खनिज संपदा व उर्जासाधने
खनिज संपदा व उर्जासाधने

महाराष्ट्रातील खनिज क्षेत्र विदर्भातील भंडारा, गोंदिया, नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर व यवतमाळ, पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा तसेच कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर जिल्ह्यांत बहुतेक खनिज संपत्ती बेसाल्ट खडकाच्या व्यतिरिक्त असलेल्या स्फटिक व रूपांतरित खडक आढळते.

महाराष्ट्रात कोळसा, चुनखडी, मॅग्नीज, बॉक्साईड, लोखंड, डोलोमाईट, कायनाईट, क्रोमाइट, सिलिका इत्यादी खनिजांचे साठे आढळून येतात.

महाराष्ट्राच्या 36 जिल्ह्यांपैकी 6 जिल्ह्यांत खनिज संपदा एकवटलेली आहे.
मराठवाड्यातील चुनखडीचे साठे व बॉम्बे हाय खनिज तेल क्षेत्र वगळता उर्वरित महाराष्ट्रात खनिजसाठे नाहीत . त्यातही महाराष्ट्रातील खाणींच्या 90% खाणी पूर्व विदर्भात व 9.5% खाणी दक्षिण महाराष्ट्र व दक्षिण कोकणात आहे

महाराष्ट्रात पूर्व विदर्भात व दक्षिण महाराष्ट्रात खनिज असण्याचे कारण म्हणजे या भागात प्रामुख्याने आर्कियन, धारवाड व गोंडवन कालीन खडक हे आहेत. इतर भागात खनिजयुक्त प्राचीन खडक दख्खनच्या लाव्हारसाच्या थराखाली गाडले आहेत.

महाराष्ट्रात उत्पादनक्षम खनिजसाठा 58000 चौरस किलोमीटर इतके क्षेत्र असून  राज्‍याच्‍या एकूण क्षेत्राच्या 19% आहे

मार्च 2015 मध्ये महाराष्ट्रात 60000 रोजगार असलेल्या प्रमुख खनिजांच्या 290 खाणी कार्यरत आहेत.

राज्यात 2014 – 15 मध्ये उत्खनन केलेल्या खनिजाचे एकूण मूल्य 7381 कोटी रुपये होते. त्यापैकी दगडी कोळशाचे मूल्य 6083 कोटी रुपये म्हणजेच 82.40% होते.

देशाच्या खनिज उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा सुमारे 1960 साली 3.3% होता सध्या हा जवळपास तितकाच आहे पूर्वी महाराष्ट्रात पेट्रोलियमचे उत्पादन मुळीच नव्हते मात्र आता मात्र एकंदर उत्पादनात 75% उत्पादन इंधन खनिजांपासून आहे याचा अर्थ इतर खनिजांच्या बाबतीत राज्यात गेल्या पंचवीस वर्षांत पीछेहाटच दिसते आहे

गेल्या पंचवीस वर्षांत राज्यातील खनिजांच्या एकूण उत्पादनात सुमारे पाच पटीने तर त्यांच्या किमती 43 पटीने वाढ झाली यावर्षीच्या राज्यातील खनिजे समन्वयाने जि चंद्रपूर जिल्ह्यात क्लोराईड तर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या खनिजाचे साठे प्रथमच आढळून आले

बॉक्साईट मॅग्नीज दगडी कोळसा लोहखनिज चुनखडी डोलोमाईट क्रोमाइट इत्यादी खनिजे विपुल प्रमाणात तर इल्मेनाइट सिलिका gypsum अभ्रक बँराइट अॅस्बेस्टाॅस टंगस्टन वाळू इत्यादी खनिजे अत्यंत कमी प्रमाणात आहे 1988 89 मध्ये चंद्रपूर जिल्ह्यात क्लोराइड व सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्राफाईट खनिजाचे साठे सापडले आहेत

खनिज तेल व नैसर्गिक वायूचे साठे ही अरबी सागरात पश्चिम किनाऱ्याजवळ आढळून आले आहेत भारतातील खनिज संपत्तीच्या एकूण उत्पादनापैकी 3.5% उत्पादन महाराष्ट्रात होते

 सध्याच्या युगात खनिज संपत्ती ला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे अवजड कारखान्यांच्या विकास करण्यासाठी लोह खनिज मॅग्नीज आणि दगडी कोळसा इत्यादी खनिजांची आवश्‍यकता असते

महाराष्ट्र मधे खनिज संपत्तीची विभाग विषम स्वरूपात झालेली आहे

महाराष्ट्राच्या फक्त पुर्व व दक्षिण भागात निरनिराळी खनिजे सापडतात महाराष्ट्राच्या बाकीच्या भागात खनिजांचा अभाव आहे

महाराष्ट्रातील खनिज संपत्ती

लोहखनिज

महाराष्ट्रात सुमारे शंभर दशलक्ष टन लोह खनिजाचे साठे असून ते देशाच्या 20% आहेत चंद्रपूर गडचिरोली भंडारा रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात लोह खनिज साठे आढळतात गडचिरोली जिल्ह्यात देऊळगाव येथे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात रेडीजवळ लोह खनिजाच्या खाणी आहेत चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील लोह खनिज स्तरित खडकात सापडते तर भंडारा जिल्ह्यातील लोहखनिज अग्निजन्य खडकांत आढळतात

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील  लोह खनिज हेमेटाइट क्वार्टझाइट पट्ट्याची संबंधित असून त्यात सिलिकाचे प्रमाण आढळते भंडारा जिल्ह्यात खुर्सिपार येथील लोह खनिज मॅग्नेटाइट प्रकारचे आहे. सुरजागड, वाडवी, दामकोड

व भामरागड येथेही लोहखनिज आढळते रेवदंडा येथील लोकांनी धारवाड गटातील खडकात असून त्यावर लॅटेराइट चा थर आहे महाराष्ट्रातील खनिज उत्तम प्रतीची असून येथील लोक खनिजात कमीत कमी 50% लोहांश असतो.

भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील लोह खनिजात 54% तर

चंद्रपुर जिल्ह्यातील लोह खनिजात 63.35% लोहांश असतो सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोहखनिजात 58.65% लोहांश सापडतो.

उत्पादन

महाराष्ट्रातील लोक खनिजाच्या उत्पादनात चढ-उतार होत असल्याचे आढळून येते.

1961 मध्ये 3.62 लाख टन उत्पादन झाले होते.

त्यानंतरच्या दशकात दुपटीने उत्पादन वाढले तसेच 2015 मध्य सुमारे 9.97 लाख टन लोह खनिजाचे उत्पादन काढले होते भारतातील एकूण लोहखनिज उत्पादनापैकी सुमारे 3.4% उत्पादन महाराष्ट्रात होते

भारताच्या एकूण लोहखनिज साठ्यापैकी 20% साठा महाराष्ट्रात आहे धारवाड श्रेणीतील खडकात व जांभा खडकात हे खनिज प्रामुख्याने आढळते महाराष्ट्रात रत्नागिरी-सिंधुदुर्ग चंद्रपूर गडचिरोली व भंडारा जिल्ह्यात लोह खनिजाचे  सुमारे शंभर दशलक्ष मेट्रिक टनाचे साठे आहेत

लोह खनिजाचे वैशिष्ट्ये:

सध्याचे युग हे लोखंडाचे युग आहे असे म्हणतात विजेचे खांब रेल्वेचे रूळ घराच्या खिडक्या शेतीची अवजारे निरनिराळे अवजारे विविध वाहनातही लोखंडाचा मोठ्या प्रमाणात वापर होतो

लोह खनिज हे अतिशय महत्वाचे खनिज आहे. सध्याच्या औद्योगिक युगात या धातूला विशेष महत्त्व आहे. लहानशा टाचणीपासून ते मोठ्या यंत्रापर्यंत सर्व वस्तू लोखंडापासून तयार केल्या जातात.

बांधकाम क्षेत्रात तर लोखंडाचा उपयोग उल्लेखनीय आहे. निरनिराळे कारखाने या धातू वर अवलंबून आहे म्हणून लोह खनिजाला कारखान्यांचा कणा असे म्हणतात.

महाराष्ट्रातील उत्पादक प्रदेश

महाराष्ट्रात लोह खनिजाचा मोठा साठा आहे हा साठा भारताच्या 2% इतका आहे महाराष्ट्राच्या पूर्वेकडील चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया व नागपूर आणि पश्चिमेकडील सिंधुदुर्ग जिल्ह्यात खनिजांचे साठे आहेत े

चंद्रपूर या जिल्ह्यात लोह खनिजाचा फार मोठा साठा हा साठा महाराष्ट्रात सर्वात जास्त आहे शिवाय जिल्ह्यात सापडणारे लोह खनिज उच्च प्रतीचे आहे या जिल्ह्यातील लोहारा, असोला, देवळगाव, पिंपळगाव  ही क्षेत्रे लोहखनिजाच्या दृष्टीने महत्त्वाची आहेत.


1) देवळगाव :

या जिल्ह्यातील देवळगाव क्षेत्रदेखील लोह खनिजाच्या दृष्टीने महत्त्वाची आहे या क्षेत्रात उच्च प्रतीचे लोह खनिज सापडते.

2) लोहारा :

या क्षेत्रातील 200 मीटर लांबीच्या क्षेत्रात लोह खनिज सापडते. येथे 68 दशलक्ष टन इतक्या लोह खनिजाचा साठा आहे. या क्षेत्रातील लोह खनिज उच्च प्रतीचे आहे.

3) पिंपळगाव :

या क्षेत्रात लोह खनिजाचा बराच साठा आहे. येथील लोह खनिजही उच्च प्रतीचे आहे. या शिवाय या जिल्ह्यांतील बिसी, रतनपुर, हितपूर, पुसेट, मुरबाड इत्यादी ठिकाणी लोह खनिज सापडते.

4) असोला :

या क्षेत्रातील 400 मीटर लांबीच्या क्षेत्रात लोह खनिज सापडते. येथे 4.8 दशलक्ष टन इतका लोह खनिजाचा साठा आहे. येथील लोह खनिजाच्या थराची जाडी 13 ते 17 मीटर असून येथील लोह खनिज चांगल्या दर्जाचे आहे.

ब) गडचिरोली :

या जिल्ह्य़ात दक्षिण व पूर्व भागात तसेच भामरागड, चिरोली, सुरजागड डोंगररांगेत मोठ्या प्रमाणात लोह खनिजाचे साठे आहेत परंतु घनदाट जंगल व नक्षलवादी प्रदेशामुळे खनिजाचे उत्पादन म्हणावे तसे होत नाही.

क) भंडारा व गोंदिया :

गोंदिया जिल्ह्य़ात लोह खनिजाचा मोठा साठा आहे. या जिल्ह्यात 6.2 दशलक्ष टन इतका लोह खनिजाचा साठा असावा असा अंदाज आहे. या जिल्ह्यातील आंबेतलाव क्षेत्रात लोह खनिज सापडते.

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.