राहुल बजाज
राहुल बजाज

– राहुल बजाज हे देशातील आदरणीय उद्योजक आणि दानशूर आहेत; तसेच, एक स्पष्टवक्तेही आहेत. बहुतेक उद्योजक आपल्या शब्दामुळे व्यावसायावर परिणाम होऊ नये यासाठी भाष्य करणे सोडाच, पुढे येऊन भूमिका घेण्यासही तयार नसतात.

– राहुल बजाज हे देशातील आदरणीय उद्योजक आणि दानशूर आहेत; तसेच, एक स्पष्टवक्तेही आहेत. बहुतेक उद्योजक आपल्या शब्दामुळे व्यावसायावर परिणाम होऊ नये यासाठी भाष्य करणे सोडाच, पुढे येऊन भूमिका घेण्यासही तयार नसतात. तेथे राहुल बजाज पुढाकार घेतात. आताही केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार हे टीकेचा स्वीकार न करणारे आहे, अशी टीका केली आणि मिडियात या निंदकाच्या नावाने जोरदार चर्चा सुरू झाली.

– राहुल बजाज यांनी असे काही पहिल्यांदा केलेले नाही. ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी आणि दानशूर जमनालाल बजाज यांचे नातू असलेल्या राहुल बजाज यांनी १९६५ मध्ये वयाच्या अवघ्या २७व्या वर्षी बजाज उद्योगाची सूत्रे हाती घेतली. त्यांच्या उत्पादनांनी यशाची शिखरे गाठली. उद्योगाची सूत्रे त्यांच्या हाती असतानाच दोन तपापूर्वी देशाने उदारीकरण, खासगीकरण आणि जागतिकीकरणाचे धोरण स्वीकारण्याचा निर्णय घेतला गेला, तेव्हाही त्यांनी सरकारवर टीका करण्यात, उद्योजकांची भीती सरकारपर्यंत पोहोचविण्यात पुढाकार घेतला होता.

– तेव्हाचे पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांनी त्यांच्या मतांची दखल घेत, उद्योजकांची भीती दूर करण्यासाठी स्वत:हून प्रयत्न केले व उद्योजकांना आमंत्रित करून गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला. आताचे सरकार वेगळे आहे. ते अत्यंत असहिष्णू आहे आणि ते खरोखरीच टीका सहन करू शकत नाही,

– हे बजाज यांच्या विधानानंतर सगळ्यांनाच कळून चुकले. कारण, राहुल बजाज काय म्हणत आहेत, हे ऐकून घेण्यापेक्षा राजापेक्षा राजनिष्ठा दाखवत तीन तीन केंद्रीय मंत्र्यांनी त्यांच्यावर उलट शाब्दिक हल्ला चढवला. ते राष्ट्रविरोधी आहेत, अशीही टीका केली. ते निंदक आहेत आणि असा निंदक शेजारी असावा, असे तुकोबांनी का म्हटले होते, याचा सरकारने विचार करावा.

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.