संस्कृती, नाविन्यपूर्ण संशोधन, शैक्षणिक, सामाजिक सेवा, क्रीडा आणि शौर्य या क्षेत्रातील विजेते आहेत.

– केंद्र सरकार मुलांकडे राष्ट्र निर्मितीतील महत्वाचे भागीदार म्हणून पाहते. त्यांच्या आशा आणि आकांक्षाची दखल घेऊन त्यांच्या कामगिरीचा गौरव करायला हवा.

– जरी प्रत्येक मुल बहुमूल्य असते आणि त्याच्या यशाचे कौतुक करायला हवे मात्र यापैकी काहींच्या यशोगाथा अनेकांसाठी प्रेरणादायी ठरू शकतात.

– याच पार्श्वभूमीवर सरकार दरवर्षी विविध क्षेत्रात आपल्या मुलांनी केलेल्या अद्वितीय कामगिरीसाठी हे पुरस्कार देते.

– नाविन्यपूर्ण संशोधन, शैक्षणिक गुणवत्ता, समाजसेवा, कला आणि संस्कृती, क्रीडा आणि शौर्य या सारख्या क्षेत्रात अद्वितीय कामगिरी करणारे या पुरस्कारासाठी अर्ज करू शकतात. तसेच मुलांच्या गुणवत्तापूर्ण कामगिरीची माहिती असलेली कोणतीही व्यक्ती या मुलाची शिफारस करू शकते. प्रत्येक अर्जाबाबत काळजीपूर्वक विचार केल्यानंतर उच्चस्तरीय समिती विजेत्यांची निवड करते.

– राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी काल 22 जानेवारी 2020 रोजी प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार प्रदान केले.

– आदिवासी कलाकार एनसीसी कॅडेटस, एनएसएस स्वयंसेवक आणि चित्ररथ कलाकारांचा स्वागत समारंभ

– प्रजासत्ताक दिन संचलनात सहभागी होणाऱ्या 1730 हून अधिक आदिवासी कलाकार, एनसीसी कॅडेटस, एनएसएसचे स्वयंसेवक, चित्ररथ कलाकारांसाठी 24 जानेवारी 2020 रोजी पंतप्रधानांच्या निवासस्थानी स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला असून पंतप्रधान त्यांच्याशी संवाद साधणार आहेत.

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.