शबरी आदिवासी घरकुल योजना
शबरी आदिवासी घरकुल योजना

सुरुवात 28 मार्च 2013

शबरी आदिवासी घरकुल योजना ही राज्य पुरस्कृत योजना असून ग्रामीण तसेच शहरी भागातील अनुसूचित जमातीतील बेघर किंवा कच्चे घर असलेल्या लोकांकरिता राबविण्यात येते

या योजनेंतर्गत ग्रामीण क्षेत्रातील लाभार्थ्यांना एक लाख रुपये प्रति घरकुल अनुदान देण्यात येते

नक्षलग्रस्त व डोंगराळ भाग क्षेत्रातील लाभार्थ्यांना एक लाख 42 हजार प्रती घरकुल अनुदान देण्यात येते आणि शहरी क्षेत्रातील वार्षिक उत्पन्न 3 लाखापर्यंत असलेल्या लाभार्थ्यांना घरकुल बांधकामासाठी दोन लाख  50 हजार इतके अनुदान देण्यात येते

तसेच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अभिसरण द्वारे 0.17 लाख व 0.18 लाख  अनुक्रमे ग्रामीण भागातील आणि नक्षलग्रस्त व डोंगराळ भागातील लाभार्थ्यांना देण्यात येते

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.