gallantry-awards
gallantry-awards

-19 अधिकाऱयांना परम विशिष्ट सेवा पदक :151 सेना पदके जाहीर

– देशाचे संरक्षण करताना दहशतवाद्यांशी दोन हात करणाऱया लष्कारातील सहा जवानांना शौर्य चक्र पुरस्कार जाहीर झाला आहे. याचबरोबर उपलष्करप्रमुख लेफ्टनंट जनरल एस. के. सैनी, लष्काराचे ईशान्येकडील कमांडर लेफ्टनंट जनरल रनबीर सिंह, सहाय्यक लेफ्टनंट जनरल अरविंद दत्ता यांच्यासह 19 अधिकाऱयांना परम विशिष्ट सेवा पदक जाहीर झाले आहे. एकूण 151 सेना पदके, 8 युद्ध सेवा पदकांची घोषणाही प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला करण्यात आली.

– देशाची सुरक्षा करताना असामान्य कामगिरी बजावणाऱया लष्कारातील जवानांना शौर्य चक्र पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. त्यानुसार लेफ्टनंट कर्नल ज्योती लामा, मेजर कोंजेंगबम बिजेंद्र सिंह, नायब सुभेदार नरेंद्र सिंह, नायब सुभेदार सोमबीर, नाईक नरेश कुमार, शिपाई करमदेव ऑरिअन यांना शौर्यचक्र जाहीर झाले आहे.

– लेफ्टनंट कर्नल ज्योती लामा यांनी मणिपूरमध्ये दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी एक माहिती नेटवर्क तयार केले होते. याच बळावर त्यांच्या नेतृत्वाखाली तुकडीने 14 दहशतवाद्यांचा खात्मा केला होता.

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.