उपसा सिंचन योजना upsa yojna
उपसा सिंचन योजना upsa yojna

उपसा सिंचन योजनेमध्ये खालच्या पातळीवरील पाणी पंपांच्या सहाय्याने वरच्या पातळीवर उचलले जाते. धरण व कालव्यांची निर्मिती यांमुळे धरण पातळीपेक्षा खालची पातळी असलेले मोठ्या प्रमाणावरील क्षेत्र ओलीताखाली आणणे शक्य झाले आहे. परंतु वरच्या पातळीवरील क्षेत्र ओलीताखाली आणणे पाण्याच्या कमतरतेमुळे शक्य झालेले नाही, म्हणून वरच्या पातळीवरील क्षेत्र ओलीताखाली आणणेकरिता उपसा सिंचन योजना हाती घेण्यात आलेल्या आहेत.

उपसा सिंचन योजनेचे फायदेः

1. उपसा सिंचन योजनेमुळे वरच्या पातळीवरील क्षेत्र ओलीताखाली आणणे शक्य झाले आहे .

2. उपसा सिंचन योजनेकरिता भूसंपादनाबाबतच्या समस्यांचे प्रमाण कमी आहे .

3. पाण्याचा अपव्यय कमीत कमी होतॊ .

उपसा सिंचन योजनेच्या गरजाः

पाण्याचा स्त्रोत : उपसा सिंचन योजना असलेल्या ठिकाणी पाण्याचा योग्य व सतत असा स्त्रोत वर्षभर उपलब्ध असणे आवश्यक आहे. धरणातील, K.T. weir मधील, कालव्यातील पाणी उपसा सिंचन योजनेकरिता उपलब्ध केले जाऊ शकते.

उचल माध्यम : आवश्यक असलेल्या ठिकाणी पाण्याचा उपसा करणेसाठी उचल माध्यम म्हणजेच पंपांची आवश्यकता असते. पाण्याचा विसर्ग व duty point head यावर पंपांची निवड केली जाते.

वहन माध्यम : उर्ध्वनलिका ही स्टील, काँक्रीट किंवा इतर योग्य पदार्थांची बनलेली असते.

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.