Contents
बर्या्चदा आपण एखादे वाक्य पूर्ण न बोलता शब्दांची काटकसर करून एकच शब्द किंवा जोडशब्द तयार करतो.
जो त्या वाक्यातील अर्थबोध करून देतो. यालाच ‘समास’ असे म्हणतात. अशी काटकसर करून जो शब्द तयार होतो त्यालाच सामासिक शब्द असे म्हणतात.
उदा. वडापाव – वडाघालून तयार केलेला पाव. पोळपाट – पोळी करण्यासाठी लागणारे पाट कांदेपोहे – कांदे घालून केलेले पोहे.
पचवटी – पाच वडांचा समूह समासाचे मुख्य 4 पडतात.
- अव्ययीभाव समास
- तत्पुरुष समास
- द्वंद समास
- बहुव्रीही समास
१. अव्ययीभाव समास
ज्या समासात पहिला शब्द मुख्य असतो व त्या तयार झालेल्या सामासिक शब्दांचा उपयोग क्रियाविशेषणासारखा केला जातो त्यास ‘अव्ययीभाव समास’ असे म्हणतात.
अव्ययीभाव समासात आपल्याला खालील भाषेतील उदाहरणे पहावयास मिळतात.
अ) मराठी भाषेतीलगाव– गावात गल्लोगल्ली – प्रत्येक गल्लीत दारोदारी – प्रत्येक दारी घरोघरी – प्रत्येक घरी मराठी भाषेतील व्दिरुक्ती (पहिल्या शब्दांचीच पुनरावृत्ती) होऊन तयार झालेले शब्द हे क्रियाविशेषणा प्रमाणे वापरले जातात म्हणून ही उदाहरणे अव्ययीभाव समासाची आहेत.
ब) संस्कृत भाषेतील शब्द उदा. प्रती (प्रत्येक)– प्रतिमास, प्रतिक्षण, प्रतिदिन आ (पर्यत) – आमरण आ (पासून) – आजन्म, आजीवन यथा (प्रमाण) – यथाविधी, यथामती, यथाशक्ती.
वरील उदाहरणात प्रति, आ, यथा हे संस्कृत भाषेतील उपस्वर्ग लागून तयार झालेले शब्द आहेत.
शब्दांच्या अशा एकत्रीकरणाने जो एक जोडशब्द तयार होतो त्याला ‘सामासिक शब्द’ असे म्हणतात.
हा सामासिक शब्द कोणत्या शब्दांपासून तयार झाला हे स्पष्ट करण्यासाठी त्याची फोड करून सांगण्याच्या पद्धतीला ‘विग्रह’ असे म्हणतात.
समासात किमान दोन शब्द किंवा दोन पदे एकत्र येतात.
या दोन शब्दांपैकी कोणत्या पदाला अधिक महत्त्व आहे त्यावरून समासाचे चार प्रकार पडतात.
२. तत्पुरुष समास
तत्पुरुष समास
३. द्वंद समास
४. बहुव्रीही समास
जया समासातील कोणतेच पद प्रमुख नसून त्या पदाच्या अर्थापेक्षा वेगळ्या अशा वस्तूंचा किंवा व्यक्तींचा त्यामधून बोध होतो त्या समासाला बहुव्रीही समास असे म्हणतात.
उदा:
- नीलकंठ – ज्याचा कंठ निळा आहे असा (शंकर)
- वक्रतुंड – ज्याचे तोंड वक्र आहे असा (गणपती)
- दशमुख – ज्याला दहा तोंड आहे असा (रावण)
बहुव्रीही समासाचे खालील 4 उपपक्रार पडतात.
- विभक्ती बहुव्रीही समास
- नत्र बहुव्रीही समास
- सहबहुव्रीही समास
- प्रादिबहुव्रीही समास
i) विभक्ती बहुव्रीही समास
जया समासाचा विग्रह करतांना शेवटी एक संबंधी सर्वनाम येते.
अशा सर्वनामाची जी विभक्ती असेल त्या विभक्तीचे नाव समासाला दिले जाते त्याला विभक्ती बहुव्रीही समास असे म्हणतात.
उदा:
- पराप्तधन – प्राप्त आहे धन ज्याला तो – व्दितीया विभक्ती
- जितेंद्रिय – जित आहे इंद्रिये ज्याची तो – षष्ठी विभक्ती
- जितशत्रू – जित आहे शत्रू ज्याने तो – तृतीया विभक्ती
- गतप्राण – गत आहे प्राण ज्यापासून तो – पंचमी विभक्ती
ii) नत्र बहुव्रीही समास
जया समासाचे पहिले पद नकारदर्शक असते त्याला नत्र बहुव्रीही समास असे म्हणतात.
या समासातील पहिल्या पदात अ, न, अन, नि अशा नकारदर्शक शब्दांचा वापर केला जातो.
उदा:
- अनंत – नाही अंत ज्याला तो
- निर्धन – नाही धन ज्याकडे तो
- नीरस – नाही रस ज्यात तो
iii) सहबहुव्रीही समास
जया बहुव्रीही समासाचे पहिले पद सह किंवा स अशी अव्यये असून हा सामासिक शब्द एखाधा विशेषणाचे कार्य करतो त्यास सहबहुव्रीही समास म्हणतात.
उदा:
- सहपरिवार – परिवारासहित असा जो
- सबल – बलासहित आहे असा जो
- सवर्ण – वर्णासहित असा तो
iv) प्रादिबहुव्रीही समास
जया बहुव्रीही समासाचे पहिले पद प्र, परा, अप, दूर, सु, वि अशा उपसर्गानी युक्त असेल तर त्याला प्रादिबहुव्रीही समास असे म्हणतात.
उदा:
- समंगल – पवित्र आहे असे ते
- सनयना – सु-नयन असलेली स्त्री
- दर्गुण – वाईट गुण असलेली व्यक्ती